rashi bhavishya

मेष- नोकरीच्या ठिकाणी मोठे बदल होण्याची शक्यता. अनुभवी लोकांच्या सल्ल्याचा फायदा होईल. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल. मात्र, आरोग्याची काळजी घ्या.

वृषभ- अचानक धनलाभ संभवतो. जुनी देणी संपतील, खर्चावर नियंत्रण ठेवण्यात यश मिळवाल. नोकरीच्या ठिकाणी नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता. मात्र, जपून बोला.

मिथुन- जुन्या चिंता मिटण्याची शक्यता. नोकरी आणि व्यवसायात नवीन कल्पना सुचतील. मात्र, व्यवसायात लगेचच कोणावरही विश्वास टाकू नका.

कर्क- नोकरीच्या ठिकाणी इतरांवर छाप पाडाल. अधिक पगारासाठी नव्या नोकरीचा विचार कराल. जुनी येणी वसूल होतील.

सिंह- नोकरी आणि व्यवसायात अपेक्षित सहकार्य न मिळाल्याने अडचणी येण्याची शक्यता. एकटेपणा जाणवेल. हातात असलेला पैसा भविष्यासाठी राखून ठेवा.

कन्या- नोकरी आणि व्यवसायात नव्या योजना आखाल. पैशांची आवक वाढेल. नोकरीसंबंधी एखादा निर्णय घेण्यासाठी शुभ दिवस. जोडीदाराकडून भेटवस्तू मिळू शकते.

तूळ- प्रलंबित कामे मार्गी लागतील. मात्र, नोकरी व व्यवसायात अपेक्षित सहकार्य न मिळाल्याने अडचणी उद्भवण्याची शक्यता. विवाहोच्छुकांना लग्नाचा प्रस्ताव चालून येईल.

वृश्चिक- व्यवसायाच्यादृष्टीने उत्तम दिवस. नोकरीतही जुनी मागे मार्गी लावाल. हितशत्रूंना शह देण्यात यशस्वी व्हाल.

धनु- नोकरी आणि व्यवसायात अडथळे येण्याची शक्यता. एखाद्या कामाच्यानिमित्ताने परगावी जावे लागेल. विवाहोच्छुकांना लग्नाचा प्रस्ताव चालून येईल.

मकर- आजच्या दिवसात अनेक घडामोडी घडतील. ऑफिसमध्ये एखादी नवीन जबाबदारी मिळेल. आरोग्य आणि भावनिक स्थितीही चांगली राहील.

कुंभ- नोकरी आणि व्यवसायात प्रगतीच्या नव्या संधी चालून येतील. जोडीदाराची मदत होईल. नोकरीच्या ठिकाणी कामाची पद्धत बदलल्याने फायदा होऊ शकतो.

मीन- कामात अडथळे आल्यामुळे जास्त मेहनत करावी लागण्याची शक्यता. नोकरी बदलताना विचारपूर्वक निर्णय घ्या. अतिघाईमुळे नुकसान होऊ शकते.