दैनिक राशिभविष्य : २१ ऑगस्ट, २०२१; आज ‘या’ राशीच्या लोकांना बचत योजनेत केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल. कामाच्या संबंधात विरोधकांच्या कारवायांना आवर घालावा लागेल. ; जाणून घ्या तुमचे आजचे राशिभविष्य !

  मेष (Aries) :

  शनिवारी तुमचा उत्साह दांडगा असेल. आर्थिक गोष्टींकरता आजचा दिवस शुभ आहे. महिला किचनच्या कामात अधिक सतर्क राहतील. तसेच काहीजण आज छोटोसा व्हॅकेशन प्लान करतील. कोणताही मोठा निर्णय घेताना विचार करून त्याला अंतिम करा. प्रियकरासोबत थोडा अबोला निर्माण होण्याची शक्यता. विद्यार्थ्यांना स्पर्धा क्षेत्रात यश मिळेल. आक्रमकता वाढेल.
  आठवड्याचा शुभ रंग आणि अंक :निळा, 8

  वृषभ (Taurus) :

  शनिवार तुमच्यासाठी मस्त असणार आहे. आज समृद्धीकडे वाटचाल करेल. व्यापार आणि कामात वाढ होईल. वैवाहिक गोष्टींची चर्चा सुरू असेल तर यश मिळेल. कार्यक्षेत्रात चांगल्या संधी मिळू शकतात. आर्थिक लाभासाठी चांगल्या संधी मिळतील. कामाच्या ठिकाणी स्वतःच्या अपेक्षा पू्र्ण करण्याचा दिवस आहे.
  आठवड्याचा शुभ रंग आणि अंक : लाल, 7

  मिथुन (Gemini) :

  आज कोणताही विचार केलात तर त्यामध्ये यश मिळेल. भाग्यात वाढ होण्याची शक्यता. व्यापारात पार्टनशिर करू नका. मनातील गोष्ट शेअर करा. आपण कोणतीही मालमत्ता खरेदी करू शकता. जवळच्या मित्राचा सल्ला तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. तुमची मेहनत रंग भरेल.
  आठवड्याचा शुभ रंग आणि अंक : जांभळा, 4

  कर्क (Cancer) :

  शनिवार तुमच्यासाठी खास असेल. कोणत्याही प्रकारचा व्यवहार करताना काळजी घ्या. व्यवहारात परिवर्तन करण्याची गरज आहे. घरात आणि बाहेरही प्रसन्न वातावरण अशेल. पत्नीसोबत खरेदीसाठी गेल्यास अतिरिक्त खर्च करणं टाळा. गरजूंना मदत केल्याने समाधान मिळेल. आत्मविश्वास अधिक वाढेल. सहकाऱ्यांकडून उत्तम प्रतिसाद मिळेल.
  आठवड्याचा शुभ रंग आणि अंक : केशरी, 6

  सिंह (Leo) :

  आपल्या खासगी कामात अधिक लक्ष द्या. कोणत्या नवीन व्यवसायात गुंतवणूक करण्याचा विचार करू शकतात. परदेशात काम करणाऱ्यांसाठी आजचा शनिवार महत्वाचा. व्यापाऱ्यांनी विश्वासाने काम करावं. तुम्हाला तुमच्या कामात यश मिळेल. तुम्हाला नवीन नोकरी मिळू शकेल.
  आठवड्याचा शुभ रंग आणि अंक : तांबडा, 3

  कन्या (Virgo) :

  आज नवीन जोश असेल. चांगल्या गोष्टी समोर घडतील. नवीन व्यवहारांकडे लक्ष द्या. नवीन जबाबदाऱ्या अंगावर पडतील. घरात चांगले बदल होतील. एखादं मोठं ध्येय साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील. बचत योजनेत केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल. कामाच्या संबंधात विरोधकांच्या कारवायांना आवर घालावा लागेल.
  आठवड्याचा शुभ रंग आणि अंक : निळा, 7

