राशीभविष्य दि. २२ मार्च २०२१; या राशीच्या लोकांनी केवळ युक्तिवादाच्या आधारे निर्णय घ्यावा

  मेष- आज आपल्या डोक्यामागची कटकट दूर होईल. आपल्या हातात पैसा टिकणार नाही. मनाला शांतता मिळेल अशा गोष्टींमध्ये मन रमवा.

  वृषभ- आज आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्या. आज आपल्याकडून सर्वात जास्त पैसे खर्च होतील. वादविवादापासून दूर राहा. काही कारणांमुळे प्रवास करण्याचा योग.

  मिथुन- गुंतवणुकीसाठी आजचा दिवस खूप शुभं आहे. आपल्या कामात दूरदृष्टी ठेवा. कोणत्याची गोष्टीला बळी पडू नका. वैवाहिक जीवन सुखी होईल.

  कर्क- कोणताही निर्णय घेताना आपल्या मूल्यांपासून दूर जाऊ नका. केवळ युक्तिवादाच्या आधारे निर्णय घ्या. आज नवीन आर्थिक योजना तयार करू शकता. आशा आहे की तुम्हालाही यश मिळेल. प्रिय संघर्ष करू शकता.

  सिंह- आज खेळण्यासाठी आपण बाहेर पडाल. ध्यान आणि योग करा. मुलांचं आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. अचानक पाहुणे घरी येऊ शकतात.

  कन्या- पैशांची बचत करण्याकडे लक्ष द्या. वेळेचा योग्य उपयोग करा. कुटुंबात आज वादविवादाचा सामना करावा लागू शकतो. प्रिय व्यक्तीसोबत वेळ घालवाल.

  तुळ- चांगल्या निकालासाठी आपण कुटुंबाशी नाळ तोडू नये. आज आपल्याला प्रिय व्यक्तीची खूप आठवण येईल.

  वृश्चिक- प्रिय व्यक्ती आणि कुटुंबियांना आपण खूप मिस कराल. आईसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल.

  धनु- घाईगडबडीत कोणताही निर्णय घेऊ नका. पटकन घेतलेल्या निर्णयानं अडचणी निर्माण होतील.

  मकर- आज आपल्याला खूप जास्त आरामाची आवश्यकता आहे. गुंतवणूक करा.
  कुंभ – विचार करून प्रत्येक निर्णय घ्या. अन्यथा आपल्याला मोठ्या संकटाचा सामना करावा लागेल.

  मीन- समजूदार बना आणि शांत डोक्यानं परिस्थिती हाताळा. वायफळ खर्चावर वेळीच आळा घाला. प्रिय व्यक्तीचं आरोग्य बिघडू शकतं.