Weekly Horoscope December 27 to January 2, 2021 nrng
साप्ताहिक राशी भविष्य दि. २७ डिसेंबर ते २ जानेवारी २०२१; जाणून घ्या अशी आहे या आठवड्यात ग्रहांची चाल

मेष-  या  आठवड्यात आपण व्यावसायिक आघाडीवर अधिक सक्रिय व्हाल. नवीन सुरवात किंवा नवीन धाडस करण्या ऐवजी वर्तमान स्थिती प्रबळ करण्यावर लक्ष केंद्रित केल्यास फायदा होईल. व्यावसायिक आघाडीवर कोर्ट – कचेरी करावी लागेल. जर आधीपासून अशा काही समस्या असल्या तर त्यात अनपेक्षित कलाटणी येऊ शकेल. मातुल पक्षाकडे मंगल प्रसंग उदभवतील किंवा त्यांच्यापासून काही लाभ होईल. व्यावसायिक ठिकाणी जे काही असेल त्यावर लक्ष केंद्रित करण्यास हरकत नाही. आठवड्याच्या मध्यास विशेषतः बांधकाम, वाहन इत्यादींच्या खरेदी – विक्रीशी संबंधित असणाऱ्यांचा अधिक फायदा होऊ शकेल. आपण उत्साहात पुढे होऊन आपल्या प्रगतीचा मार्ग तयार करू शकाल. कर्म केल्या शिवाय आपल्याकडे इतर विकल्प नसल्याचे ध्यानात ठेवावे. प्रणयी जीवनातील संबंध संथ गतीने पुढे जातील, परंतु काही दिवसांपासून प्रियव्यक्तीशी संबंधित एखादी चिंता आपणास सतावत असेल तर ती दूर होऊन आपणास दिलासा मिळेल. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अनुकूल असला तरी उच्च शिक्षण घेणाऱ्यांना परिश्रम वाढवावे लागतील. आरोग्य विषयक काही त्रास होणार नसला तरी आठवड्याच्या शेवटच्या दिवशी आपणास थकवा व सुस्ती जाणवेल.

वृषभ- या आठवड्यात आपणास संबंधात व कामात थोडी काळजी घ्यावी लागेल. शक्यतो नवीन काही न करता आपल्या सद्य स्थितीस यथावत ठेवणे हितावह होईल. व्यापारात किंवा नोकरीत एखादा विशिष्ट टप्पा गाठल्यावर कामात खोळंबा झाल्याने नशिबाची साथ मिळत नसल्याची भावना होईल. ह्या व्यतिरिक्त देशांतर्गत कार्यात व भागीदारी कार्यात आपली फसवणूक होण्याची शक्यता आहे. असे असले तरी उत्तरार्धात कामाच्या ठिकाणी आपण उत्तम कामगिरी करू शकाल. उत्तरार्ध अनुकूल असल्याने त्या दरम्यान काही लाभ होण्याची शक्यता आहे. ह्या आठवड्यात वैचारिक गोंधळ माजल्याने विद्यार्थ्यांचे अभ्यासात फारसे लक्ष लागणार नाही. कोणताही निर्णय घेण्यात आपल्या कडून विलंब झाल्याचा परिणाम अभ्यासावर होईल. आध्यात्मिक बाबीत आपली रुची वाढेल. ह्या आठवड्याच्या सुरवातीसच आपल्या कौटुंबिक संबंधातील मर्यादा आपणास समजून घ्याव्या लागतील. वैवाहिक जीवन अधिक सुसह्य होण्यासाठी परिपकवपणा, शांतपणा व संयम बाळगण्याचा सल्ला देण्यात येत आहे. हा आठवडा प्रणयी जीवनासाठी सुद्धा विशेष आशास्पद असल्याचे दिसत नाही. आठवड्याच्या मध्यास अनिद्रेमुळे सुद्धा आजारपण येण्याची शक्यता आहे. आपले कोलेस्ट्रॉल किंवा मधुमेह वाढण्याची शक्यता आहे.

