‘या’ राशीच्या व्यक्तींनी आर्थिक परिस्थितीची पुनर्रचना करताना काळजी घ्यावी. तरुणांना अधिक गोष्टी शिकण्याची आवश्यकता आहे.; जाणून घ्या आजचं राशीभविष्य.

  मेष (Aries) :

  तुमच्यात धैर्य, आत्मविश्वास आणि आशा यांचा संचार राहिल. तुम्ही व्यवसायाकडे पूर्ण लक्ष द्याल, त्यापासून तुम्हाला चांगला नफा मिळेल. तुमचे अतिरिक्त पैसे सुरक्षित ठिकाणी ठेवा. काही कामातील तुमचा अनुभव फायद्याचा सिद्ध होईल. तरुणांना नवीन रोजगार मिळू शकतात.
  आजचा शुभ रंग आणि अंक : भगवा, 1

  वृषभ (Taurus) :

  आयुष्यात पुढे जाण्याची संधी मिळेल. इतरांच्या विचारांनी आणि बोलण्याने जास्त प्रभावित होऊ नका. कामाच्या बाबतीत दिवस तुमच्या बाजूने असेल. आर्थिक परिस्थितीबाबत अजूनही थोडी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.
  आजचा शुभ रंग आणि अंक : आकाशी, 2

  मिथुन (Gemini) :

  इतरांच्या भल्याबद्दल विचार कराल आणि मनापासून त्यांची सेवा कराल. तुमचा व्यवसाय वेगवान होईल आणि तुम्ही काही नवीन काम सुरू करण्याचा प्रयत्न कराल. कोणालाही फसवू नका. व्यस्त कामात कुटुंबाकडे दुर्लक्ष करू नका.
  आजचा शुभ रंग आणि अंक : हिरवा, 6

  कर्क (Cancer) :

  कोणतीही कामं नव्याने सुरू करू शकता. तुमच्याकडे कपड्यांचं दुकान असेल तर तुम्हाला चांगला नफा मिळेल. अपूर्ण कामं पूर्ण करण्यात मित्रांचं सहकार्य मिळेल.
  आजचा शुभ रंग आणि अंक : जांभळा, 9

  सिंह (Leo) :

  दुसर्‍याच्या कार्याबद्दल मत देण्याचं टाळा. तुमच्या व्यवसायामध्ये एक मोठी डील मिळू शकते. आर्थिक परिस्थितीची पुनर्रचना करताना स्वतःची काळजी घ्या. तरुणांना अधिक गोष्टी शिकण्याची आवश्यकता आहे. आई-वडिलांसह खरेदीला जाऊ शकता.
  आजचा शुभ रंग आणि अंक : केशरी, 6

  कन्या (Virgo) :

  तुमचा मूड खूप चांगला असेल. मेहनतीच्या बळावर तुम्ही एक विशेष कामगिरी प्राप्त कराल. पैशाच्या बाबतीत तुम्हाला चांगली बातमी मिळेल. मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करण्यापूर्वी, पैशांशी संबंधित नियम समजून घेणं आवश्यक आहे.
  आजचा शुभ रंग आणि अंक : गुलाबी, 4

  तुळ (Libra) :

  आपल्या जवळचे लोकं तुमच्या यशामध्ये योगदान देतील. मल्टीनेशनल कंपनीकडून तुम्हाला चांगली नोकरीची ऑफर मिळू शकते. व्यापारी वर्ग व्यवसायाला आर्थिक बळ देण्यासाठी कर्जाचं नियोजन करू शकतो.
  आजचा शुभ रंग आणि अंक : पांढरा, 5

  वृश्चिक (Scorpio) :

  तुम्ही जे काही निर्णय घ्याल ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील. रिअल इस्टेटमध्ये अतिरिक्त पैशांची गुंतवणूक केली जाऊ शकते. तुमचं घर एकटं सोडू नका. नोकरी बदलण्याचं मन करेल. कोणा व्यक्तीला अचानक भेटणं एखाद्या गोड नात्यात बदलू शकतं.
  आजचा शुभ रंग आणि अंक : लाल, 7

  धनु (Sagittarius) :

  तुमचं मन प्रसन्न होईल. तुमची कामं काळजीपूर्वक करुन तुमच्या उद्दीष्टाच्या जवळ जाऊ शकता. सरकारकडून तुम्हाला मोठा फायदा मिळू शकेल. व्यवसायातील आर्थिक प्रगतीसाठी तुम्हाला कठोर परिश्रम करावं लागेल.
  आजचा शुभ रंग आणि अंक : निळा, 8

  मकर (Capricorn) :

  तुमचं काम इतरांना आनंदी करू शकतं. क्षेत्रात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक दृष्टीकोनातून समाधान मिळेल. गुंतवणूकीसाठी तुम्ही जाणकार लोकांची मदत घेऊ शकता. जे खासगी नोकरी करतात त्यांना त्यांच्या बोलण्याची काळजी घ्यावी लागेल.
  आजचा शुभ रंग आणि अंक : तांबडा, 3

  कुंभ (Aquarius) :

  तुम्ही तुमच्या वैयक्तिक बाबींमध्ये अधिक रस घ्याल. पैशाच्या मागे धावण्याऐवजी कुटुंबावर लक्ष केंद्रित करणं चांगलं. तुम्ही मालमत्ता क्षेत्रात घेतलेला पुढाकार शेवटपर्यंत पोहोचू शकतो. तुम्हाला इच्छित नोकरी मिळवू शकता.
  आजचा शुभ रंग आणि अंक : निळा, 7

  मीन (Pisces) :

  शुक्रवारी सुरु असलेल्या आर्थिक समस्या संपुष्टात येण्याची शक्यता आहे. तुम्ही कोणत्याही सरकारी संस्थेच्या कामात तुमचं सहकार्य देऊ शकता. बेरोजगारांना अपेक्षित नोकरी मिळण्याची शक्यता आहे.
  आजचा शुभ रंग आणि अंक : गुलाबी, 3