दैनिक राशिभविष्य : २२ ऑगस्ट, २०२१; आज ‘या’ राशीचे लोक आज प्रत्येक ध्येय आत्मविश्वासाने आणि मेहनतीने साध्य करतील. व्यवसाय वाढवण्यासाठी बँकेकडून कर्ज घेत असाल तर सावधानी बाळगण्याची आवश्यकता आहे.; जाणून घ्या तुमचे आजचे राशिभविष्य !

    मेष (Aries):

    आज तुमचं व्यक्तीमत्व आकर्षक राहील. घर, जमीनीबद्दल काही नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. ऑफिसमध्ये अर्धे राहीलेले काम पूर्ण कराल. मनात आलेल्या शंकांचे निराकरण होईल. तुम्हाला आदर मिळेल आणि काही नवीन जबाबदारी देखील मिळू शकते. तुम्हाला गुंतागुंतीच्या समस्यांवर उपाय सापडतील. तुमचा आत्मविश्वास आणि धैर्य शिगेला पोहोचेल. धैर्याने नवीन आव्हानांचा सामना करा, मार्ग सोपा होईल.
    आजचा शुभ रंग आणि अंक : जांभळा, 9

    वृषभ (Taurus):

    मेहनतीचे फळ चांगले असेल, विचार केलेली कामे लवकर पूर्ण होतील. येणाऱ्या चांगल्या दिवसांसाठी बेत आखू शकाल. खास व्यक्तीसह मनातल्या गोष्टी शेअर कराल. व्यावसायिकांसाठी आजचा दिवस लाभदायक असेल. आर्थिक परिस्थिती सुधारल्याने तुम्ही खर्च करण्याच्या मनःस्थितीत असाल. नवीन कामात काही अडथळे येऊ शकतात. घाई करण्याऐवजी हळुवारपणे वागा. महिलांसाठी दिवस शुभ राहील. प्रत्येकाच्या प्रार्थनेचा परिणाम काही आनंदी परिणाम आणेल.
    आजचा शुभ रंग आणि अंक : गुलाबी, 3

    मिथुन (Gemini):

    गोंधळात अडकलेल्या परिस्थितीतून चांगला मार्ग निघण्याची शक्यता आहे. धैर्य ठेवा त्याचप्रमाणे प्रयत्न चालू ठेवा. धनलाभ हेण्याची शक्यता आहे. चांगली बातमी मिळेल. तुम्ही कुठेतरी दिलेले पैसे परत मिळवू शकता. नवीन नोकरीतून तुम्हाला भरपूर यश मिळेल. सासरच्या लोकांशी संभाषण होईल. तुम्ही प्रत्येक ध्येय आत्मविश्वासाने आणि मेहनतीने साध्य कराल. व्यवसाय वाढवण्यासाठी तुम्ही बँकेकडून कर्ज घेऊ शकता.
    आजचा शुभ रंग आणि अंक : बैगनी, 8

    कर्क (Cancer):

    करिअरच्या दृष्टीने दिवस चांगला आहे. नोकरीच्या ठिकाणी असणाऱ्यांना इतरांची मदत मिळेल. काही चांगले आणि महत्त्वाचे बदल होण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी आणि व्यापारामध्ये इतरांचा सल्ला मिळेल. धनलाब होण्यची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या. बँकिंग क्षेत्राशी संबंधित लोकांना काही चांगली बातमी मिळू शकते. पैशांच्या बाबतीत मनोरंजक ऑफर मिळू शकतात. आपला मुद्दा इतरांसमोर मोकळेपणाने ठेवा.
    आजचा शुभ रंग आणि अंक : लाल, 7

    सिंह (Leo):

    वरिष्ठांचं सहकार्य तसं कमीच मिळेल. व्यवसायात सावध राहा. जी कामं हाती घ्याल त्यात यश मिळेलच असं नाही. व्यापाराच्या निर्णयांमध्ये कोणाचा सल्ला घ्या. एकटेपणापासून दूर राहा. साथीदारासोबत एखादा प्रवास घडू शकतो. सरकारी कामात पैसे गुंतवण्याची शक्यता आहे. पैशाच्या व्यवहारात यश मिळेल. चांगल्या कामामुळे नोकरीत पदोन्नती आणि उच्च पद मिळण्याची चिन्हे आहेत.
    आजचा शुभ रंग आणि अंक : पांढरा, 5

    कन्या (Virgo):