मिथुन- या  आठवड्याच्या सुरवातीस घर्षण व तणाव निर्माण करणाऱ्या परिस्थितीस आपणास सामोरे जावे लागेल. नोकरीतील कामगिरी प्रशंसनीय झाली तरी एखाद्या व्यक्तीशी आपल्या अहंकारामुळे घर्षण होणार नाही ह्याची काळजी घ्यावी लागेल. व्यावसायिक आघाडीवर सुद्धा आपली प्रगती होईल, परंतु सध्या अतिरिक्त कर्ज किंवा उसनवारी पासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात येत आहे. आठवड्याच्या मध्यास आपल्या वैवाहिक किंवा प्रणयी जोडीदारास आपण अधिक वेळ देऊ शकाल. व्यक्तिगत जीवनात आपणास समाधान लाभेल. उत्तरार्धात आरोग्य विषयक समस्या निर्माण होण्याच्या शक्यतेमुळे काळजी घ्यावी. ज्यांना शारीरिक अशक्तपणा, मधुमेह, मेदस्वीता किंवा कंबरदुखीचा त्रास असेल त्यांनी विशेष काळजी घ्यावी. आठवड्याच्या अखेरच्या दिवशी आपली स्फूर्ती वाढेल. सध्या विद्यार्थ्यांना अभ्यासात अधिक लक्ष घालावे लागेल. आठवड्याच्या उत्तरार्धात आध्यात्मिक उन्नतीत आपण अधिक स्वारस्य दाखविण्याची शक्यता आहे. त्यासाठी आपणास योग्य व्यक्तीचे मार्गदर्शन मिळू शकेल.

कर्क- आठवड्याच्या सुरवातीस संबंध टिकवून ठेवण्यास आपण अधिक सक्षम झाल्यामुळे प्रणयी किंवा वैवाहिक जीवनाशी संबंधित काही बाबी पूर्ण करण्यात आपल्याला यश प्राप्त होईल. ह्या दरम्यान भिन्नलिंगी व्यक्तीच्या सहवासाची आवश्यकता आपणास भासेल. आपण प्रेम, उब व सौहार्दतेत राहण्यास प्राधान्य द्याल. आठवड्याच्या मध्यास दैनंदिन जीवनशैलीत शिस्त पाळण्याचा आग्रह आपणास बाळगावा लागेल. ह्या दरम्यान आपण काम, भोजन व विश्रांतीचे नियोजन करून त्याचे अनुकरण केल्यास आरोग्य विषयक अनेक समस्या दूर होऊ शकतील. आठवड्याच्या मध्यास नोकरीतील आपली सक्रियता वाढेल. कामगिरी चांगली झाल्याने आपण प्रगतीचा मार्ग तयार करू शकाल. आठवड्याच्या अखेरच्या दिवशी व्यावसायिक आघाडीवर त्वरित फळ मिळण्याची आशा सोडून देवावर भरवसा ठेवून परिश्रम करण्यावर लक्ष केंद्रित करावे. ह्या आठवड्यात आपल्या शक्ती बाहेरची कामे करण्याचे किंवा आर्थिक धाडस करण्याचे टाळावे. विद्यार्थ्यांना अभ्यासातील परिश्रम वाढविण्याचा सल्ला देण्यात येत आहे.

