राशी भविष्य दि. २४ फेब्रुवारी २०२१; या राशीच्या लोकांना धनलाभ होण्याचे संकेत आहेत

  मेष- स्वतःवर नियंत्रण ठेवा. तुमचा राग तुमच्या तोट्याचं कारण ठरू शकतो. घरात काही बतल करण्याआधी मोठ्यांचा सल्ला नक्की घ्या. जीवनसाथीचे विचार समजून घ्या. अडकलेले पैसे मिळू शकतात.

  वृषभ- काही घटना तुमच्या अडचणींचं कारण ठरू शकतात. लवकर पैसे कमवण्याची इच्छा मनात घर करेल. त्यासाठी तुम्हा मेहनत देखील घ्याल. जवळचे मित्र भेटण्याची शक्यता आहे. विवाहाचे प्रस्ताव येतील.

  मिथुन- तुमच्या आवडीची कामं करण्यासाठी उत्सुक असाल. आर्थिक परिस्थिती सुधारेल. दिवसाची सुरूवात थोडी त्रासदायक आहे, मात्र शेवट चांगला आहे. मित्रांसमवेत चांगला वेळ व्यतीत करण्याची संधी आहे. काही सकारात्मक बदल घडतील.

  कर्क- ध्यान आणि आत्मचिंतन आरोग्यास लाभदायक ठरेल. नोकरी करणाऱ्या लोकांना आज पैशांची गरज भासेल. पण गेल्या काही दिवसांमध्ये केलेल्या खर्चांमुळे पैशांची कमतरता भासेल. मोठ्यांचा सल्ला लाभदायक ठरेल. वैवाहिक जीवन चांगलं असेल. आरोग्याकडे लक्ष द्या.

  सिंह- तुमचा साधा स्वभाव तुमच्यासाठी त्रासदायक ठरेल. मात्र मित्र तुमच्या मदतीसाठी धावून येतील. तणावापासून लांब जाण्यासाठी संगीत ऐका. अर्थिक परिस्थिती उत्तम राहील. दिवस व्यस्त असेल. जीवनसाथीच्या सवयींमुळे तुम्हाला त्रास होईल.

  कन्या- नोकरी किंवा व्यवसायात यश मिळण्याची शक्यता आहे. कोणत्यातरी गोष्टीप्रती उत्सूक राहाल. चांगल्या बोलण्याने तुमचे प्रयत्न यशस्वी होतील. महत्त्वपूर्ण बोलणी आणि मुलाखती यशस्वी होतील. प्रवास दौऱ्यांचे बेत आखाल. जुने मित्र आणि नातेवाईकांशी भेट होईल. कुटुंबाकडून प्रेम मिळेल. राशीमध्ये चंद्र असल्यामुळे प्रकृतीत सुधारणा होतील. धैर्याने पावलं उचला.

  तुळ- जास्त मेहनत करण्यासाठी तयार राहा. त्याचं फळही तुम्हाला मिळणार आहे. आरोग्याकडे लक्ष द्या. दिवस चांगला आहे. दुःख नष्ट होतील. रिकाम्या वेळेचा आज तुम्ही फायदा कराल. जीवनसाथीसोबत अनेक गोष्टी शेअर कराल. दिवस तणावमुक्त असेल.

  वृश्चिक- विचार केलेल्या कामांमध्ये यश मिळेल. तुमची कामं पूर्ण होत जातील. ताऱ्यांची स्थिती पाहता दिवस महत्त्वपूर्ण असेल. करिअरमध्ये पुढे जाल, योग्यता सिद्ध करण्याची संधी मिळेल. प्रेमसंबंधामध्ये चांगले बदल होणार. पैशांच्या बाबतीत परिस्थिती सुधारेल. बाहेर फिरायला जाण्याचे बेत आखले जातील. धनलाभ होण्याचे संकेत आहेत.

  धनू- महत्त्वाचे सल्ले मिळतील, त्यांवर चर्चा करण्याविषयी सुधरणांवर भर द्या. नवी माहिती तुम्हाला प्रोत्साहित करेल. सकारात्मक दृष्टीकोन राहिल. अविवाहीतांच्या प्रेमसंबंधामध्ये तणाव येऊ शकतो. व्यवसायात फायदा मिळेल. सुखद आणि आनंददायक असा दिवस राहील. तुम्ही स्वत:मध्ये काही बदल करु शकाल. महत्त्वाच्या कामांसाठी विश्वासार्ह व्यक्तींकडून मदत मिळेल.

  मकर- नवे लोक तुमच्याशी जोडले जातील. आवडत्या व्यक्तींसोबतचे संबंध सुधारणार. जास्तच क्लिष्ट गोष्टी, अडचणी समोर आल्या तर त्या टाळण्याचा प्रयत्न करा. भावंडांचं सहकार्य लाभेल. अडकलेले पैसे परत मिळतील. व्यवसायाच्या कामात व्यस्त असेल. सन्मान मिळेल. अपेक्षा आहे त्या व्यक्ती तुम्हाला वेळ देतील.

  कुंभ- मोठ्या बदलासाठी तयार राहा. काही लोक तुमच्याकडून फार अपेक्षा ठेवतील. गुंतवणूकीच्या बाबतीत नवे सल्ले मिळतील. धनलाभ होण्याची शक्यता. प्रभावी व्यक्तिमत्वाच्या लोकांची भेट होण्याची शक्यता. दाम्पत्य जीवनात सुख. अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील. परिवारात सुख मिळेल.

  मीन- साथीदाराच्या अपेक्षा पूर्ण होतील. पैशांच्या बाबतीत नव्या योजना आखाल. नव्या गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. कर्ज फेडण्याकडे तुमचा कल असेल. कुटुंबाला वेळ द्या. अचानक फायदा होऊ शकतो. धनलाभ होण्याची शक्यता आहे. नोकरी आणि व्यवसायात रेंगाळलेली कामं पूर्ण होणार.