राशीभविष्य दि. २० मार्च २०२१; या राशीच्या लोकांची नवीन लोकांशी ओळखी होऊ शकते; वाचा आजचं राशीभविष्य

  मेष – कामातील समस्या संपू शकतात. तुम्ही आखलेल्या योजना सफल होऊ शकतात. समस्या सोडवल्या जातील. तब्येतीची काळजी घ्यावी लागेल.

  वृषभ – मनातील अनेक विचारांच्या गोंधळामुळे कामात मन लागणार नाही. जोखमीचं काम घेऊ नका. प्रोफेशनल लाईफमध्ये टेन्शन वाढू शकतं. केलेल्या कामाचा रिझल्ट न आल्यास काळजी करु नका. धैर्य ठेवा. जेवण वेळेत करा. तब्येतीकडे लक्ष द्या.

  मिथुन – आर्थिक गोष्टी सुधारतील. वैवाहिक जीवन सुखी राहील. समजूतदारपणा आणि नम्रतेने समस्या सोडवाल. धनलाभाची शक्यता आहे. नवीन लोकांशी ओळखी होऊ शकतात. विचार करत असलेली कामं करण्यास दिवस शुभ आहे.

  कर्क – दिवसभर सावध राहावं लागेल. काही लोक स्वत:च्या स्वार्थासाठी तुम्हाला समस्या निर्माण करु शकतात. मनात अनेक विचार सुरु राहतील. जुन्या गोष्टींमध्ये अडकाल. महत्त्वाची कामं अर्धवट राहू शकतात. कामात मन लागणार नाही.

  सिंह – अनेक प्रकारच्या विचारांमध्ये अडकाल. विचार करत असलेली कामं पूर्ण होणार नाही. पैसे सांभांळून ठेवा. व्यवहारात विचार करुन पुढे जा. कटू बोलू नका. तब्येत चांगली राहील.

  वृश्चिक – नोकरी-व्यवसायात अचानक निर्णय घ्यावे लागू शकतात. नुकसान होऊ शकतं. गोंधळ वाढू शकतो. वायफळ खर्च होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी समस्या वाढू शकतात.

  धनु – प्रेमसंबंधांमध्ये गैरसमज होतील. कोणत्याही कामात बेजबाबदारपणा करु नका. नोकरी-व्यवसायात घाई-गडबड करु नका. विचार करत असलेली कामं पूर्ण होण्यास वेळ लागेल. आज अधिक मेहनत घ्यावी लागेल. तब्येत सांभांळा.

  मकर – नवीन काम, व्यवसायाबाबत नवी डिल समोर येऊ शकते. समस्या सोडवण्यासाठी दिवस चांगला आहे. कामं लवकर पूर्ण होतील. दररोजच्या कामात कोणत्याही अडचणी येणार नाहीत. पुढे जाल. महत्त्वपूर्ण कामांसाठी दिवस शुभ आहे. समस्या संपतील.

  कुंभ – कोणत्याही नकारात्मक कामात अडकल्यास महत्त्वाची संधी घालवू शकता. आज कोणताही निर्णय घेऊ नका, कोणताही निष्कर्ष काढू नका. स्वभावात चिडचिडेपणा येऊ शकतो. विचार करुन बोला. तब्येत ठिक राहील.

  मीन – मित्र आणि भावंडांचं सहकार्य मिळेल. नवीन कामाची सुरुवात होईल, विचार करत असलेली कामं पूर्ण होतील. संपत्तीच्या कामाकडे लक्ष द्या. व्यवहारात यश मिळेल. दिवस कुटुंब, खासगी जीवन आणि पैशांच्या विचारात जाईल. महत्त्वाच्या कामासाठी योजना आखाल. जोडीदारासाठी वेळ काढा. तब्येतीच्या बाबतीत सावध राहा.