राशी भविष्य दि. २५ एप्रिल २०२१: ‘मीन’ राशीच्या लोकांची व्यवसाय आणि प्रेमाची स्थिती मध्यम स्वरुपाची असणार आहे

  मेष- कोणत्यातरी गोष्टीला घेऊन आज आपण चिंतेत असाल. प्रेमाची स्थिती ठिक असेल. आज आपल्याला सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.

  वृषभ- आज आपल्याला आरोग्याच्या समस्या उद्भवण्याची दाट शक्यता आहे. घरातील सदस्य आजारी पडू शकतो. पैशांची चणचण भासेल.

  मिथुन- आपल्याला स्वत:कडे लक्ष द्यावं लागेल. कोणतीही जोखीम उचलण्यात सध्या पडू नका त्यामुळे मोठ्या संकटात सापडाल. आरोग्य-प्रेम-व्यवसाय तिन्ही गोष्टी ठिकठाक आहेत. आज थोडा संयम बाळगला तर उद्याचा दिवस तुमचाच असेल.

  कर्क- आज आपल्याला आनंदाची बातमी मिळेल. आज प्रेमात कोणताही निर्णय घेऊ नका धोक्याचा असेल.

  सिंह- आपली स्थिती सुधारत आहे. व्यवसायाची घडी देखील पूर्वीसारखी नीट बसत आहे.

  कन्या- आर्थिक आणि व्यवसायात वृद्धी होईल. वडिलांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या कोर्टाच्या गोष्टींपासून दूर राहा.

  तुळ- प्रेम आणि व्यवसायात परिस्थिती खूप उत्तम असेल. आज आपलं आरोग्य आणि मन दोन्ही प्रसन्न राहिल. तुम्ही खूप हुशात आहात त्यामुळे येणाऱ्या संकटावर योग्य पद्धतीनं सामना करण्याची ताकद तुमच्याकडे आहे.

  वृश्चिक- व्यवसायात आज आपल्याला फायदा होण्याचे संकेत आहेत. जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष द्या.

  धनु- मोठ्यांचे आशीर्वाद मिळतील. गूढ ज्ञानाची प्राप्ती होईल. आज आपण चिंताग्रस्त असाल. आरोग्य आणि प्रेम दोन्ही बऱ्यापैकी ठिक असेल.

  मकर- आरोग्य आणि प्रेमाची स्थिती मध्यम असेल. आज थोडं सावध राहण्याची आवश्यकता आहे.

  कुंभ- डोकेदुखीची समस्या आज दिवसभर आपल्याला जाणवणार आहे. आईची तब्येत खराब होऊ शकते त्यामुळे काळजी घ्या. आज सावध आणि सतर्क राहा.

  मीन- नियोजन करून आज काम करा. व्यवसाय आणि प्रेमाची स्थिती मध्यम स्वरुपाची असणार आहे.