आजचे राशी भविष्य दि. १० ऑक्टोबर २०२१; ‘या’ ३ राशीच्या लोकांना त्यांचा विवाह जुळल्याची सुखद बातमी मिळेल.

  मेष :

  आजचा दिवस तुमच्यासाठी सर्वोत्तम दिवसांपैकी एक असू शकतो. कामाच्या ठिकाणी केलेले प्रयत्न आगामी काळात तुमच्या यशात आणि प्रगतीमध्ये योगदान देतील. नशीब तुमची साथ देईल. तुम्ही प्रगतीसाठी कठोर परिश्रम कराल. कामासाठी रविवार सर्वोत्तम असेल. फायदेशीर फळांचे प्राधान्य कायम राहील. आपण आपल्या प्रतिस्पर्ध्यांच्या क्षेत्रात पुढे असाल.
  शुभ रंग आणि अंक : पिवळा, 4

  वृषभ:

  या राशीच्या व्यक्तींची लोकप्रियता वाढण्याची शक्यता आहे. व्यावसायिकदृष्ट्या, गोष्टी सुरळीत होतील आणि तुम्ही चांगली प्रगती कराल. तुमचे उत्पन्न वाढेल. तुम्हाला आर्थिक लाभ मिळवण्याचे नवीन मार्गही सापडतील. तुम्ही तुमच्या इच्छेनुसार तुमच्या कामाच्या योजना पूर्ण कराल. वैवाहिक जीवनात गोडवा राहील.
  शुभ रंग आणि अंक : गुलाबी, 3

  मिथुन:

  कामाच्या ठिकाणी करियरच्या दृष्टीनं वेगळे प्रयत्न करणं गरजेचं आहे. अधिकारी आपला संभ्रम निर्माण करू शकतात. आपल्या कामाचा नकारात्मक प्रभाव पडणार नाही याची काळजी घ्या. कौटुंबिक सुख चांगले राहणार आहे. तुम्हाला आनंद होईल संपूर्ण दिवस आनंदात जाईल.
  शुभ रंग आणि अंक : निळा, 7

  कर्क:

  आयत्यावेळी काही गोष्टींमध्ये बदल करावा लागू शकतो. आपल्या कामात यश मिळेल. आरोग्यासाठी चांगला दिवस असेल. तुमचा दिवस हास्यातच जाईल. फक्त आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा आणि ड्रायव्हिंग करताना काळजी घ्या. कुटुंबातील सदस्यांकडून सर्व शक्य सहाय्य उपलब्ध असेल.
  शुभ रंग आणि अंक : तांबडा, 3

  सिंह:

  आर्थिकदृष्ट्या दिवस अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. नोकरी किंवा व्यवसायासाठी परदेशात जाण्याची संधी मिळेल. तुम्ही काही क्षण कुटुंबासोबत आरामात घालवाल. व्यापारी वर्गाला विशेषतः चांगले परिणाम मिळतील. तुमच्या स्वभावात गांभीर्य आणि एकाग्रतेची झलक दिसेल.
  शुभ रंग आणि अंक : पांढरा, 5

  कन्या:

  चांगली बातमी मिळेल. वैवाहिक जीवनासाठी उत्तम दिवस आहे. प्रेमसंबंध सुधारतील त्यामुळे आपला फायदा होईल. मूड चांगला राहणार आहे. कुटुंबातील सदस्यांसोबत चांगला वेळ जाईल. कदाचित आपण त्यांच्याबरोबर प्रवास देखील कराल. तुम्हाला पालकांचा स्नेह मिळेल. मुलांचे सुख चांगले राहील. कामात धनप्राप्ती होईल. विवाह जुळण्याचे आहेत.
  शुभ रंग आणि अंक : हिरवा, 6

  तूळ :

  प्रवासाचे योग आहेत. मात्र प्रवास करताना विशेष काळजी घ्या. शिक्षण क्षेत्रातील नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी. रविवार तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे. तुमच्या मनात नवीन उत्साह दिसेल. बुद्धिमत्तेच्या जोरावर यश मिळवतील. कुटुंबासोबत चांगले सामंजस्य राहील.
  शुभ रंग आणि अंक : लाल, 7

  वृश्चिक:

  आपला आत्मविश्वास वाढेल. गोष्टी समजून घेणं आवश्यक आहे. त्यामुळे काळजी घ्या. आपण पैसे देखील वाचवू शकता. सुखद बातमीचे प्राधान्य तुमच्यासाठी राहील. विद्यार्थी त्यांचे लक्ष अभ्यासावर केंद्रित करतील. कामात चांगले आर्थिक लाभ होतील. साखरपुडा करण्याचे नियोजन आखाल.
  शुभ रंग आणि अंक : निळा, 8

  धनु:

  सकारात्मक परिणाम दिसून येतील. व्यवहार करताना काळजी घ्या. भावना समजून घ्या आजचा दिवस संमिश्र स्वरुपाचा असणार आहे. तुम्हाला तुमच्या जोडीदार आणि मुलांकडून चांगली बातमी मिळेल. कौटुंबिक सुख चांगले राहील. विद्यार्थ्यांनी आज प्रेम प्रकरणापासून सावध राहावे.
  शुभ रंग आणि अंक : जांभळा, 4

  मकर:

  कोणतीही गोष्ट करण्याआधी विचार करा. आज तुम्ही आनंदी असाल आणि शांतता आपल्याला हवी असेल. या काळात वैवाहिक जीवनाचा आनंद तुमच्यासाठी चांगला राहील. तुमच्या जोडीदाराशी तुमचे संबंध चांगले राहतील. आर्थिक स्थिती चांगली राहील. विवाहाचे योग संभावितात.
  शुभ रंग आणि अंक : केशरी, 6

  कुंभ:

  केलेल्या कठोर परिश्रमाचे आपल्याला योग्य फळ मिळेल. आपल्याला मेहनत घ्यावी लागणार आहे. तुम्ही चांगल्या लोकांशी संपर्क प्रस्थापित कराल, जे तुम्हाला कामात यश मिळवण्यासाठी मदत आणि मार्गदर्शन करतील. तुम्हाला कार्यक्षेत्रात अपेक्षित नफ्याचा आनंद मिळेल.
  शुभ रंग आणि अंक : सोनेरी, 1

  मीन:

  आत्मविश्वास वाढेल आपला दिवस संमिश्र स्वरुपाचा असणार आहे. समस्यांचा सामना करावा लागणार आहे. विशेष काळजी घ्या. तुमच्या मेहनतीचे आणि अथक प्रयत्नांचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. कुटुंबाचा आनंद अपेक्षेप्रमाणे होणार आहे. प्रॉपर्टी डीलिंगचा बिझनेस लाभदायक राहील.
  शुभ रंग आणि अंक : आकाशी, 2