साप्ताहिक राशिभविष्य दि. १२ ते १८ सप्टेंबर, २०२१; ‘या’ राशीच्या बेरोजगारांना रोजगाराच्या संधी मिळतील. तणाव संपेल; जाणून घ्या तुमचे साप्ताहिक राशिभविष्य !

  मेष (Aries):

  हा आठवडा आपणास अत्यंत चांगली फले देणारा असल्याचे दिसत आहे. आपण अनेक आव्हानांना सामोरे जाऊन त्यांच्यावर मात करू शकाल. आपल्या प्राप्तीत वाढ होईल. आपल्या कामात आपणास मदत करू शकेल असा एखादा नवीन मित्र आपल्याला भेटण्याची शक्यता आहे. आपल्या कामात मित्रांचे सहकार्य मिळू शकेल. नोकरीत कामाचा आनंद घेऊ शकाल. आपली कामगिरी चांगली झाल्याने आपण प्रशंसित व्हाल. असे असले तरी वरिष्ठांशी एखादा बेबनाव होऊ शकतो.

  वृषभ (Taurus):

  हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. आठवड्याच्या सुरवातीस वायफळ खर्च होणार असल्याने आपणास खर्चांवर नियंत्रण ठेवावे लागेल, अन्यथा आपली आर्थिक स्थिती नाजूक होऊ शकते. आपणास काही मानसिक त्रास होण्याची शक्यता सुद्धा आहे. शारीरिक आव्हानांना सामोरे जावे लागेल. कोणत्या ना कोणत्या माध्यमातून प्राप्ती होण्याची शक्यता असल्याने काळजीस कारण उरणार नाही. वैवाहिक जीवनातील गोडवा टिकून राहील. आपले नाते दृढ होईल.

  मिथुन (Gemini):

  हा आठवडा आपल्यासाठी चांगला असून आपणास चांगली प्राप्ती झाल्याने आपल्या अनेक विवंचना दूर होतील. खर्चात थोडी वाढ झाली तरी आपण त्यातून काही ना काही मार्ग शोधून काढू शकाल. आपली प्रकृती बिघडू नये म्हणून कोणत्याही प्रकारच्या मानसिक ताणापासून दूर राहावे. प्रकृती बिघडल्यास आपल्या अनेक कार्यात विघ्ने येऊ शकतात. कौटुंबिक जीवन सुखद व आनंदयुक्त असेल. आपण एखाद्या स्थावराची खरेदी करण्याचा प्रयत्न कराल.

  कर्क (Cancer):

  आठवड्याच्या सुरवातीपासूनच आपला काही वास्तविकतेशी सामना होईल. ह्या आठवड्यात आपणास संबंधांच्या बाबतीत अधिक सतर्कता दाखवावी लागेल. संबंधातील कटुता टाळण्यासाठी आपणास दृष्टिकोन बदलावा लागू शकतो. आठवड्याच्या मध्यास आपल्यामुळे संबंधात येत असलेल्या दुराव्याची जाणीव आपणास होईल. ह्याचे सकारात्मक परिणाम आपणास व्यावसायिक जीवनात पाहावयास मिळतील. त्या दरम्यान आपण आपले जाळे विस्तारू शकाल. तसेच कुटुंबासाठी सुद्धा थोडा वेळ काढू शकाल.

  सिंह (Leo):

  हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. आपल्या कामात आपण खूपच व्यस्त राहाल व कामातील समस्या आपला पार गोंधळ उडवून देतील. त्यातून बाहेर पडण्यास आपणास खूप वेळ लागेल. कुटुंबियांना सुद्धा आपली गरज लागेल तेव्हा आपल्या जवाबदाऱ्या आपणास समजून घ्याव्या लागतील. प्रेमीजनांसाठी हा आठवडा चांगला आहे. आपण आपल्या प्रियव्यक्तीस एखादी भेटवस्तू देऊ शकाल. विवाहितांसाठी हा आठवडा सामान्यच आहे. आपल्या वैवाहिक जोडीदाराची प्रकृती बिघडण्याची शक्यता आहे.

  कन्या (Virgo):

  हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. आठवड्याच्या सुरवातीस आपण दूरवरच्या प्रवासास जाऊ शकाल. कुटुंबियांच्या सहवासात आपला वेळ आनंदात घालवू शकाल. आठवड्याच्या मध्यास कामावर लक्ष केंद्रित होऊ शकेल. कुटुंबात सुद्धा जिव्हाळा वाढेल. आठवड्याच्या अखेरीस आपल्या प्राप्तीत वाढ करण्याचा विचार आपण कराल. ह्या आठवड्यात आपली प्राप्ती खूपच चांगली असेल. अचानक धनप्राप्ती संभवते. बँकेकडून घेतलेले कर्ज फिटू लागल्याने आपणास थोडा दिलासा मिळेल.

