‘या’ दोन राशींच्या लोकांनी कधीही करू नये एकमेकांशी लग्न; जाणून घ्या कारण

तिशय हुशार असलेल्या आणि सतत उर्जेनं भरलेल्या कुंभ राशीच्या लोकांना जिद्दी आणि दृढ स्वभावाच्या वृषभ राशीच्या लोकांना झेलणं कठीण असतं...

  जन्मपत्रिकेनुसार  कुंडली जुळत असेल तरच लग्न ठरवण्यात काहींचा कल असतो. ज्योतिष्यांनुसार जसं तुमचं एकमेकांशी जुळणं महत्वाचं असतं, तसंच तुमच्या राशींचंही एकमेकांशी जुळणं महत्वाचं असतं. अशा काही राशीही असतात ज्या राशींचे जोडपे कधीही चांगला संसार करू शकत नाहीत असं जोतिषशात्र सांगतं.

  मकर आणि मेष: मकर राशीचे लोकं सतत चांगल्या विचारांचे आणि उत्तम राहणीमान असणारे असतात. तर मेष राशीचे लोकं अतिउत्साही असतात. त्यामुळे या दोन्ही राशींचं पटत नाही. मेष राशीच्या लोकांना समोरच्या व्यक्तिला सतत नियंत्रणात ठेवण्याची सवय असते. मात्र या गोष्टीला मकर राशीचे लोकं सहन करू शकत नाहीत. त्यामुळे या दोन्ही राशींचं जुळणं कठीण असतं.

  कुंभ आणि वृषभ:अतिशय हुशार असलेल्या आणि सतत उर्जेनं भरलेल्या कुंभ राशीच्या लोकांना जिद्दी आणि दृढ स्वभावाच्या वृषभ राशीच्या लोकांना झेलणं कठीण असतं. कुंभ राशीचे लोकं खुल्या विचारांचे असतात मात्र हे वृषभ राशीच्या लोकांना फारसं रुचत नाही. त्यामुळे या दोन राशींमध्ये नेहमीच खटके उडत असतात.

  मीन आणि मिथुन:मीन राशीचे लोकं दुसऱ्यांची सतत चिंता करणारे आणि त्यांच्या आवडी-निवडीचा विचार करणारे असतात. मात्र याउलट मिथुन राशीचे लोक जे बोलतात ते न करता दुसरंच काही करतात. त्यामुळे या दोन राशींचं एकमेकांशी जुळणं कठीण असतं.

  मेष आणि कर्क:दृढनिश्चयी आणि धारदार स्वभावाच्या मेष राशीच्या लोकांना जेव्हा सौम्य राशीचे म्हणजेच कर्क राशीचे लोकं भेटतात तेव्हा खटके उडतातच. कर्क राशीच्या लोकांचा स्वभाव अतिशय सौम्य आणि शांत असतो. या दोन्ही राशीचे लोकं एकमेकांच्या उलट असतात त्यामुळे त्यांच्यात खटके उडत असतात.

  वृषभ आणि सिंह:सिंह राशीचे लोकं आत्मकेंद्रित असतात आणि त्यांना लाईमलाईटमध्ये रहायला आवडतं. मात्र याउलट वृषभ राशीचे लोकं सहज स्वभावाचे असतात. ज्यामुळे या दोन्ही राशींच्या लोकांमध्ये सतत भांडणं होत असतात.

  मिथुन आणि कन्या:मिथुन राशीचे लोकं उत्साही आणि मौजमजा करणारे असतात. मात्र याउलट कन्या राशीच्या लोकांना स्वत:च्या कामात मग्न राहायला आवडतं. त्यामुळे या दोन राशींचे लोकं जवळ आले की खटके उडणार हे निश्चित असतं.

  कर्क आणि तूळ:कर्क राशीचे लोकं प्रामाणिक आणि अभ्यासू असतात तर तूळ राशीचे लोकं लाईमलाईटमध्ये राहणारे असतात.  त्यामुळे या दोन्ही राशीचे लोकं जेव्हा एकमेकांशी बोलतात तेव्हा त्यांच्यात काहीही जुळून येत नाही आणि भांडणं होण्याची चिन्हं असतात.

  धनू आणि मीन: धनू राशीचे लोकं आनंदी असतात आणि ते जिथेही जातात तिथे लोकांना आनंद देतात. याउलट मीन राशीचे लोकं हळवे असतात. त्यामुळे मीन राशीच्या लोकांच्या हळव्या स्वभावाला धनू राशीचे आनंदी लोकं नेहमी आवडतीलच असं नाही. त्यामुळे यांच्यात ३६चा आकडा पाहायला मिळतो.

  सिंह आणि वृश्चिक:सिंह राशीचे लोकं नेतृत्व करण्यात सक्षम असतात तर वृश्चिक राशीचे लोकं जिद्दी आणि कठोर असतात. त्यामुळे या दोन्ही राशींच्या लोकांमध्ये वाद होत असतात. विशेष म्हणजे या दोन्ही राशींच्या लोकांचा स्वभाव जिद्दी असल्यामुळे कोणीही माघार घेत नाही.

  कन्या आणि धनू:कन्या राशीचे लोकं प्रत्येक काम एकाग्रतेने करत ते उत्तमरीत्या पार पाडतात आणि दुसऱ्यांकडूनही अशीच अपेक्षा ठेवतात. मात्र धनू राशीचे लोकं स्वतंत्र विचारांची असतात त्यांना कोणी सल्ला दिलेला आवडत नाही. त्यामुळे या दोन्ही राशींच्या लोकांमध्ये सतत भांडणं होतात

  वृश्चिक आणि कुंभ:या दोन्ही राशींचे लोकं एकमेकांच्या विपरीत असतात. यांच्यात प्रामाणिकपणाची आणि प्रेमाची कमतरता असते. त्यामुळे यांच्यात काहीही जुळून येऊ शकत नाही.