दैनिक राशीभविष्य : ०४ ऑक्टोबर २०२१ ‘या’ राशीच्या लोकांना  बँंकेच्या व्यवहारात लाभ होण्याची शक्यता आहे. म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक फायदेशीर ठरेल.

    मेष (Aries):

    आजचा दिवस नोकरी धंद्यात स्पर्धामय राहील आणि त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न कराल. त्यातूनही नवे कार्य सुरू करण्याची प्रेरणा मिळेल व ते सुरूही कराल. उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याची योजना यशस्वी होईल. भाग्य आपल्या सोबत असणार आहे. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल. नवीन व्यवसाय योजनेवर काम करण्यासाठी हा काळ उत्तम आहे.
    आजचा शुभ रंग आणि अंक : हिरवा, 6

    वृषभ (Taurus):

    सातत्याने सकारात्मक विचार करण्याची प्रवृत्ती फलदायी ठरेल. तुम्हाला यश मिळेल. आज तुम्हाला चांगल्यापैकी पैसा मिळणार आहे . परंतु तुमच्या हातातून पैसे सांडू देऊ नका.बी तुम्हाला नवीन नोकरी मिळू शकेल. विद्यार्थ्यांना स्पर्धा क्षेत्रात यश मिळेल. कामात यश मिळवण्यासाठी मदत आणि मार्गदर्शन करतील. तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी उपयुक्त ठरेल. नशिबाची चांगली साथ मिळेल.
    आजचा शुभ रंग आणि अंक : पिवळा, 4

    मिथुन (Gemini):

    या आठवड्यात तुम्ही आपला किमती वेळ मित्रांमुळे खराब करू शकतात. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला वाटेल. प्रेमामध्ये अनावश्यक मागण्यांसाठी झुकू नका. आजचा दिवस अनकूल आहे. कामाच्या ठिकाणी त्याचा जास्तीत जास्त फायदा करून घ्या. वागणुकीत बदल हा इतरांसाठी चर्चेचा विषय बनेल. आपल्या आरोग्याबाबत निष्काळजी राहू नका. परिश्रमपूर्वक काम कराल. आपल्याला चांगले पैसे मिळतील.
    आजचा शुभ रंग आणि अंक : भगवा, 1

    कर्क (Cancer):

    मनात निर्माण होणार्‍या अनिश्चिततेमुळे मानसिक अस्वास्थ्य राहील. मनःस्थिती द्विधा असेल. बोलण्यावर संयम ठेवा आणि कोणाशी वादविवाद, भांडण झाल्याने परिस्थिती आणखीच खराब होईल. कौटुंबिक आनंद मिळेल. नशीब तुमच्या सोबत आहे. कामाच्या क्षेत्रात तुम्हाला यश मिळेल. नवीन मित्राच्या मदतीने तुम्हाला तुमच्या योजनांमध्ये अपेक्षित यश नक्कीच मिळेल. आर्थिक परिस्थिती चांगली राहील. खर्चात अनावश्यक वाढ होईल.
    आजचा शुभ रंग आणि अंक : गुलाबी, 4

    सिंह (Leo):

    घरातील व्यक्तींसमवेत वेळ आनंदात जाईल. धनलाभाचा योग आहे. कामात यशस्वी व्हाल. प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल. आजचा दिवस चांगला जाईल. कामाच्या ठिकाणी तुमचा प्रभाव राहील. चांगला धनलाभ होईल. कुटुंबाच्या गरजांची पूर्णपणे काळजी घेईल. बँंकेच्या व्यवहारात लाभ होण्याची शक्यता आहे. म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक फायदेशीर ठरेल.
    आजचा शुभ रंग आणि अंक : तांबडा, 3

    कन्या (Virgo):

    घरातील वातावरण बिघडू नये यासाठी वाद-विवाद टाळा. आईचे आरोग्य बिघडेल. धन आणि प्रतिष्ठेची हानी होईल. स्त्रियांशी व्यवहार करताना सावध राहा. व्यापारी वर्गाला विशेषत: चांगली सफलता मिळेल. तुमच्या कामाच्या ठिकाणी मोठा बदल होऊ शकतो. शत्रूंना पराभूत करण्यात यश मिळेल. नशीब तुमच्या सोबत असणार आहे. कुटुंब आणि मित्रांसोबत फिरायला बाहेर जाल. तुमचा दिवस आरोग्यासाठीही चांगला आहे.
    आजचा शुभ रंग आणि अंक : केशरी, 6

