राशी भविष्य दि. १८ मार्च २०२१; या राशीच्या लोकांची आर्थिक परिस्थिती सुधारेल

  मेष- आरोग्य चांगलं असेल. व्यवसायाच्या दृष्टीकोनातून आपला आजचा दिवस चांगला आहे. कोणतीही जोखीम स्वीकारू नका.

  वृषभ- आज आपल्याला सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. आरोग्याच्या कुरबुरी असतील. प्रेमाच्या दृष्टीकोनातून आजचा दिवस चांगला असेल.

  मिथुन- आपली स्थिती तशी बरी असेल. आजचा दिवस आपल्यासाठी संमिश्र असणार आहे. सावधान आणि सतर्क राहण्याची गरज आहे.

  कर्क- आज आपल्या मनासारख्या गोष्टी घडू शकतात. कामाच्या ठिकाणी विशेष काळजी घ्या. प्रेमाच्या परिस्थितीमध्ये थोडी सुधारणा होईल.

  सिंह- आजचा दिवस तसा खराब नाही मात्र स्वत:ची काळजी घ्या. आज आपल्याला थोडे परिश्रम आणि कटकटीचा सामना करावा लागू शकतो.

  कन्या- आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. मुलांच्या आरोग्याकडे लक्ष द्या.

  तूळ- घर-कुटुंबाकडे आज लक्ष देण्याची आवश्यकता आहे. आज आपल्याला समस्यांचा सामना करावा लागणार आहे.

  वृश्चिक- आज परिस्थिती चांगली राहिल. आरोग्य आणि प्रेम दोन्हीची स्थिती चांगली राहणार आहे.

  धनु- आज अडचणींचा सामना करावा लागणार आहे. बोलताना विशेष काळजी घ्या. आरोग्याची काळजी घ्या.

  मकर- आज आपल्याला सतर्क राहण्याची आवश्यकता आहे.

  कुंभ- काही गोष्टींना घेऊन आज विशेष काळजीत असाल. गणपतीची पूजा करा त्यातून आज आपलं मन शांत आणि प्रसन्न राहिल.

  मीन- आर्थिक परिस्थिती सुधारेल. आरोग्याच्या समस्या उद्भवतील. हळू-हळू विचार करून निर्णय़ घ्या यश नक्की मिळेल.