‘या’ राशीच्या लोकांच्या घरात आज येणार नवी वस्तू ; जाणून घ्या तुमचे आजचे राशी भविष्य

सर्वत्र तुमची चर्चा असेल. अधिक प्रगती होण्याची शक्यता आहे. मित्रांसोबत बाहेर फिरायला जाल. त्यामुळे तुम्हाला चांगलं वाटेल. वैवाहिक जीवन देखील चांगलं असेल.

  मेष :

  अवती-भोवती लोकांची वर्दळ असेल. गुपित कौशल्य सर्वांसमोर येईल. ज्यामुळे मोठा फायदा देखील होवू शकेल. बिल्डरांसाठी आजचा दिवस अत्यंत खास आहे. गरज भासल्यास इतरांकडून उधार घ्यावं लागेल. नको त्या कामांमध्ये वेळ वाया घालवू नका. आरोग्याकडे लक्ष द्या.

  आजचा शुभ रंग आणि अंक : भगवा, 1

  वृषभ :

  यश चांगली प्रतिष्ठा मिळेल. योग्य पर्यायावर विचार करा. वडिलांच्या सल्ल्यामुळे व्यापार वाढले. चुकीच्या मार्गाने पैसे मिळवण्याचा विचार करू नका. घरात नवी वस्तू येण्याची शक्यता आहे. वायफळ खर्च करू नका.
  आजचा शुभ रंग आणि अंक : निळा, 8

  मिथुन :

  दिवस चांगला आहे. महत्त्वपूर्ण कामात लवकरात लवकर निर्णय घ्या. आज पदोन्नतीशी संबंधित चर्चा होईल. मुलांच्या कामाचा अभिमान वाटेल. मित्र परिवाराकडून योग्य साथ मिळेल. कामाच्या ठिकाणी चांगलं वातावरण असेल.
  आजचा शुभ रंग आणि अंक : जांभळा, 9

  कर्क :

  कुटुंबामध्ये आज वातावरण प्रसन्न असेल. चांगलं कार्य तुमच्या हातून पार पडेल. ज्यामुळे तुमच्या कुटुंबाचं नाव मोठं होईल. अडकलेले पैसे मिळतील. शिवाय अचानक धनलाभ होण्याचे देखील योग आहेत. गुंतवणूक होईल.
  आजचा शुभ रंग आणि अंक : लाल, 7

  सिंह :

  आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. मित्रांसोबत वाद होतील. पण तुम्ही स्वतःवर नियंत्रण ठेवा. खर्च नियंत्रित करण्याचा प्रयत्न करा आणि फक्त आवश्यक वस्तू खरेदी करा. मुले खेळ आणि इतर मैदानी कामांवर जास्त वेळ देतील.
  आजचा शुभ रंग आणि अंक : गुलाबी, 4

  कन्या :

  दिवस आरामदायी असेल. राजकारणात असलेलल्या व्यक्तींना पद मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबाचा विचार करत तुम्ही बचत कराल. नवीन योजनांचा विचार कराल. नवीन विचार चांगले लाभ देतील. आरोग्याकडे लक्ष द्या.
  आजचा शुभ रंग आणि अंक : केशरी, 6

  तुळ :

  आरोग्य उत्तम राहील. कोणत्याही गोष्टीचा जास्त विचार करू नका. दिवस लवकरच बदलतील. चांगल्या व्यक्तींसोबत भेटी होतील. भविष्याकडे वाटचाल करा. मित्र आणि कुटुंबासोबत वेळ व्यतीत कराल.
  आजचा शुभ रंग आणि अंक : हिरवा, 6

  वृश्चिक :

  चातुर्याने काम करा, यश नक्की मिळेल. प्रमाणापेक्षा जास्त राग आडचणी वाढवेल. मुलांमुळे आनंद मिळेल. कोणतही काम करण्यापूर्वी वरिष्ठाचा सल्ला नक्की घ्या.
  आजचा शुभ रंग आणि अंक : तांबडा, 3

  धनु :

  स्वतःवर विश्वास ठेवा. कोणताही निर्णय घेण्याआधी विचार करा. खरेदी केलेल्या प्रॉपर्टीचे चांगले रिटर्न्स मिळतील. सोमवारी केलेले करार फायद्याचे ठरतील. दुसऱ्यांना प्रभावित करण्यासाठी जास्त पैसे खर्च करू नका.
  आजचा शुभ रंग आणि अंक : निळा, 7

  मकर :

  आरोग्य उत्तम राहील. कोणत्याही गोष्टीचा जास्त विचार करू नका. दिवस लवकरच बदलतील. चांगल्या व्यक्तींसोबत भेटी होतील. भविष्याकडे वाटचाल करा. मित्र आणि कुटुंबासोबत वेळ व्यतीत कराल.
  आजचा शुभ रंग आणि अंक : गुलाबी, 3

  कुंभ :

  दिवस चांगला आहे. आपली सकारात्मक आणि संतुलित विचारसरणी आपल्याला नियोजित पद्धतीने कार्य पूर्ण करण्यास मदत करेल. प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक केल्यास फायदा होईल. आरोग्याकडे विशेष लक्ष द्या.
  आजचा शुभ रंग आणि अंक : आकाशी, 2

  मीन :

  सर्वत्र तुमची चर्चा असेल. अधिक प्रगती होण्याची शक्यता आहे. मित्रांसोबत बाहेर फिरायला जाल. त्यामुळे तुम्हाला चांगलं वाटेल. वैवाहिक जीवन देखील चांगलं असेल.
  आजचा शुभ रंग आणि अंक : पिवळा, 4