राशी भविष्य दि. २३ मार्च २०२१; या राशीच्या लोकांनी केवळ युक्तिवादाच्या आधारे निर्णय घ्यावा

  मेष- व्यापारामध्ये फायदा होणार आहे. नोकरदार वर्गाला प्रगतीची संधी आहे. सहकाऱ्यांची मदत मिळणार आहे. करिअरमध्ये पुढे जाण्याच्या संधी मिळतील. मिळकत वाढेल.

  वृषभ- काही कामांमध्ये अडचणी येऊ शकतात. आज जास्त मेहनत करावी लागू शकते. कोणताही निर्णय घेताना पूर्ण विचार करा. दाम्पत्य जीवन आनंददायी असेल.

  मिथुन- तुमच्या कामानं आज इतरांवर प्रभाव पडणार आहे. नोकरीच्या ठिकाणी जास्तीचं काम हाती येऊ शकतं. अचानक फायदा होण्याचा योग आहे. एखाद्या दुर्घटनेत दुखापत होण्याची शक्यता आहे.

  कर्क- ग्रहताऱ्यांचं स्थान तुमच्यासाठी फायद्याचं आहे. आज तुम्ही बऱ्याच अंशी सक्रिय असाल. नव्या जबाबदारीवर भर द्या. नव्या लोकांना भेटण्याची संधी मिळेल. भावनात्मक आधार मिळेल.

  सिंह- अधिकाऱ्यांकडून फारसं सहकार्य मिळणार नाही. व्यापारामध्ये सावधगिरी बाळगा. अडचणींवर मात करण्याच्या दृष्टीने पावलं उचला. आर्थिक परिस्थिती सुधारेल.

  कन्या- व्यापार आणि नोकरीच्या ठिकाणी काही चांगले आणि फायद्याचे निर्णय घ्याल. आर्थिक परिस्थिती सुधारेल. नोकरीत पदोन्नतीची संधी आहे.

  तुळ- अडकलेली कामं मार्गी लागतील. नोकरी आणि व्यापारी वर्गाला आजचा दिवस लाभदायी आहे. पण, सतर्कताही तितकीच महत्त्वाची आहे. येत्या काही दिवसांमध्ये मोठे बेत आखून त्यावर काम करा. फायदा होईल.

  वृश्चिक – व्यापारामध्ये मोठा फायदा मिळणार आहे. नोकरदार वर्गासाठी सध्याचा काळ लाभदायी आहे. नवी आणि मोठी कामं हाती येतील. आरोग्याची काळजी घ्या.

  धनु- नोकरदार वर्गाच्या मार्गात काही अडचणी येतील. व्यापारात सावधगिरी बाळगा. कायदेशीर कामं मार्गी लावा. आरोग्याची काळजी घ्या.

  मकर- जुन्या अडचणी दूर होतील. आज तुम्ही अतिशय उत्साही असाल. आजार दूर होतील. कोणावरही विश्वास ठेवण्यापूर्वी विचार करा.

  कुंभ- करिअरच्या दृष्टीनं आजचा दिवस लाभदायी आहे. नोकरीच्या ठिकाणी दिवस चांगला आहे. काही चांगले बदल होणार आहेत. धनलाभ होण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंधांसाठी दिवस चांगला आहे.

  मीन- अचानक एखाद्या बाबतीत मोठा फायदा होण्याचा योग आहे. जुनं कर्ज फेडाल. अवाजवी खर्चावर ताबा ठेवा. आरोग्याची काळजी घ्या.