    नोकरीच्या ठिकाणी तुम्ही काहीजणांवर प्रभाव पाडण्यात यशस्वी ठराल. नोकरी बदलण्याच्या किंवा जास्त कमाई करण्याच्या मार्गांचा विचार करु शकता. यामध्ये तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. काही बाबतीत अचानक फायदा मिळेल. तुम्ही काही व्यावसायिकबाबी हुशारीने हाताळू शकता. पैसा वाढू शकतो. कोणतेही काम करताना मन शांत ठेवावे. कौटुंबिक जीवनात काही नवीनपणा जाणवेल.
    आजचा शुभ रंग आणि अंक : हिरवा, 6

    तूळ  (Libra) :

    मनात चांगले विचार येतील. विश्वासातील लोकांकडून सल्ला घ्या. त्यांच्याकडून मदत मिळण्याची शक्यता आहे. प्रतिभा सिद्ध करण्यात यशस्वी रहाल. नविन शिकण्यात रस राहील. स्वत:वर संयम ठेवा. विचार केलेली कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. अवघड कामे देखील सहजपणे पूर्ण होतील. वेळेवर प्रकल्प राबवू शकतील. व्यवसायात नफ्याच्या संधी मिळतील. कुठल्या तरी ठिकाणाहून पैसे मिळण्याची वाट पाहत असेल.
    आजचा शुभ रंग आणि अंक : निळा, 7

    वृश्चिक (Scorpio):

    अविवाहीत लोकांसाठी दिवस चांगला आहे. विवाहीत लोकांना जीवनसाथीकडून मदत मिळेल. कामाच्या ठिकाणी काही लोकांकडून मदत मिळेल. चांगली बातमी मिळेल. कामात व्यस्त राहाल. व्यावसायिक जीवनात प्रत्येक प्रकरणावर स्पष्ट भूमिका ठेवा. व्यवसायाच्या दृष्टिकोनातून सर्व काही ठीक होईल. तुमचे उत्पन्न चांगले राहील. काही लोकांना परदेशात जाण्याची चांगली बातमी मिळू शकते. तुमच्या दिवसाची सुरुवात सामान्य राहील. तुम्ही पैशांची फेरफार करण्यात मग्न असाल.
    आजचा शुभ रंग आणि अंक : गुलाबी, 4

    धनु (Sagittarius):

    जुन्या अडचणी दूर होतील. परिस्थिती अनुकूल असेल. अडकलेली कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. व्यापार आणि नोकरीच्या बाबतीत काही नव्या कल्पना मिळतील. उत्साह वाढेल. कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका. साथीदारासोबत वाद होण्याची शक्यता आहे. जमीन आणि मालमत्तेशी संबंधित कामे होतील. जर महिलांना घरगुती व्यवसाय सुरू करायचा असेल तर आजचा दिवस चांगला असेल.
    आजचा शुभ रंग आणि अंक : आकाशी, 2

    मकर (Capricorn):

    अडचणींमधून मुक्त व्हाल. नवीन तंत्रज्ञानामुळे तुमचे काम सुखकर हेईल. नवीन वस्तू विक्री करण्याचे योग आहेत. व्यवसायात कुटुंबाकडून मदत मिळेल. नवीन कामाची सुरुवात करू शकता. प्रेमात यश मिळेल. महत्त्वाचे काम अनेक दिवसांपासून प्रलंबित असेल तर ते आज पूर्ण करा. तुम्ही चांगले आर्थिक नियोजन करू शकता. तरुणांना नवीन नोकऱ्या मिळण्याची शक्यता आहे. घरगुती खर्चात घट होऊ शकते.
    आजचा शुभ रंग आणि अंक : शेंदरी, 1

    कुंभ (Aquarius):

    नोकरीपेक्षा व्यवसाय करणारे लोक जास्त संतुष्ट राहतील. इतरांना मदत करण्याची संधी मिळेल. अपत्यांकडून सुख मिळेल. कामात यश मिळेल. वरिष्टांकडून कामाचे कैतुक होईल. तुम्हाला स्वतःला ऊर्जावान वाटेल. रखडलेल्या कामात गती मिळणे फायदेशीर ठरेल. कौटुंबिक मालमत्ता मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांचे मन अभ्यासात गुंतलेले असेल.
    आजचा शुभ रंग आणि अंक : कथ्था, 6

    मीन (Pisces):

    धनलाभ होण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती सुधारण्याची शक्यता आहे. काही प्रसंगी अचानक फायदा होण्याची शक्यता आहे. अत्मविश्वास वाढेल. आजुबाजूचे लोक तुमचं कौतुक करतील.  तुम्ही कुटुंबातील सदस्याबरोबर व्यवसाय करण्याचा विचार करत असाल तर ते चांगले होईल. कामाची स्थिती सुधारण्याची शक्यता आहे. संघर्ष तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार नाही.
    आजचा शुभ रंग आणि अंक : केशरी, 6