    तूळ (Libra):

    ताणतणाव, दडपणाच्या काळावर मात करता येईल, मात्र आपल्या कुटुंबाचा पाठिंबा तुम्हाला मदत करेल. तसेच तुमच्या जोडीदाराची प्रकृती खालावल्यामुळे तुम्ही तणावाखाली येण्याची शक्यता आहे. आपण संभाषणाची निपुणता वापरून तुमची काम पूर्ण कराल. कुटुंबातील सदस्यांकडून आनंद आणि सहकार्य मिळेल.
    आजचा शुभ रंग आणि अंक : निळा, 7

    वृश्चिक (Scorpio):

    आज व्यापार धंद्यात मोठे यश मिळेल पण कायद्याच्या कचार्‍यात सापडू नका एवढी दक्षता घ्या. व्यापार उद्योगाच्या दृष्टीने भावी योजना सुफळ होतील. तुमच्या कामातील कामगिरी चांगली असणार आहे. आपल्या दिवसाची सुरुवात चांगली होईल. हाती घेतलेलं काम पूर्ण होईल. इतरांबरोबर मिळून केलेल्या कामातही चांगले लाभ होतील. कोर्टाच्या कटकटीपासून सुटका होईल.
    आजचा शुभ रंग आणि अंक :  गुलाबी, 3

    धनु (Sagittarius):

    व्यापारात लाभाची शक्यता. गृहस्थी जीवनात आनंदाचे वातावरण राहील. कुटुंबात प्रेमभावना वाढेल. विवादास्पद परिस्थितीचा सामना करावा लागेल, अशा वेळी तुम्हाला नक्कीच कुटुंबाचा आधार मिळेल. बँंकिंग आणि रेल्वे भरतीकरिता तयारी करणाऱ्या व्यक्तींचा निकाल सकारात्मक येऊ शकतो. तुमचं भाग्य साथ देईल. प्रेमात संवेदनशिलता दिसून येईल. तुमची प्रतिभा फळाला येईल.
    आजचा शुभ रंग आणि अंक : आकाशी, 2

    मकर (Capricorn):

    कोणत्याही गोष्टीत खंबीर मनाने निर्णय घेऊ न शकल्याने चालून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही. महत्त्वाचे निर्णय आज घेऊ नका. संततीशी चर्चा होईल. तुम्ही प्रशंसनीय काम कराल. तुम्हाला कामात चांगले यश मिळेल. तुमची मेहनत आणि नशीब दोन्ही उत्तम साथ देईल. आर्थिक स्थिती चांगली राहील. तुमचे आरोग्य बिघडू शकते.
    आजचा शुभ रंग आणि अंक : पांढरा, 5

    कुंभ (Aquarius):

    गैरसमज दूर केल्यामुळे प्रत्येक बाब लवकर पूर्ण होईल. आरोग्याच्या बाबतीत बेपर्वाह राहू नका. मानप्रतिष्ठा भंग पावेल. बर्‍याच दिवसानंतर तुम्हाला कुणाला तरी भेटण्याची संधी मिळेल. नवीन काम सुरू करणं फायद्याचं ठरेल. बुद्धिमत्ता आणि हुशारी दाखवून तुम्ही काम पूर्ण कराल. बोलण्यात गोडवा असेल. तुमच्या घरातील शुभ कार्य पूर्ण होईल.
    आजचा शुभ रंग आणि अंक : लाल, 7

    मीन (Pisces):

    आज बौद्धिक आणि तार्किक विचार विनिमयासाठी दिवस चांगला. सामाजिक सन्मान मिळेल. मित्रांशी मुलाखात होईल. कौटुंबिक आनंद मिळेल. मंगल कार्य किंवा समारंभात सामील होणार आहात. एखाद्या विशेष व्यक्तीशी भेटणं संस्मरणीय असेल. तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. कामाच्या ठिकाणी दिवस खूप चांगला आहे.
    आजचा शुभ रंग आणि अंक : नारंगी, 7