rashi bhavishya

मेष- धनलाभाचा योग आहे. शत्रूवर मात करण्याची संधी आहे. नोकरीच्या ठिकाणी जास्त मेहनत करावी लागू शकते. तुमचा आत्मविश्वास वाढलेला असेल. जवळची नाती आणखी दृढ होतील. विवाहप्रस्ताव येण्याचा योग आहे.

वृषभ-   तुमच्या म्हणण्याचा आणि कामाचा इतरांवर प्रभाव पडणार आहे. इतरजण तुमचं म्हणणं ऐकतील. कोणा एका बैठकीत जाण्याचा योग येईल. आज एखादा असा प्रवास घडेल ज्याचा येत्या काळात फायदा होणार आहे.

मिथुन- आर्थिक स्थिती अगदी सहजपणे सुधारेल. अर्थार्जनाच्या संधी वाढतील. नव्या संधी मिळतील. दृष्टीकोन सकारात्मक ठेवा.

कर्क- सगळं लक्ष हे कामावर आणि करिअरवर असेल. अधिक संवेदनशील व्हाल. काही सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल. कुटुंबासमेवेत चांगला वेळ व्यतीत कराल.

सिंह- सामाजिक स्तर उंचावेल. कठिण परिस्थिवर मात कराल. मन प्रसन्न असेल. आर्थिक अडचणी दूर होतील. नवी जबाबदारी मिळेल.

कन्या- आजचा दिवस तुमच्यासाठी सर्वसामान्य असेल. नव्या गुंतवणुकीचे बेत आखाल. आजूबाजूला बऱ्याच घडामोडी घडतील. काम आणि मेहनतीमध्ये समतोल असेल.

तुळ – कोणतंही काम कुठंही अडणार नाही. संकोचलेपणा दूर होईल. आर्थिक परिस्थिती सुधारेल. प्रत्येक काम लाभदायी ठरणार आहे. वेळेला महत्त्व द्या.

वृश्चिक- पद आणि वेतन वाढेल. कोणा एका नव्या ठिकाणी जाण्याची संधी मिळेल. नव्या गोष्टी तुम्हाला खुप काही शिकवून जातील. शक्य तितकं वास्तववादी राहा. एखादा लहानसा प्रवास करावा लागू शकतो.

धनु- महत्त्वपूर्ण लोकांची भेट घडू शकते. काही नाती अधिक दृढ होतील. नवी जबाबदारी मिळेल. काही प्रश्न मात्र मनात घर करतील.

मकर- नोकरी आणि व्यापाराच्या ठिकाणी नव्या संकल्पना अंमलात आणाल. काही नव्या जबाबदाऱ्यांचं ओझं तुमच्यावर असेल. नवं घर खरेदीसाठी पुढे याल.

कुंभ- जुनी नाती आणखी दृढ होतील. एखादं नवं काम हाती घेण्यासाठी प्रयत्न करा, यश मिळेल. नवी जबाबदारी मिळेल. इतरांची मदत करण्यात पुढाकार घ्याल. विचाराधीन कामं पूर्ण होतील. नोकरीच्या ठिकाणी इतरांचं सहकार्य मिळेल.

मीन- जीवनात एखादा मोठा आणि तितकाच महत्त्वाचा बदल घडेल. वेळ जास्त आहे, त्याचा फायदा करुन घ्या. एखाद्या नव्या योजनेवर काम करा. प्रेमसंबंधांमध्ये यश मिळेल.