…म्हणून पत्रिकेत नाडीदोष असल्यास लग्न करणे टाळावे; ‘हे’ आहे वैज्ञानिक कारण

नाडी दोषाच्या अपवादांमध्ये आपण बघितल्याप्रमाणे एक नाडी असेल मात्र जन्म नक्षत्र भिन्न असल्यास होणा-या दुष्परिणामांची तिव्रता कमी होते....

  लग्नासाठी मुला मुलीची कुंडली (kundli) पाहत असताना बऱ्याचदा एक नाड किंवा नाडीदोष (nadidosh) असल्याचे जोतिषी सांगतात. नाडीदोष किंवा एकनाड असल्यास लग्न टाळण्याचा सल्ला देण्यात येतो. आजच्या विज्ञान युगात नाडीदोष मानाने कितपत योग्य आहे ? तसेच याला काही वैज्ञानिक पार्श्वभूमी आहे का असा प्रश अनेकांच्या मनात आला असेल. त्या सर्वांसाठी ही माहिती नक्कीच उपयोगाची ठरेल.

  नाडीदोष समजण्यापूर्वी नाडी हा काय प्रकार आहे, हे समजणे आवश्यक आहे.

  ज्योतिषशास्त्रात नाडीचे तीन प्रकार सांगितलेले आहेत. ते खालिल प्रमाणे आहेत.

  १) आदी

  २) मध्य

  ३) अंत्य

  पंचांगात अवकहडा नावाचे एक कोष्टक असते. त्यावरुन जन्म नक्षत्राच्या आधारे नाडी कोणती हे कळते. जगातला प्रत्येक व्यक्ती वरील नाडीच्या तीन प्रकारांपैकी एका नाडीचा असतो.

  नाडीची नक्षत्रे –

  १ ) आदी नाडी –

  अश्विनी, आर्द्रा, पुनर्वसु, हस्त, जेष्ठ, मूल, उत्तर फाल्गुणी, शतभिषा व पूर्वफाल्गुणी नामित यापैकी कोणत्याही नक्षत्रामध्ये जातकाच्या जन्माच्या वेळी चंद्र असला तर पत्रिकेमध्ये आदी नाडी सांगितली जाते.

  २) मध्य नाडी –

  भरणी, पुष्य, मृगशिरा, पूर्व फाल्गुणी, चित्रा, पूर्वाषाढा, धनिष्ठ, अनुराधा, उत्तर भाद्रपद नामित यापैकी कोणत्याही नक्षत्रामध्ये जातकाच्या जन्माच्या वेळी चंद्र असला तर पत्रिकेमध्ये मध्य नाडी सांगितली जाते.

  ३) अंत्य नाडी –

  कृतीका, अश्लेषा, मेघा, रोहिणी, स्वाती, उत्तरशदा, विशाखा, रेवती, श्रावण नामित यापैकी कोणत्याही नक्षत्रामध्ये जातकाच्या जन्माच्या वेळी चंद्र असला तर पत्रिकेमध्ये अंत्य नाडी सांगितली जाते.

  नाडीचे अपवाद –

  १) वर-वधु एकाच राशीचे आहेत. मात्र त्यांची जन्म नक्षत्रे वेगवेगळी आहेत. अशा परिस्थितीत नाडी दोष नसतो.

  २) वर-वधुचे जन्म नक्षत्र एकच आहेत. मात्र राशी वेगवेगळ्या आहेत, अशा परिस्थितीतही नाडी दोष नसतो.

  पत्रिकेचे गुणमिलन करीत असतांना नाडी जर शून्य गुण मिळाले तर नाडी दोष मानण्यात येतो.

  नाडी व आयुर्वेदाचा संबंध –

  ज्योतिषशास्त्रानुसार जसे नाडीचे आदी, मध्य व अंत्य असे तीन प्रकार सांगितले जातात, अगदी तसेच आयुर्वेदानुसार मानवाच्या तीन प्रवृत्ती असतात. त्या खालिलप्रमाणे

  १) वात

  २) पित्त

  ३) कफ

  आजही आपण आयुर्वेदाचार्याकडे गेलो, तर ते आधी आपली नाडी तपासतात. म्हणजे मनगटावर बोट ठेवून ठोक्यांवरुन ते आपली नाडी बघतात. त्यावरुन ते आपण पित्त, वात किंवा कफ या तीन पैकी कुठल्या प्रवृत्ती आहोत हे ओळखतात. हीच नाडी आपल्या पत्रिकेत दाखवलेली असते.

  ज्योतिषशास्त्र अभ्यासकाकडून पत्रिकेतील आपली नाडी बघितली (अर्थात ती तज्ञज्ञांकडून केलेली असेल तर) आणि आयुर्वेदाचार्यांकडूनही तपासली तर आपण अचंबित झाल्याशिवाय राहत नाही, कारण ती अगदी तंतोतंत सारखीच असते. यावरुन नाडी व आयुर्वेद यांच्यातील एकवाक्यता, संबंध व त्यांचे महत्त्व स्पष्ट होते.

  वरील तीनपैकी कोणतीही एक नाडी दोघांच्याही पत्रिकेत असेल तर त्यांच्या शरीराची प्रवृत्ती एकच असते. एकच प्रवृत्तीमुळे संततीत काही दोष निर्माण होऊ शकतात. जन्माला येणारे बाळ हे शाररीक व मानसिक कमकुवतही जन्माला येऊ शकते. विज्ञानानेही ते आता मान्य केले आहे. तोच हा नाडी दोष.

  संततीत निर्माण होणा-या दोषांमुळे एक नाडी विवाह करु नये, असा सल्ला दिला जातो. दुसरा दुष्परिणाम म्हणजे पती-पत्नीला एकाच वेळी आरोग्यविषयी तक्रारी सुरु होण्याचा संभव असतो. आपण बहुतेकदा र्‍आश्चर्य व्यक्त करतो, की एखादा अचानक एवढा दुर्धर आजार कसा निर्माण होऊ शकतो. वैद्यकशास्त्रसुद्घा काही वेळेला त्याचे उत्तर देऊ शकत नाही. अशा वेळी तो नाडी दोषाचे परिणाम असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तिसरा परिणाम म्हणजे वैवाहिक आयुष्यातील आकर्षणही कमी होते.

  नाडी दोषाच्या अपवादांमध्ये आपण बघितल्याप्रमाणे एक नाडी असेल मात्र जन्म नक्षत्र भिन्न असल्यास होणा-या दुष्परिणामांची तिव्रता कमी होते. त्यामुळे इतर गोष्टी पत्रिकेतील जुळत असल्यास विवाह जुळविण्यास काहीही हरकत नसते. आपली पुढील पिढी आरोग्य संपन्न, बुद्घीनेही सुदृढ होण्यासाठी नाडी दोष असल्यास विवाह टाळण्याचा सल्ला देण्यात येतो.