सिंह- आठवड्याच्या सुरवातीस आपण कुटुंबियांच्या सहवासात वेळ घालवाल व त्यांच्या बरोबर उत्सवी वातावरणात मनोरंजनाचा आस्वाद घ्याल. नवीन वस्त्रालंकारांची खरेदी करू शकाल. प्रियव्यक्तीची सुद्धा भेट होऊ शकेल. नवीन संबंध जुळविण्याची योग्य संधी मिळू शकेल. विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची दाट शक्यता आहे. व्यावसायिक क्षेत्रात हितशत्रू व प्रतिस्पर्धी ह्यांच्या पासून सावध राहावे. कामात चुका न झाल्यास आपणावर कोणीही मात करू शकणार नाही. गूढ विद्या शिकण्यासाठी हा आठवडा अनुकूल आहे. ह्या आठवड्यात धार्मिक कार्यासाठी खर्च होण्याची शक्यता आहे. सुरवातीस विद्यार्थ्यांना थोडा ताण जाणवला तरी आठवड्याच्या मध्या पासून अभ्यासात एकाग्रता होऊ लागेल. आरोग्य विषयक कोणताही मोठा त्रास दिसत नसला तरी बदलत्या ऋतूचा आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. कलावंतांची कदर केली जाईल व त्यातून आर्थिक लाभ सुद्धा होऊ शकेल. ह्या आठवड्यात आर्थिक देवाण – घेवाणीची कामे जलद गतीने होऊ शकतील.

कन्या- आठवड्याच्या सुरवातीस आयात – निर्यातीशी संबंधित व्यापाऱ्यांना लाभ होऊन नवीन गिऱ्हाईके सुद्धा मिळतील. आपण जर नवीन धाडस करण्याचा किंवा नवीन सुरवात करण्याचा विचार करत असलात तर सारासार विचार करूनच पुढे जाण्याचा सल्ला देण्यात येत आहे. आठवड्याच्या सुरवातीस आपण भावंडे व मित्रांच्या सहवासात वेळ घालविण्याची किंवा एखादी सहल आयोजित करण्याची सुद्धा शक्यता आहे. आपली हरवलेली वस्तू परत मिळण्याची संभावना आहे. हा आठवडा स्फूर्ती व उत्साहात घालवू शकाल. आठवड्याच्या मध्यास गरजवंतांना मदत करण्याची किंवा दान – धर्म करण्याची वृत्ती वाढेल. कुटुंबीयांप्रती प्रेम वाढून त्यांना खुश करण्यासाठी आपण अधिक परिश्रम कराल. एखादी मोठी खरेदी करण्याची शक्यता सुद्धा आहे. संततीचे अभ्यास विषयक प्रश्न सोडविण्यात सध्या विलंब होऊ शकतो. उत्तरार्धात प्रणयी जीवनात पुढे जाण्याच्या अनेक संधी उपलब्ध होतील. विशेषतः भिन्नलिंगी मित्रांपैकीच एखाद्या व्यक्तीशी आपली जवळीक वाढू शकेल. वैवाहिक जीवनात रागावर नियंत्रण ठेवावे. विद्यार्थ्यांसाठी उत्तरार्ध अनुकूल आहे.

तूळ- आठवड्याच्या सुरवातीस आपल्या शब्दांचा चुकीचा अर्थ काढला जाऊ नये म्हणून वाणीत गोडवा ठेवण्याची खबरदारी घ्यावी. संपर्क, शिक्षण, सल्लागार सहित वाणीचे प्रभुत्व असलेल्या कोणत्याही कार्यात जपून पाऊल टाकावे. कोणाशी वाटाघाटी करावयाची असल्यास आठवड्याच्या मध्या नंतर ती करण्याचा सल्ला देण्यात येत आहे. आठवड्याच्या सुरवातीस संबंधात प्रेम व्यक्त करताना सुद्धा “थांबा व वाट पहा” ही  नीती योग्य राहील. पूर्वार्धात आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करावेत, अन्यथा आपली फसवणूक होण्याची किंवा अपेक्षेपेक्षा प्राप्ती कमी झाल्याने नैराश्य येण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या मध्या पासून आपल्या स्थितीत सुधारणा होऊ लागेल. कुटुंबियांशी संबंधात सौहार्दता राहील. त्यांच्या गरजा पूर्ण करण्यावर आपण भर द्याल. आठवड्याच्या मध्यास आप्तांसह एखाद्या प्रवासाचे आयोजन करू शकाल. विद्यार्थ्यांसाठी आठवडा अनुकूल असला तरी भावी अभ्यासा विषयी कोणतेही कार्य सुरु करण्याचे सध्या टाळावे.