  तूळ (Libra):

  हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. आठवड्याच्या सुरवातीस आपणास काही मानसिक त्रास होण्याची शक्यता असून आर्थिक विवंचना आपणास सतावत राहतील. निष्कारण काळजी केल्याने आपण स्वतःला त्रास करून घ्याल, तेव्हा काळजी करणे सोडा. ह्या आठवड्यात प्रकृती बिघडण्याची शक्यता असल्याने आपल्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष द्यावे लागेल. आठवड्याचे मधले दिवस प्रवासासाठी अनुकूल असून केलेले प्रवास आनंददायी ठरतील. नोकरीत कामाचा आनंद घेऊ शकाल.

  वृश्चिक (Scorpio):

  हा आठवडा आपल्यासाठी अत्यंत चांगला आहे. आपण संततीवर प्रेमाचा वर्षाव कराल. आपल्या प्राप्तीत वाढ होईल. वैवाहिक जीवनातील जवळीक वाढेल. नात्याची वीण घट्ट झाल्याने आपण दोघे एकत्रितपणे अनेक कामे पूर्ण कराल. प्रेमीजनांच्या आयुष्यात सुरवातीस काही गैरसमज होऊन नात्यात थोडा दुरावा निर्माण होईल. दुरावा टाळण्यासाठी आपणास एकत्र बसून गैरसमज दूर करावे लागतील. ह्या आठवड्यात एकंदरीत सुखांचा वर्षाव होईल. नोकरीत चांगली कामगिरी होईल.

  धनु (Sagittarius):

  हा आठवडा आपणास सामान्य फले देणारा आहे. आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊन आजारपण येऊ नये म्हणून आठवड्याच्या सुरवातीपासून आपणास निष्कारण काळजी करण्यापासून दूर राहावे लागेल. आठवड्याच्या सुरुवातीस खर्चात वाढ होईल. मात्र, आठवड्याच्या मध्यापासून खर्च नियंत्रणात आल्याने काळजीस कारण उरणार नाही. खर्च कमी होऊन प्राप्तीत वाढ होऊ लागेल. व्यापारात लाभ होईल. नोकरीत चांगले परिणाम मिळाल्याने आपली स्थिती मजबूत होईल. विवाहितांसाठी हा आठवडा चांगला आहे.

  मकर (Capricorn):

  हा आठवडा आपल्यासाठी सामान्यच आहे. आपणास काही आंशिक स्वरूपाचे परिणाम मिळतील. आठवड्याच्या सुरवातीस आपल्या वैवाहिक जीवनाबद्धल आपण जागरूक राहून जोडीदारास खुश ठेवण्याचा प्रयत्न कराल आठवड्याच्या मध्यास आपली काळजी वाढली तरी आठवड्याचे अखेरचे दिवस चांगले जातील. एखादा दूरवरचा प्रवास करू शकाल. नोकरीत सहकाऱ्यांशी गोड बोलून व त्यांच्याशी मिळून मिसळून काम करणे फायदेशीर होईल. व्यापाऱ्यांना ह्या आठवड्यात सावध राहावे लागेल.

  कुंभ (Aquarius):

  हा आठवडा सामान्य फले देणारा आहे. कुटुंबांशी संबंधित एखाद्या मोठ्या गोष्टीने आपला गैरसमज होईल. अशा परिस्थितीत आपणास योग्य निर्णय घ्यावा लागेल. निर्णय घेताना गरज भासल्यास एखाद्या त्रयस्थाची मदत आपण घेऊ शकता. प्रकृतीत चढ – उतार येण्याची शक्यता असल्याने आरोग्याची योग्य काळजी घ्यावी. नोकरीत कामाचा आनंद घेऊ शकाल. आपली कामगिरी चांगली होऊ शकेल. मात्र सभोवतालच्या वातावरणाने आपण प्रभावित व्हाल व त्याचा प्रतिकूल परिणाम आपल्या कामगिरीवर होण्याची शक्यता आहे.

  मीन (Pisces):

  हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. आठवड्याच्या सुरवाती पासून आपल्या प्राप्तीत कशी वाढ करता येईल ह्यावरच आपले लक्ष केंद्रित झालेले असेल. मात्र, त्यामुळे आपला मानसिक त्रास खूपच वाढणार असल्याने काळजी घ्यावी. प्रणयी जीवनात आपल्या प्रियव्यक्तीच्या नाराजीमुळे काही अडचणी येण्याची शक्यता असल्याने तिला खुश ठेवण्याचा प्रयत्न करावा. नोकरीत एखाद्या गोष्टीत आपला हट्ट सोडून न दिल्यास अपमानित व्हावे लागेल. व्यापारी वर्गासाठी हा आठवडा चांगला आहे.