दैनिक राशीभविष्य २४ मे २०२१ : ‘मिथुन’ राशींच्या लोकांनी गुंतवणूक करताना विशेषत: प्रॉपर्टीच्या गोष्टींमध्ये अधिक लक्ष्य द्यावे; जाणून घ्या अन्य राशींसाठी आजचा दिवस कसा असेल ?

  मेष :

  आपल्या जीवनात प्रगतीचे मार्ग अधिक सुखकर होतील. आज आपण पुढे वाटचाल कराल. आर्थिक बळकटी मिळेल. व्यापारी वर्गाला आज नियमात राहाणं बंधनकारक असेल अन्यथा अडचणी येतील. नोकरी क्षेत्रात सहकर्मचाऱ्यांची मदत मिळेल.
  आजचा शुभ रंग आणि अंक : पांढरा, 5

  वृषभ :

  आपण प्रतिकूल परिस्थितीतून जात आहात. आर्थिक आणि कौटुंबिक स्थिती अधिक मजबूत करण्यावर भर द्यायला हवा. सतर्क राहाणं गरजेचं आहे. आज घराची साफसफाई करा.
  आजचा शुभ रंग आणि अंक : पिवळा, 4

  मिथुन :

  आजचा दिवस आपल्यासाठी संमिश्र स्वरुपाचा असणार आहे. गुंतवणूक करताना विशेषत: प्रॉपर्टीच्या गोष्टींमध्ये अधिक लक्ष्य द्या.
  आजचा शुभ रंग आणि अंक : गुलाबी, 3

  कर्क :

  आज आपल्याला अचानक फायदा मिळून शकतो. आर्थिक तणाव जाणवेल. आजचा दिवस चांगल्या पद्धतीनं घालवण्याकडे लक्ष द्या.
  आजचा शुभ रंग आणि अंक : कथ्था, 6

  सिंह :

  व्यापाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ आहे. पैशांच्या व्यवहारात साक्षीदार असणं गरजेचं आहे. आजचा दिवस आपला चांगला जाईल.
  आजचा शुभ रंग आणि अंक : गुलाबी, 4

  कन्या :

  प्रॅक्टिकल निर्णय घेण्यावर भर द्या. दूध व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला आहे. व्यवसायात आज आपल्याला लाभ मिळेल. जोडीदारासोबत आपला वेळ खूप चांगला जाईल.
  आजचा शुभ रंग आणि अंक : केशरी, 6,

  तुळ :

  आज आपल्याला काम मेहनत घेऊन आणि इमानदारीनं करायचं आहे. व्यवहाराचे निर्णय सकारात्मक होतील. आपल्या मुलांसोबत अधिक वेळ घालवा.
  आजचा शुभ रंग आणि अंक : निळा, 7

  वृश्चिक :

  भविष्यातील गुंतवणुकीसाठी नियोजन करा. आजपासून गुंतवणूक करण्यावर भर द्या. नोकरी-व्यवसायात चांगला लाभ होईल. विरोधकांपासून सावध राहा.
  आजचा शुभ रंग आणि अंक : बैगनी, 8

  धनु :

  यशस्वी होण्यासाठी आज तुम्हाला खूप जास्त प्रयत्न करावे लागतील. धीर सोडू नका. आर्थिकबाबींमध्ये सावधानी बाळगा. अपूर्ण राहिलेली कामं आज मार्गी लागतील.
  आजचा शुभ रंग आणि अंक : जांभळा, 9

  मकर :

  नोकरी बदलण्याचा विचार तुम्ही करू शकता. आजचा आपला दिवस चांगला जाणार आहे. कुटुंबासोबत आपला वेळ चांगला जाईल.
  आजचा शुभ रंग आणि अंक : लाल, 7

  कुंभ :

  आज आपल्याला दिवसाचं नियोजन करून त्यानुसार वागायला हवं. महत्त्वाच्या भेटीगाठी होतील.
  आजचा शुभ रंग आणि अंक : हिरवा, 6

  मीन :

  आज आपण आपलं महत्त्वाची गोष्ट शेअर करू शकता. आज आपला विवाह निश्चित होण्याची शक्यता आहे.
  आजचा शुभ रंग आणि अंक : शेंदरी, 1