व्रुश्चिक-  आठवड्याच्या सुरवातीस भावंडे व शेजाऱ्यांशी संबंधात सलोखा निर्माण होईल. हळू हळू आपली कामे पूर्ण झाल्याने आपण समाधानी व्हाल. वडीलधाऱ्यांच्या आशीर्वादाने आपले मनोबल उंचावेल. आपली प्रणयी भावना उत्कट असली तरी संबंधात पारदर्शी राहावे लागेल, तसेच जोडीदाराचा विश्वास सुद्धा संपादन करावा लागेल. शक्यतो संबंधात जोडीदाराची व्याप्ती अधिक ठेवण्याचा सल्ला देण्यात येत आहे. आठवड्याच्या मध्यास आपण आर्थिक बाबींवर अधिक लक्ष केंद्रित कराल. या आठवड्यात अचानक खर्चात वाढ होऊन आपले अंदाजपत्रक कोलमडण्याची शक्यता असल्याने आपणास खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. पैतृक संपत्तीतून होणाऱ्या लाभांची अपेक्षा बाळगू शकता. आठवड्याच्या उत्तरार्धात कुटुंबीय व मित्रांच्या सहवासात आनंदात वेळ घालवू शकाल. दैनंदिन कार्यक्रमातून बाहेर पडून आपण एखाद्या छोट्याशा प्रवासाचे आयोजन करण्याची शक्यता आहे. विद्यार्थी एखाद्या बौद्धिक चर्चेत सहभागी होऊन ज्ञान वृद्धी करू शकतील. आरोग्य विषयक काही काळजीचे कारण नाही. आपण तंदुरुस्तीसाठी जागरूक होऊन व्यायाम, योगासन, ध्यान – धारणा इत्यादी करण्याची शक्यता आहे.

धनू-  आठवड्याची सुरवात काहीशी नकारात्मकतेने होईल. त्यास आपली विचार सरणी व शारीरिक सुस्ती कारणीभूत होऊ शकते. अशा स्थितीत शक्यतो संबंधात पुढे जाणे टाळावे, तसेच कामात सुद्धा यथास्थिती टिकवून ठेवावी. सुरवातीस आपणास आत्मपरीक्षण करण्याची संधी मिळेल. सुरवातीस आपण निरुत्साहित राहिलात तरी, उत्तरार्धात एकदम उत्साहित होऊन कामास लागाल. उत्तरार्धात आपणास यात्रेस जाण्याची किंवा बाहेरगावी फिरावयास जाण्याची इच्छा झाल्यास आपली इच्छापूर्ती अवश्य करावी. आठवड्याच्या मध्यास व्यावसायिक क्षेत्रात लाभ व प्रगतीची अपेक्षा बाळगू शकता. कामात प्रगती साधण्यासाठी आपण नवीन लोकांना भेटण्याची शक्यता आहे. सध्या कायदेशीर व शासकीय कारणांमुळे काही अडथळे येऊ शकतात, तेव्हा सावध राहावे. वैभवी जीवनशैलीकडे कल झाल्याने आपण सढळहस्ते खर्च कराल. उत्तरार्धात आपल्या प्रियव्यक्तीसह दूरवर फिरावयास सुद्धा जाऊ शकाल.

