rashi bhavishya

मेष- धनलाभ होण्याची शक्यता आहे. शत्रूवर मात मिळवण्यात यशस्वी ठराल. नोकरीच्या ठिकाणी प्रगतीचा योग आहे. विवाहप्रस्ताव येतील.

वृषभ- तुमच्या मतांचा इतरांवर प्रभाव असल्याचं पाहायला मिळेल. एखाद्या समारंभाला उपस्थित राहण्याची संधी मिळेल. घरातील कामं पूर्णत्वास नेण्याचा विचार करा.

मिथुन- आर्थिक स्थिती सुधारेल. अर्थार्जनाच्या नव्या संधी मिळतील. नवे मित्र बनवाल. याच मित्रांची तुम्हाला मदत होणार आहे. काम करण्याच्या पद्धतीत बदल करा फायद्याचं ठरेल.

कर्क- संपूर्ण लक्ष करिअरवर असेल. संवेदनशीलता परमोच्च शिखरावर असेल. कुटुंबासमवेत वेळ व्यतीत करण्याची संधी मिळेल. जीवनात एखादा मोठा सकारात्मक बदल घडेल. अनपेक्षित व्यक्तीच्या येण्यानं दिवस सुखकर होतील.

सिंह- सामाजिक स्तर उंचावेल. मित्र आणि कुटुंबीयांची साथ मिळेल. न्यायालयीन कामं मार्गी लागतील. नवी जबाबदारी मिळण्याची संधी आहे.

कन्या- दिवस सर्वसामान्य असेल. देवाणघेवाणीचे व्यवहार घडतील. इतरांना भेटण्याचा योग आहे. कुटुंबासमवेत बाहेर जाण्याचा योग आहे.

तुळ- तुमचं कोणतंही काम अडणार नाही. कुटुंबाला प्राधान्य द्या. धनलाभ होण्याची शक्यचा आहे. दिवस शुभ आहे. सर्व कामं वेळेवर पूर्ण होतील. आर्थिक परिस्थिती सुधारेल.

वृश्चिक- अधिकार आणि जबाबदारी वाढेल. जवळची नाती आणखी दृढ होतील. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांवर तुमचा प्रभाव असेल. प्रगतीचा मार्ग मोकळा आहे. धनलाभ होण्याची शक्यता आहे.

धनु- महत्त्वाच्या व्यक्तींशी मेळ साधाल. महत्त्वाची नातीसुद्धा आणखी दृढ होतील. कुटुंबात एकी राखा. दिवस आनंददायी आहे. काही अनपेक्षित घटना सकारात्मकता घेऊन येतील.

मकर- व्यापार आणि नोकरीच्या ठिकाणी प्रगती करण्याची संधी आहे. कोणा एका महत्त्वाच्या मुद्द्यावर कुटुंबाशी चर्चा कराल. नवं घर खरेदी करण्याचा विचार कराल.

कुंभ- एखादं नवं काम हाती घ्याल. पण, त्यापूर्वी जुनी कामं मार्गी लावा. वडिलांची मदत मिळेल. नोकरीच्या ठिकाणी दिवस चांगला आहे. विचाराधीन कामं पूर्ण कराल.

मीन- तुमच्या आयुष्यात एखादा मोठा आणि तितकाच सकारात्मक बदल घडणार आहे. आर्थिक परिस्थिती सुधारेल. तुमचं कोणतंही काम अडणार नाही. प्रेमसंबंधांसाठी दिवस चांगला आहे.