राशी भविष्य दि. १२ मार्च २०२१; या राशीच्या लोकांना धनलाभ होण्याची शक्यता आहे

  मेष- घरात शांतता आणि सुख नांदेल. आज आपल्याला योग्य न्याय मिळेल. भगवान लक्ष्मीला आज लाडूचा नैवेद्य द्या आजचा दिवस चांगला जाईल.

  वृषभ- आज आपल्याला खूप जास्त परिश्रम करावे लागतील. शंकराला आज कमळ अर्पण करा. आजचा दिवस शुभ जाईल.

  मिथुन- वाद-विवादापासून आज आपण दूर राहा. न्यायालयात जाण्याची वेळ येईल. अचानक आनंदाची वर्ता मिळू शकते.

  कर्क- आज आपल्याकडून पैशांची बचत होईल. भगवान शंकराला 11 बेलपत्र अर्पण करा.

  सिंह- घरगुती समस्या उद्भवतील. आई-वडिलांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या.

  कन्या- कुटुंबात उत्तम वातावरण राहिल. आज आपल्याला धनलाभ होईल.

  तुला- आज मतभेदापासून दूर राहा. आर्थिक लाभ होईल. भगवान शंकराला कापूर अर्पण करा.

  वृश्चिक- मित्रांची मदत मिळेल. आज आपले व्यवहार करताना विशेष काळजी घ्या.

  धनु- नवीन व्यवसाय किंवा काम करताना विशेष काळजी घ्या. कुटुंबाकडून आज आपल्याला मदत मिळेल.

  मकर- अनोळखी व्यक्तींशी भेटीगाठी होतील. भगवान शंकराला रुद्राक्ष अर्पण करा आजचा दिवस चांगला जाईल.

  कुंभ- आर्थिक लाभ होईल. आई-वडिलांचं जीवन खूप सुखी होईल. आजचा दिवस शुभ असेल.

  मीन- आज आपल्याला आनंदाची बातमी मिळेल. आपल्यासाठी आजचा दिवस अत्यंत शुभ आहे.