राशिभविष्य २२ सप्टेंबर, २०२१; सावधान ! ‘या’ राशीच्या लोकांनी हाताबाहेर गेलेली परिस्थिती हाताळण्यासाठी समजूतदारपणा स्वीकारून शांत डोक्यानं काम करावे.

  मेष (Aries) :

  सकाळची सुरुवात आनंददायी आणि चांगली होईल. कामासंदर्भातील गोष्टींमध्ये प्रगती दिसून येईल. व्यवसायासंदर्भातील समस्या बुधवारी निकाली निघू शकतात. गुंतवणूकीबाबत सल्ले मिळतील. तडजोड करुन काम पूर्ण करुन घ्या.
  शुभ रंग आणि अंक : निळा, 8

  वृषभ (Taurus) :

  बुधवारी तुमचं नशिब जोरदार असणार आहे. तुम्हाला चांगल्या संधी मिळू शकतात. संपत्ती किंवा आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. कामाचा दिवस चांगला जाईल. आपल्या कामात मदत करण्यासाठी आई-वडील सर्वतोपरी प्रयत्न करतील.
  शुभ रंग आणि अंक : जांभळा, 4

  मिथुन (Gemini) :

  चांगली बातमी मिळण्याचे संकेत आहेत. कामाबाबत तुम्हाला सल्ला मिळेल. समाजात आदर सन्मान मिळेल. आर्थिक बाजू ही अपेक्षेपेक्षा अधिक भक्कम असेल. रोजागारात प्रगतीच्या दिशेने वाटचाल होईल. आरोग्य उत्तम राहिल मात्र हलगर्जीपणा करु नये.
  शुभ रंग आणि अंक : केशरी, 6

  कर्क (Cancer) :

  आजचा दिवस फार अनुकूल असेल. व्यवसायात प्रगती करण्याची संधी मिळेल. सरकारी कर्मचाऱ्यांची अडकलेली कामं तडीस जातील. कुटुंबातील सदस्याची समस्या जाणून त्याची मदत करा. अडचणींपासून मुक्ती मिळण्यासाठी आजचा दिवस आहे.
  शुभ रंग आणि अंक : तांबडा, 3

  सिंह (LEO) :

  स्वत:ला प्रोत्साहित असल्याचं जाणवेल. नव्या गोष्टींबाबत जाणून घेण्यासाठी उत्सुकता असेल. भाग्यावर अवलंबून न राहता मेहनतीवर लक्ष द्या. गुंतवणूक करण्याची संधी मिळेल. कर्जमुक्त व्हाव. पाल्य शिक्षणात यशस्वी होईल. त्यामुळे कुटुंबात आनंदाचं वातावरण असेल.
  शुभ रंग आणि अंक : निळा, 7

  कन्या (Vigro) :

  स्वत:वर विश्वास असेल. काम पद्धतीशीर पूर्ण कराल. स्वप्न पूर्ण करण्याची योग्य वेळ आहे. आर्थिक स्थिती भक्कम राहिल. व्यवसाय आणि कामासंबधित थकलेले पैसे मिळतील. व्यवसायात फायदेशीर व्यवहार होतील.
  शुभ रंग आणि अंक : गुलाबी, 3

  तूळ (Libra) :

  राशीच्या लोकांसाठीही बुधवारी अनुकूल असेल. सकारात्मक विचार भविष्य सावरण्यात सहाय्यक ठरतीलय. आर्थिक स्थिती योग्य असेल. नवीन मित्र बनतील. घरच्यांची इच्छा समजून घ्याल.
  शुभ रंग आणि अंक : सोनेरी, 1

  वृश्चिक (Scorpio) :

  आवडत्या कामांसाठी उत्सुक असाल. खास व्यक्तीशीं तुमचं निकटचे नाते कायम राहील. बुधवारी तुमचं उत्तपन्न वाढीचा योग आहे. योजना करुन काम कराल तर यशस्वी व्हाल. संपत्ती आणि मालमत्तासंदर्भात व्यवहार करताना कागदपत्र काळजीपूर्वक पाहाल.
  शुभ रंग आणि अंक : आकाशी, 2

  धनु (Sagittarius) :

  तुम्हाला एखादी महत्त्वाती गोष्ट माहित होईल. भाग्य तुमच्या सोबत असेल, त्यामुळे वेळेचा सदुपयोग कराल. अचानक भयानक लाभ होईल. नवीन व्यवसाय करण्याच्या बेतात असाल, तर सावध राहा. तरुणांना नोकरी मिळू शकते.
  शुभ रंग आणि अंक : पांढरा, 5

  मकर (Capricorn) :

  मनाचा आवाज ऐका. पुढे जाण्यासाठी आजचा शुभ दिवस आहे. जमिन-वाहन खरेदी करण्याची इच्छा होईल. पैशांचा विचारपूर्वक वापर कराल. न्यायलयीन कामातून दिलासा मिळेल. घरात शुभ कार्याबाबत योजना होतील. आज घाईगडबडीत कोणताही निर्णय घेऊ नये. अन्यथा मोठ्या संकटात सापडू शकतील.
  शुभ रंग आणि अंक : हिरवा, 6

  कुंभ (Aquarius) :

  व्यवहारात सकारात्मक बदल होतील. नवीन मोबाईल घेण्याचा विचार येईल. दुकानदारांनी ग्राहकांसोबत चांगल्याशी व्यवहार करावा. नोकरीत प्रमोशन होण्याची चिन्हं आहेत. तुम्ही ठरवलेल्या गोष्टींबाबत कोणाला सांगू नका.
  शुभ रंग आणि अंक : पिवळा, 4

  मीन (Pisces) :

  आयुष्यात पुढे जाण्यासाठी नवे मार्ग सापडतील. जोडीदाराला विश्वासात घेऊन काम करा. उत्पन्न चांगलं होईल. आत्मविश्वास वाढेल. वर्क टु होम करणाऱ्यांवर वरिष्ठ खूश असतील. हाताबाहेर गेलेली परिस्थिती हाताळण्यासाठी समजूतदारपणा स्वीकारून शांत डोक्यानं काम करावे.
  शुभ रंग आणि अंक : लाल, 7