राशी भविष्य दि. ०५ डिसेंबर २०२०; ‘या’ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खर्चिक

मेष –  मानसिक चिंता दूर होतील. धनलाभ होण्याची शक्यता आहे. प्रेम संबंधांमध्ये यश मिळेल.

वृषभ – मानसिक चिंता निर्माण होण्याची शक्यता आहे.  अपयश मिळण्याची देखील शक्यता आहे. त्यामुळे खचून जावू नका. गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करा.

मिथुन – नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. नोकरीत बढतीची शक्यता आहे. धनलाभ होण्याची शक्यता आहे.

कर्क – मुलांची प्रगती होईल. दिवस चांगला आहे. नवीन वाहन खरेदी कराल. रखडलेली कामे मार्गी लागतील. धनलाभ होण्याची शक्यता आहे.

सिंह – धनलाभ होण्याची शक्यता आहे. खरेदी कराल. ताप आणि सर्दी होण्याची शक्यता आहे.

कन्या – कामात व्यस्त राहाल. कुटुंबामध्ये वाद होवू शकतो. मित्रांसोबत असलेले संबंध देखील बिघडू शकतात.

तुळ – नोकरीत बढती मिळण्याचा योग आहे. मुलांकडून मदत मिळेल. रोजचा खर्च वाढण्याची शक्यता आहे.

वृश्चिक – हडांसंबंधीत त्रास डोकं वर काढेल. खर्च वाढेल. शिक्षणाकडे विशेष लक्ष द्या. आरोग्याची काळजी घ्या.

धनु – आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. वाद-विवादांपासून स्वत:चा बचाव करा. हिरव्या फळाचे दान करा.

मकर – नवीन संधी मिळतील. चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. आहाराकडे दुर्लक्ष करू नका. आरोग्याची विशेष काळजी घ्या.

कुंभ – व्यवसायात लाभ होण्याची शक्यता आहे. आर्थीक अडचणी दूर होतील. करियरमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे.

मीन – आर्थिक स्थिती चांगली राहील. मुलांप्रती असलेली चिंता दूर होईल. नोकरीमध्ये परिवर्तानाचे योग आहेत.