भविष्यावर बोलू काही; बोटांमधील फटही सांगते तुमच्या आयुष्यातील घडामोडी

तुमच्या हाताच्या बोटांमधील फटही तुमच्या आयुष्यातील घडामोडींबद्दल अथवा व्यक्तिमत्वाचा अंदाज देऊ शकतात.

आपल्याला  हे माहीत आहे की,  हात पाहून आपले भविष्य सांगितले जाते (palm reading). हाताच्या रेषांवरून काही अंदाज बांधून आपल्या आयुष्यात पुढे काय घडणार आहे याचा अभ्यास केला जातो. पण केवळ हस्तरेषाच नाही तर तुमच्या हाताच्या बोटांमधील फटही तुमच्या आयुष्यातील घडामोडींबद्दल अथवा व्यक्तिमत्वाचा अंदाज देऊ शकतात. वाचून नक्कीच तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल. पण हे खरं आहे. काही जण या हस्तरेषा आणि बोटांचा अभ्यास करून तुम्हाला अचूक या गोष्टीचा अंदाज देतात.

मध्यमा आणि अनामिकामधील फट

मध्यमा आणि अनामिका या दोन बोटांमध्ये फट अर्थात ही दोन बोटं दूर असतील तर असं असणं योग्य नाही असं म्हटलं जातं. अर्थात आपण ज्या बोटात साखरपुड्याची अंगठी घालतो आणि मधील बोट यामध्ये सहसा फट असत नाही. पण तशी असेल तर ते योग्य नाही. अशी फट असेल तर ती व्यक्ती अत्यंत बेजबाबदार असल्याचे समजण्यात येते. अशा व्यक्ती केवळ स्वतःच्या फायद्याचाच विचार करतात. त्यांना इतर कोणाच्याही भावनांबद्दल देणंघेणं नसतं. त्यामुळे अशा व्यक्तींपासून दोन हात लांब राहणंच सोयीस्कर ठरतं.

तर्जनी आणि मध्यमा बोटाच्या मध्ये असलेली फट

तर्जनी अर्थात आपल्या अंगठ्याच्या बाजूचे पहिले बोट आणि मध्यमा अर्थात दुसरे बोट यामध्ये जर फट असेल तर अशा व्यक्ती स्वतंत्र व्यक्तीमत्वाचे अर्थात स्वतंत्र विचारांचे असतात. आपल्या आयुष्यातील ध्येय त्यांना योग्यरित्या माहीत असून त्याकडे त्यांचे व्यवस्थित लक्ष केंद्रीत केलेले असते. यांनी केलेल्या मेहनतीचे फळ त्यांना नेहमीच मिळते. या दोन्ही बोटांमध्ये अधिक जास्त फट असेल तर या व्यक्ती स्वार्थी स्वभावाच्या असतात. आपल्याला हवं ते आयुष्यात मिळविण्याचाच कल या व्यक्तींचा असतो.

अनामिका आणि करंगळीमधील अंतर

अनामिका आणि सर्वात लहान बोट अर्थात करंगळीमध्ये अंतर असेल तरीही ते नक्कीच चांगले मानले जात नाही. अशा व्यक्ती अत्यंत रागीट स्वभावाची असते. आपली कामं करून घेण्यासाठी या व्यक्ती कोणत्याही थराला जाऊ शकतात. पण आपल्या कुटुंबासाठी या व्यक्ती खूप झटतात. कुटुंबासाठी काहीही करण्याची या व्यक्तींची तयारी असते. बाहेर कोणालाही त्रास दिला तरीही कुटुंबातील व्यक्तींना त्रास झाला तर या व्यक्ती अत्यंत वाईट ठरतात हे लक्षात घ्या. ज्या व्यक्तींच्या बोटांमध्ये अंतर असते त्या व्यक्ती अत्यंत उत्साही तुम्हाला दिसून येतील. शिवाय या व्यक्ती अत्यंत सकारात्मकही असतात.

बोटांमध्ये फट नसलेल्या व्यक्ती

ज्या व्यक्तींच्या बोटांमध्ये फट अर्थात अंतर नसतं हस्तरेषा तज्ज्ञांच्या मते या व्यक्ती अत्यंत गंभीर स्वभावाच्या असतात. दुसऱ्यांच्या आयुष्यात झाकण्याचा अथवा हस्तक्षेप करण्याचा या व्यक्ती कधी विचारही करत नाहीत. या व्यक्ती जास्त उत्साही नसतात. त्यामुळे त्यांचे आयुष्यही प्रचंड कंटाळवाणे असते.