राशिभविष्य १८ सप्टेंबर ; सावधान ! ‘या’ राशीच्या लोकांना आज मित्रांसोबत स्वतःचे गुपित शेअर करणे भविष्यात तापदायक ठरू शकते.

  मेष (Aries) :

  शनिवार आपल्याला फायदा मिळवून देणारा ठरेल. नव्या लोकांसोबत काम करणं फायद्याचं ठरेल. प्रॉपर्टीमधून चांगले रिटर्न मिळतील. प्रॉब्लेम शेअर करण्याने मन हलकं होईल. विद्यार्थ्यांना परीक्षा-स्पर्धेत यश मिळेल. नशीब तुम्हाला साथ मिळेल. भावंड आणि मित्रांसह अधिक वेळ घालवाल.
  शुभ रंग आणि अंक : केशरी, 6

  वृषभ (Taurus) :

  समस्यांचा सामना करावा लागणार आहे. आपणं करत असलेल्या कामावर लक्ष केंद्रीत करा. सकारात्मक परिणाम लवकरच मिळतील धीर सोडू नका. कुटुंबात एकप्रकारे शुभ कार्यक्रम घडतील, ज्यामध्ये तुम्ही सहभागी व्हाल. शिक्षण मिळवण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे.
  शुभ रंग आणि अंक : जांभळा, 4

  मिथुन (Gemini) :

  महत्त्वाची कामं पार पडतील. आपल्यावर अनेक महत्त्वाच्या जबाबादाऱ्या येतील. कामाच्या ठिकाणी फायदा होईल. कुटुंबासाठी आज आर्थिक खर्च होईल. तुम्हाला विनम्र होऊन बोलावं लागेल. देवाची उपासना करा, यामुळे मानसिक शांती मिळेल. परिश्रमानुसार यश मिळेल.
  शुभ रंग आणि अंक : निळा, 8

  कर्क (Cancer) :

  आईकडून फायद्याची गोष्ट मिळेल. ओळखीच्या लोकांसोबत व्यवसाय करणं फायद्याचं ठरेल. संतती प्राप्तीचा विचार करत असाल तर उत्तम योग आहे. पार्टनरसोबत शनिवारचा दिवस संमिश्र स्वरुपाचा जाईल. नोकरीत तुमच्या वरिष्ठांकडून तुम्हाला प्रशंसाही मिळेल. तुमचे सर्व कामं यशस्वी होतील.
  शुभ रंग आणि अंक : लाल, 7

  सिंह (Leo) :

  तुमच्यावर मोठी जबाबदारी येऊ शकते. चांगल्या ठिकाणी आपलं मुक्त संचार करू शकता. नव्या वाटा शोधाल. नोकरी-व्यवसायात नव्या संधी मिळतील. विद्यार्थी परीक्षांमध्ये चांगली कामगिरी करतील पण त्यांच्या मनात भीती कायम राहील. तुमचे पैसे योग्य कामांमध्ये खर्च होतील.
  शुभ रंग आणि अंक : गुलाबी, 3

  कन्या (Virgo) :

  आर्थिक स्थिती उत्तम राहील. फायद्याची गोष्ट घडेल. व्यवसायात समजूरदारपणा महत्त्वाचा आहे. आपला दृष्टीकोन आर्थिक फायदा लक्षात घेणारा असायला हवा. आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढा आणि कुटुंबासमवेत वेळ घालवा. दरम्यान आजच्या दिवशी कामात उत्साह असेल.
  शुभ रंग आणि अंक : निळा, 7

  तूळ (Libra) :

  पार्टनरसोबत भेटीगाठ होण्याचा योग आहे. मुलांमुळे घरात आनंदाचं वातावरण राहील. व्यवसायात मोठा फायदा होईल. तुम्ही कामात चांगले पैसे कमवाल. तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत होईल. कुटुंबातील सदस्यांसह तुम्ही चांगला वेळ घालवाल. तुमचं आरोग्य बिघडू शकते. तुम्ही अस्वस्थ रहाल.
  शुभ रंग आणि अंक : तांबडा, 3

  वृश्चिक (Scorpio) :

  शनिवार आपल्यासाठी उत्कृष्ट परिणामकारक असेल. नोकरीच्या नव्या संधी मिळतील. व्यवसाय सुरू कऱण्याचा विचार असेल तर योग्य निर्णय आहे. येणाऱ्या वेळेत आपल्याला चांगला फायदा मिळेल. व्यावसायिक वर्गासाठी गोष्टी थोड्या सामान्य राहतील.
  शुभ रंग आणि अंक : पिवळा, 4

  धनु (Sagittarius) :

  आर्थिक स्थिती सुधारेल. व्यवसायिकांसाठी संमिश्र स्वरुपाचा दिवस असेल. नातेवाईकांसोबत शनिवारचा दिवस तणावपूर्ण राहील. भांडणापासून दूर राहाणं हिताचं ठरणार आहे. कामातील एखाद्याच्या सहकार्याचा फायदा मिळेल. दिवस चांगला सुरू होईल. नवीन उत्साह तुमच्यामध्ये दिसेल.
  शुभ रंग आणि अंक : हिरवा, 6

  मकर (Capricorn) :

  शनिवारी आपलं भाग्य जोरावर असेल. अवघड समस्य़ांवरही तोडगा मिळेल. आर्थिक फायदा होईल. पण मित्रांसोबत स्वतःचे गुपित शेअर करणे भविष्यात अडथळा आणू शकते. प्रमोशन होण्याची चिन्हं आहेत. व्यापाऱ्यांच्या फायद्याची परिस्थिती आहे.
  शुभ रंग आणि अंक : आकाशी, 2

  कुंभ (Aquarius) :

  शनिवारचा दिवस या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ असणार आहे. भाग्य आपल्याला साथ देईल. कामाच्या ठिकाणी चांगला वेळ जाईल. वातावरण आनंदी असेल. नोकरीत पदोन्नती होण्याची शक्यता आहे. कामाच्या क्षेत्रात नफा मिळण्याची स्थिती आहे. तुम्हाच्या नशिबाची साथ मिळणार आहे.
  शुभ रंग आणि अंक : पांढरा, 5

  मीन (Pisces) :

  शनिवारचा दिवस आपल्यासाठी चांगला असेल. दुसऱ्यांची अडचण समजण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. व्यापार आणि सरकारी योजनेत आपल्याला फायदा होईल. कामाच्या निमित्ताने प्रवास होईल. महिलांसाठी दिवस चांगला असेल. नोकरी करणारे लोक नोकरीतील अडथळ्यांमुळे त्रस्त होतील.
  शुभ रंग आणि अंक : सोनेरी, 1