२४ ऑगस्ट २०२१, दैनिक राशिभविष्य; ‘या’ राशीच्या लोकांना विरोधक अपमानित करण्याचा प्रयत्न करतील; विनाकारण सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळावे.; जाणून घ्या तुमचे आजचे राशिभविष्य

  मेष (Aries):

  बुद्धीमता आणि चतुराईची ओळख देणारा आजचा दिवस ठरेल. रखडलेली सर्व काम पूर्ण होतील. वाणी मधर ठेवा आणि मित्र परिवारासोबत वेळ घालवाल. घरात मंगल कार्य घडेल. दिवसभर पैशांविषयी विचार कराल. नवीन कामं हाती घेण्यासाठी इच्छूक असाल तर अणखी नवीन कामे हाती लागतील.
  आठवड्याचा शुभ रंग आणि अंक : जांभळा, 4

  वृषभ (Taurus):

  आज उत्साहात आपली सगळी काम पूर्ण कराल. विद्यार्थ्यांना यश मिळेल. नोकरीत नवीन काही तरी शिकायला मिळेल. मन प्रसन्न असेल. व्यापाऱ्यांना सामाजिक वर्तुळ वाढवण्यावर भर द्यावा लागेल. पैशाच्या बाबतीत सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.
  आठवड्याचा शुभ रंग आणि अंक : निळा, 8

  मिथुन (Gemini):

  मंगळवारी कामात चांगल यश मिळेल. मेहनत आणि भाग्याचा उत्तम अनुभव आज मिळेल. आर्थिक स्थिती चांगली राहिल. आज चतुराईने आपलं काम पूर्ण कराल. काही कामात चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात नवीन भागीदार जोडले जाऊ शकतात. पैशाशी संबंधित काही बाबींमध्ये कमी ताण असेल.
  आठवड्याचा शुभ रंग आणि अंक :  केशरी, 6

  कर्क (Cancer):

  तुम्ही तुमच्या वडिलांचा आणि सज्जनांचा आदर करण्यात आघाडीवर असाल. दिवसाची सुरुवात एका चांगल्या बातमीने होणार आहे. कामात चांगले आर्थिक लाभ होतील. आपण पैसे देखील वाचवू शकता. गोंधळात अडकलेल्या परिस्थितीतून चांगला मार्ग निघण्याची शक्यता आहे. धैर्य ठेवा त्याचप्रमाणे प्रयत्न चालू ठेवा. धनलाभ हेण्याची शक्यता आहे.
  आठवड्याचा शुभ रंग आणि अंक : तांबडा, 3

  सिंह (Leo):

  भाग्य तुमच्या सोबत असेल. तुम्ही तुमच्या मित्र आणि परिचितांसोबत चांगला वेळ घालवाल. नवीन व्यवसाय योजनेवर काम करण्यासाठी हा काळ उत्तम आहे. नोकरीच्या ठिकाणी तुम्ही काही जणांवर प्रभाव पाडण्यात यशस्वी ठराल. नोकरी बदलण्याच्या किंवा जास्त कमाई करण्याच्या मार्गांचा विचार करु शकता.
  आठवड्याचा शुभ रंग आणि अंक : निळा, 7

  कन्या (Virgo):

  कामासाठी आजचा दिवस चांगला आहे. नवीन मित्राच्या मदतीने तुम्हाला तुमच्या योजनांमध्ये अपेक्षित यश नक्कीच मिळेल. आर्थिक स्थिती चांगली राहील, पण अचानक खर्चही वाढणार आहेत. नशीब तुमच्या सोबत आहे. तुम्ही तुमचे काम प्रामाणिकपणे कराल. तुमच्या वागण्यात अधिक सकारात्मकता असेल. पैशाच्या बाबतीत, लोभाची परिस्थिती टाळण्याचा प्रयत्न करा.
  आठवड्याचा शुभ रंग आणि अंक : गुलाबी, 3

  तुळ (Libra):

