rashi bhavishya

मेष – धैर्यानं पुढे जा. दिवसभर पैशांचाच विचार करत असाल. परिस्थिती सुधारण्यास वेळ द्या. गोष्टी तुमच्याच कलानं घडतील. नशीबाची साथ मिळेल.

वृषभ- आजच्या दिवशी तुम्ही जे काम कराल त्यामध्ये तुम्हाला यश मिळणार आहे. कागदोपत्री कामं पूर्ण करण्यावर भर द्या. फिरण्यासाठी बाहेर जाण्याची इच्छा होऊ शकते.

मिथुन- अचानक धनलाभ होऊ शकतो. नशीबाची साथ आहे. व्यवहार चातुर्य आणि सहनशक्तीनं पुढे जा. वाद निकाली लागतील. मोठ्यांचे आशीर्वाद तुमच्यासमवेत आहेत.

कर्क- एखादं महत्त्वपूर्ण काम हाती घ्या. तुम्हाला एखाद्या गोष्टीत मोठा फायदा मिळू शकतो. नवं काम हाती घ्याल. इतरांच्या पुढं जाण्याची इच्छा अधिक तीव्र होईल.

सिंह- नोकरीच्या ठिकाणी एखादी नवी सुरुवात कराल. दैनंदिन कामं सुरळीतपणे पार पडतील. विश्वासाच्या व्यक्तींशी भेट घडेल.

कन्या – आर्थिक परिस्थिती सुधारेल. वरिष्ठांचा तुमच्यावर प्रभाव असेल. एखादा वाद मिटेल. मेहनतीनं पुढं जा. नशीबाची साथ आणि आपल्या माणसांचा विश्वास तुमच्यावर असेल.

तुळ- आजचा दिवस तुमच्यासाठी खास आहे. नशीबाची साथ मिळणार आहे. अडकलेले पैसे परत मिळणार आहेत.

वृश्चिक- विचाराधीन कामं पूर्ण होतील. आजचा दिवस फायद्याचा आहे. काही सामूहिक आणि सामाजिक कार्यक्रमांमध्ये पुढाकार घ्याल.

धनु- नोकरी, करिअरच्या दृष्टीनं दिवस चांगला आहे. तुमच्या सहमतीनंच अनेक गोष्टी मार्गी लागतील.

मकर-  धनलाभ होण्याची शक्यता आहे. एखादी शुभवार्ता तुम्हाला कळेल. दिवस आनंददायी आहे. बेरोजगारांना नोकरीच्या नव्या संधी मिळतील.

कुंभ- तुमच्या कामाची सक्रियता वाढेल. नोकरीच्या ठिकाणी शांततेचं वातावरण असेल. अनेक गोष्टी मार्गी लागतील. अ़डचणींवर मात कराल.

मीन- जुन्या समस्या दूर होतील. सक्रियता वाढेल. अनेक कल्पना सुचतील. मिळकत आणि खर्चावर मात्र लक्ष द्या. यश प्राप्तीसाठी धैर्यानं पुढं जा. मित्रांची मदत मिळणार आहे.