राशी भविष्य दि. २३ मार्च २०२१; या राशीच्या लोकांनी केवळ युक्तिवादाच्या आधारे निर्णय घ्यावा

    मेष- दिवस सामान्य आहे. वादांपासून दूर राहा. आर्थिक बाबतीत प्रगती होईल. जुनी आणि अडकलेली कामं मार्गी लागतील. एखादी शुभवार्ता मिळेल.

    वृषभ-  दैनंदिन कामं वेगानं पूर्ण होतील. जबाबदारीची कामं मिळतील. कामकाज सुधारण्याचा प्रयत्न करा. मानसिक संतुलन राखा आणि निर्णय़ घ्या.

    मिथुन- मागील काही दिवसांपासून ज्या कामांच्या प्रतिक्षेत होतात, ती कामं पूर्ण होतील. नव्या ठिकाणी जाण्याचा योग आहे. परिस्थिती आणि नशिबावर विश्वास ठेवा.

    कर्क- बेरोजगारांना रोजगाराच्या संधी मिळतील. अनेक अडचणी सहज दूर होतील. अनुभवी व्यक्तींचा सल्ला फायद्याचा ठरेल. शारीरिक व्याधी दूर होतील. व्यवसायाचा स्तर उंचावेल.

    सिंह- आज कोणतंही काम टाळू नका. नोकरी किंवा व्यापारावर लक्ष द्या. एकाग्रतेनं काम पुढे न्या. कुटुंबासमवेत जास्त वेळ व्यतीत कराल. मन आणि विचारांवर ताबा ठेवा. कुटुंबाच्या मदतीनं आर्थिक अडचणींवर मात कराल.

    वृश्चिक- अनेक कामं सहज पद्धतीनं पुर्ण होतील. अडकलेली कामं पूर्ण होतील. कुटुंबातील वाद मिटतील. मोठ्यांचे आशीर्वाद मिळतील.

    धनु- अर्थार्जनाच्या वाटांमध्ये यशस्वी व्हाल. एखादा नवा रोजगार मिळेल. जास्तीच्या कामामध्ये मित्रांची मदत मिळेल. जुनी आणि अडकलेली कामं मार्गी लावा. इतरांचा दृष्टीकोन विचारात घ्या.

    मकर- दैनंदिन कामं पूर्ण करण्यासाठी जास्तीचे प्रयत्न करावे लागतील. जबाबदारीवर लक्ष ठेवा. शांतता राखा. सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करा. फायदाच होईल.

    कुंभ- तुमच्या मतांचा इतरांवर प्रभाव पडणार आहे. तुमच्याहून कनिष्ठ मंडळींबाबतच सतत विचार कराल, त्यांच्या हिताचा विचार कराल. हा स्वभाव तुम्हाला फायद्याचा ठरेल. कुटुंबासोबत वेळ व्यतीत करण्याची संधी मिळेल.

    मीन- कोणा एका निर्णयाच्या प्रतिक्षेत आहात, तर शांतता राखा. सर्वकाही सुरळीत होईल. दैनंदिन कामांतून वेळ काढत काही नव्या संकल्पना अंमलात आणाल. मेहनत करा, फळ मिळेल. कुटुंबाला वेळ द्या.