  तूळ (Libra) :

  शनिवार तुमच्यासाठी स्पेशल असेल. मार्केटिंग क्षेत्रातील लोकांना आजचा दिवस वेगळा असेल. व्यवहारात यश मिळेल. उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. सध्या सुरू असलेल्या कामात प्रगती होईल. युवकांना परदेशी कामाच्या संधी आकर्षित करू शकतात. नोकरी करणार्‍यांसाठी दिवस चांगला असेल.
  आठवड्याचा शुभ रंग आणि अंक : गुलाबी, 3

  वृश्चिक (Scorpio) :

  शनिवारी जो शब्द द्याल तो पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. कामात चांगल्या डील यशस्वी होतील. उत्साह चांगला असेल. कामाच्या ठिकाणी संयम ठेवा. तुमच्यासाठी निश्चित परिणामकारक असेल. आपल्या क्षमतेनुसार आपल्याला लाभ मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. पैशाची आणि व्यवसायाची काळजी घ्यावी लागेल. आपण घरी वापरलेल्या वस्तू खरेदी करू शकता.
  आठवड्याचा शुभ रंग आणि अंक : पिवळा, 4

  धनु (Sagittarius) :

  आजच्या कामात यश मिळेल. बचत गोष्टीत गुंतवणूक कराल. कामात प्रगती कराल. मोठे बदल होतील. तुमची बुद्धी तुम्हाला प्रत्येक कामात साथ देईल. कामाच्या ठिकाणी कोणत्याही कार्याचा निकाल उत्कृष्ट असेल. इतर मार्गाने पैसे मिळतील. कर्जासंबंधित बाबतीत प्रगती होईल. करियरच्या बाबतीत तरुणांनी स्वत: मध्ये थोडा बदल घडवून आणण्याची गरज आहे.
  आठवड्याचा शुभ रंग आणि अंक : पांढरा, 5

  मकर (Capricorn) :

  आज व्यवहार फार चांगले होतील. मुलांकरता ऑनलाईन शॉपिंग करा. प्रियजनांवर अवलंबून असाल. ऑटोमोबाईलशी संबंधित लोकांना याचा फायदा होईल. सर्वसाधारणपणे पैसे मिळू शकतात. पत्नीसोबत खरेदीसाठी गेल्यास अतिरिक्त खर्च करणं टाळा. गरजूंना मदत केल्याने समाधान मिळेल. आत्मविश्वास अधिक वाढेल.
  आठवड्याचा शुभ रंग आणि अंक : हिरवा, 6

  कुंभ (Aquarius) :

  आज तुम्ही बोलण्याने लोकांना प्रभावित कराल. आपला सगळा फोकस टार्गेटवर ठेवा. प्रॉपर्टीत गुंतवणूक कराल. कामाप्रती निष्ठा ठेवा. कुटुंबात शुभ कार्य संपन्न होतील. दुसर्‍याचं मत काळजीपूर्वक ऐका. जर तुम्हाला आज खरोखर फायदा हवा असेल तर. तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. घरून काम करणार्‍या लोकांची कामं वेळेवर पूर्ण होतील. विद्यार्थी आणि श्रमिक वर्गासाठी आजचा दिवस महत्वाचा राहील.
  आठवड्याचा शुभ रंग आणि अंक : आकाशी, 2

  मीन (Pisces) :

  आपला दिवस सुवर्णमय होणार आहे. समाजात चांगली कामं केल्याबद्दल लोक तुमची प्रशंसा करतील. तुमचं उत्पन्न वाढवण्यासाठी आपण एखाद्याची मदत घेऊ शकता. व्यवसायात तुम्हाला नफा मिळू शकेल. दैनंदिन कामापेक्षा कार्यालयीन काम चांगलं होईल. नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. आजचा दिवस वेगळा आहे.
  आठवड्याचा शुभ रंग आणि अंक : निळा, 7