  तुम्ही चांगल्या लोकांशी संपर्क प्रस्थापित कराल, जे तुम्हाला कामात यश मिळवण्यासाठी मदत आणि मार्गदर्शन करतील. नवीन मैत्री तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी उपयुक्त ठरेल. नशिबाची चांगली साथ मिळेल. तुमच्या जिद्दीमुळे कुटुंबाला त्रास होईल. आपल्या महत्वाच्या गोष्टी कोणाशीही शेअर करू नका. आईसोबत वेळ घालवणे तुमच्यासाठी चांगले राहील.
  आठवड्याचा शुभ रंग आणि अंक : भगवा, 1

  वृश्चिक (Scorpio):

  विनाकारण आज कोणाशी भांडण होईल. आरोग्याच्या दृष्टीने तुमचे आरोग्य चांगले राहील. शरीरात चपळता राहील, नोकरी किंवा व्यवसायात चांगले यश मिळेल. तुम्ही तुमचे लक्ष चांगल्या कामावर केंद्रित कराल. तुम्हाला विरोधक अपमानित करण्याचा प्रयत्न करू शकतात. विनाकारण सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळा.
  आठवड्याचा शुभ रंग आणि अंक : आकाशी, 2

  धनु (Sagittarius):

  मंगळवारी तुमचे वर्तन अतिशय सौम्य असेल. वागण्यातील बदल हा इतरांसाठी चर्चेचा विषय बनेल. आपल्या आरोग्याबाबत निष्काळजी राहू नका. तुम्ही तुमच्या कामात परिश्रमपूर्वक काम कराल आणि कोणाच्या मदतीने तुम्हाला चांगले पैसे मिळतील. घरातील वडिलांच्या सल्ल्याचे पालन करणे फायदेशीर ठरेल. वैवाहिक चर्चेतील यशाने तरुण उत्साही होतील.
  आठवड्याचा शुभ रंग आणि अंक : पांढरा, 5

  मकर (Capricorn):

  तुमचा दिवस अधिक चांगल्या प्रकारे सुरू होणार आहे. तुम्ही तुमच्या हातात जे काही काम कराल त्यात तुम्ही यशस्वी व्हाल. इतरांबरोबर मिळून केलेल्या कामातही चांगले लाभ होतील. मनात सकारात्मक विचार निर्माण होतील. मालमत्तेशी संबंधित बाबींचे निराकरण होईल. तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करू शकता. घरातून बाहेर पडताना काळजी घ्या.
  आठवड्याचा शुभ रंग आणि अंक : हिरवा, 6

  कुंभ (Aquarius):

  तुम्ही तुमच्या शत्रूंना तुमच्यावर वर्चस्व मिळू देणार नाही, पण तुम्ही त्यांना पराभूत करण्यात यशस्वी व्हाल. नशीब तुमच्या सोबत असणार आहे. कुटुंब आणि मित्रांसोबत बाहेर जाल, त्यांना चांगला पाठिंबा मिळेल. आरोग्यासाठीही दिवस चांगला आहे. आर्थिक बाजू पूर्वीपेक्षा मजबूत होईल. व्यापाऱ्यांना कायदेशीर नौटंकीपासून दूर राहावे लागेल. नोकरीच्या क्षेत्रात सहकाऱ्यांची पूर्ण साथ मिळेल.
  आठवड्याचा शुभ रंग आणि अंक : लाल, 7

  मीन (Pisces):

  तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. कामाच्या ठिकाणी चांगला दिवस जाईल. घरात पाहुण्यांच्या आगमनामुळे घरातील वातावरण प्रसन्न राहील. तुमच्या मनात तुमच्या शिक्षकांबद्दल आणि वडिलांबद्दल आदर भावना वाढेल. पैसे आणि मौल्यवान वस्तूंबाबत अधिक सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. तरुणांना अपेक्षित रोजगार मिळू शकतो.
  आठवड्याचा शुभ रंग आणि अंक : पिवळा, 4