या तीन राशींच्या लोकांनी चुकूनही घालू नये चांदीची अंगठी; जाणून घ्या कारण

या राशीच्या व्यक्तीने चांदीच्या वस्तू वापरू नये किंवा चांदीची अंगठी सुद्धा घालू नये. जर चांदीच्या अंगठी हातात घालायची असेल तर ज्योतिषांचा सल्ला अवश्य घ्या.

    छोट्या छोट्या गोष्टीवरून ज्या व्यक्तींना लगेच राग येतो अशा व्यक्तींना चांदीची अंगठी घालण्याचे सांगितले जाते तसेच जी व्यक्ती जास्तीत जास्त चांदीच्या वस्तू चांदीचे अलंकार परिधान करते त्यांच्या कुंडलीत चंद्र व शुक्र ग्रह मजबूत बनतात. आपल्या धर्मशास्त्रामध्ये सांगितले गेले आहे की ,चांदीमध्ये चंद्र ग्रह बरोबरच शुक्र ग्रहाच सुद्धा प्रभाव असतो. हेे तर तुम्हाला माहिती असेलच की सूर्यामध्ये जेवढी उष्णता असते त्यापेक्षा जास्त थंडावा चंद्रामध्ये आहे.

    आपल्या आजूबाजूला आपण अनेक लोक पाहिले असतील जे चांदी व सोने एकत्र करून घालतात, हे अत्यंत चुकीचे आहे. ज्या व्यक्ती खूप भावनिक असतात अशा व्यक्तीने चांदीची वस्तू व अलंकार वापरण्याऐवजी खूप वेळा विचार केला गेला पाहिजे. आज आपण आपल्या या लेखांमध्ये अशा तीन राशीबद्दल जाणून घेणार आहोत. या तीन राशीच्या व्यक्तीने चांदीच्या वस्तू चुकूनही वापर करू नये किंवा चांदीची अंगठी बोटांमध्ये घालू नये. चला तर पाहूया नेमक्या कोणत्या आहे त्या तीन राशी..

    यातील राशींपैकी पहिली राशी आहे मेष राशी. जर मेष राशीच्या व्यक्तींना असे वाटत असेल की आपल्या जीवनामध्ये सुख शांती टिकून राहावी याकरता त्यांनी चांदीचा वापर कमीत कमी प्रमाणात करावा किंवा अजिबात करू नये कारण मेष राशीच्या व्यक्तीने चांदीचे वापर करणे हे हानीकारक मानले जाते. त्याशिवाय मेष राशीच्या व्यक्तीने चांदीची अंगठी सुद्धा घालू नये. जर अंगठी घालायची असेल तर ज्योतिषांचा सल्ला अवश्य घ्या.

    दुसरी राशी आहे सिंह राशी. सिंह राशीच्या लोकांना चांदीचा वापर करणे खूप महागात पडू शकते. या राशीच्या व्यक्तीने चांदीचा वापर अतिप्रमाणात केला तर त्यांची आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस खालावत जाते म्हणून या राशीच्या व्यक्तीने चांदीची अंगठी घालू नये अन्यथा त्यांना गंभीर परिणाम भोगावे लागू शकतील. तिसरी राशी आहे धनु राशी. धनु राशीच्या व्यक्तींना सुद्धा चांदीचा वापर करणे फायदेशीर ठरत नाही.

    या राशीच्या व्यक्तीने चांदीच्या वस्तू वापरू नये किंवा चांदीची अंगठी सुद्धा घालू नये. जर चांदीच्या अंगठी हातात घालायची असेल तर ज्योतिषांचा सल्ला अवश्य घ्या.

    (आध्यात्मिक दृष्टिकोनातून ही माहिती देण्यात आलेली आहे)