राशी भविष्य दि. २ एप्रिल २०२१; या राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती राहील मजबूत

    मेष- कुटुंबाची साथ मिळेल. तुमच्या वाणीवर मात्र ताबा ठेवा. कोणा एका कार्यक्रमासाठी तुम्हाला बोलावणं येणार आहे. दूरच्या ठिकाणी असणाऱ्या एखाद्या व्यक्तीशी संवाद घडण्याचा योग आहे.

    वृषभ- आजचा दिवस चांगला आहे. धनलाभ होण्याची शक्यता आहे. शत्रूवर विजय मिळवण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. नोकरीच्या ठिकाणी जास्त मेहनत करावी लागू शकते.

    मिथुन- तुमच्या आवडीची कामं करण्यासाठी उत्सुक असाल. आर्थिक परिस्थिती सुधारेल. काही नव्या मित्रांना भेटण्याची संधी मिळेल. विचार मात्र सकारात्मक ठेवा.

    कर्क- तुमचं पूर्ण लक्ष करिअरवर असेल. मित्रांसमवेत चांगला वेळ व्यतीत करण्याची संधी आहे. काही सकारात्मक बदल घडतील.

    सिंह- वेळ तुमच्या कलानं आहे. समाजिक स्तर उंचावेल. तुमच्या म्हणण्याला प्राधान्य देण्यात येईल. न्यायालयीन कामं मार्गी लागतील.

    कन्या- जास्त मेहनत करण्यासाठी तयार राहा. त्याचं फळही तुम्हाला मिळणार आहे. एकाग्रता परमोच्च शिखरावर असेल.

    तुळ- समोर येणाऱ्या प्रत्येक संधीलर लक्ष ठेवा. तुमची कामं अडणार नाहीत. एखादं अडकलेलं काम पुन्हा सुरु होईल. इतरांच्या गरजाही लक्षात घ्या.

    वृश्चिक – कोणा एका नव्या स्थानावर भेट देण्यासाठी जाण्याची संधी मिळेल. प्रेमसंबंधांमध्ये सुधार येतील. आर्थिक कारणास्तव एखादा प्रवास करावा लागू शकतो.

    धनु- आर्थिक स्थितीचा विचार करा. तुमच्यावर मोठी जबाबदारी असेल. काही अडथळे दूर होतील. कुटुंबात एकी राहील.

    मकर- जबाबदारी पार पाडण्यावर लक्ष द्या. व्यापार आणि नोकरीवर लक्ष द्या. पुढे जाण्याच्या संधी आहेत. मित्रांकडून आर्थिक सहाय्य मिळेल.

    कुंभ- धनलाभ होण्याची शक्यता आहे. जुन्या कामांमध्ये यश मिळेल. नोकरीच्या ठिकाणी इतरांचं सहकार्य मिळेल.

    मीन- कुटुंब आणि मित्रपरिवाराची साथ मिळाल्यामुळं अडचणींवर मात करण्याची ताकद तुम्हाला मिळेल. अधिकाधिक गोष्टींमध्ये यशस्वी व्हाल. प्रेमसंबंधांमध्ये यश मिळेल.