राशी भविष्य दि. ६ एप्रिल २०२१; ‘या’ राशीच्या लोकांनी प्रेम आणि व्यवसायामध्ये काळजी घ्यावी

  मेष- व्यवसाय चांगला चालू राहिल. प्रेमात आज आपली स्थिती मध्यम स्वरुपाची असणार आहे.

  वृषभ- आज आपली ऊर्जा कमी असेल. आपल्या मुलांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या.

  मिथुन- आरोग्याची विशेष काळजी घेणं आपल्याला गरजेचं आहे. प्रेमासाठी चांगला वेळ आहे. चांगलं आयुष्य जगण्याकडे लक्ष द्या.

  कर्क- मन अस्वस्थ असेल. आज आपल्याला थकवा आल्यासारखं वाटू शकतं. व्यवसायातील अडचणी दूर होतील.

  सिंह- आज आपल्याला आनंदाची बातमी मिळू शकते. प्रेम-वैवाहिक जीवनात लक्ष देण्याची आवश्यकता.

  कन्या- राजनैतिक लाभ होण्याचे संकेत आहेत. प्रेम प्रकरणांसाठी आजचा दिवस उत्तम आहे. व्यवसाय उत्तम सुरू राहिल.

  तुळ- भाग्य साथ देईल. सतत जोखीम स्वीकारून तुम्ही थकलेले आहात. व्यापार आणि वैवाहिक आयुष्य उत्तम राहिल.

  वृश्चिक- आज अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता. आरोग्य आणि प्रेम या दोन्ही गोष्टींची आज थोडी काळजी घ्यावी लागेल.

  धनु- कामाच्या ठिकाणी आज आपण प्रगती कराल. प्रेमात उत्तम व्यवसायिक दृष्टीकोन ठेवा.

  मकर – व्यापारात आज आपली भरभराट होईल. अडकलेली कामं मार्गी लागतील.

  कुंभ- आज वादविवादापासून दूर राहा. प्रेम आणि आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे.

  मीन- आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. प्रेमासाठी आजचा दिवस खूप सुंदर आहे. व्यवसायात आज आपल्याला मोठी कमाई होण्याची शक्यता आहे.