मकर- आठवड्याच्या सुरवातीस आपण आजवर केलेल्या कामाचे फळ म्हणून व्यापार – व्यवसायात फायदा व प्राप्तीत वृद्धी होईल. पूर्वार्धात वडिलधाऱ्यांकडून सुद्धा एखादा फायदा होण्याची अपेक्षा बाळगू शकता. शासकीय कार्यात किंवा शासनाकडून लाभ होण्याची दाट शक्यता असली तरी उत्तरार्धात परिस्थितीत अचानक बदल होऊन कायदेशीर किंवा शासकीय खर्च वाढतील. पैतृक संपत्तीतून होणाऱ्या लाभात सुद्धा विलंब होईल. आठवड्याचे मधले दिवस खर्चाचे आहेत. सुरवातीचे व अखेरचे दिवस प्रेम संबंधां व्यतिरिक्त इतर सर्व संबंधांसाठी अनुकूल आहेत. असे असले तरी मधल्या दिवसात आपणास वाणी व वर्तनावर नियंत्रण ठेवावे लागेल. नोकरीत हितशत्रू दगा – फटका करण्याच्या शक्यतेमुळे सावध राहावे. विद्यार्थ्यांची अभ्यासाची सुरवात उत्साहात झाली तरी मधल्या दिवसात हाच उत्साह मावळण्याची शक्यता आहे. तसे पाहिल्यास हे दिवस योग्य नियोजन करूनच पुढे जाण्याचे आहेत. आठवड्याच्या मध्यास आरोग्य विषयक त्रास संभवतो. उत्तरार्धात आपण पुन्हा उत्साहित व्हाल.

कुंभ- आठवड्याच्या सुरवातीस आपण कारकिर्दीवर आपले लक्ष केंद्रित करून त्यात प्रगती साधण्याकडे आपला कल होईल. नोकरी – व्यवसायाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल तसेच वरिष्ठ आपल्या कौशल्याचे कौतुक करतील. प्रलंबित कामे पूर्णत्वास जातील किंवा त्यात अपेक्षित प्रगती होईल. शासकीय कामे, डिझायनिंग, चित्रपट, बँकिंग, माध्यमे, लेखन इत्यादी कार्यात चांगली प्रगती होऊ शकेल. कौटुंबिक जीवन आनंदाने भरलेले असेल. सार्वजनिक संमेलनात आपण सहभागी होण्याची अथवा कुटुंबात मंगल किंवा आनंदाच्या प्रसंगात सहभागी होऊन उत्सव साजरा करण्याची शक्यता आहे. व्यापारासाठी बाहेरगावी जावे लागेल. संततीच्या प्रगतीने आपण भारावून जाल. उत्तरार्धात आपले मन काहीसे चंचल होईल, तेव्हा कोणत्याही व्यक्तीशी व्यवहार करताना काळजी घ्यावी. प्रणयी जीवनात पुढे जाण्यासाठी आठवड्याचे मधले दिवस अनुकूल आहेत. विवाहेच्छुकांना सुद्धा योग्य जोडीदार मिळू शकेल. ह्या आठवड्यात धार्मिक कार्यासाठी खर्च करावा लागेल. उत्तरार्धात विद्यार्थ्यांची अभ्यासात उत्तम प्रगती होऊ शकेल. अखेरच्या दोन दिवसात शारीरिक समस्या व मानसिक चिंता आपणास सतावतील. अपघाताची शक्यता असल्याने वाहन काळजीपूर्वक चालवावे.

मिन-  आठवड्याच्या सुरवातीस आपल्या मनात विचारांचे वादळ उठल्याने कोणत्याही बाबतीत एकाग्रतेचा अभाव असल्याचे आपणास जाणवेल. आपण संबंध व दैनंदिन जीवनापासून दूर एकांतात राहण्यास प्राधान्य द्याल. आठवड्याच्या मध्या पासून ह्या स्थितीत सुधारणा होऊ लागेल. सुरवातीस व्यावसायिक आघाडीवर आपण कामात अपेक्षित प्रगती साधण्या पासून वंचित राहाल. असे असले तरी उत्तरार्धातील बहुतांश वेळ कारकिर्दीत प्रगती साधण्यासाठी आपण खर्च कराल. त्यातून सकारात्मक फळाची अपेक्षा बाळगू शकता. उत्तरार्धात आपण अधिक उदार व उत्साही व्हाल. आपण जर आर्थिक क्षेत्राशी संबंधित असाल तर आठवड्याच्या अखेरीस त्याचे प्रभावी आयोजन करू शकाल. तसेच आपल्या व्यावसायिक साहकाऱ्यां बरोबर सुद्धा उत्तम प्रकारे काम करू शकाल. परदेशातून एखादा धनलाभ संभवतो. आठवड्याच्या सुरवातीस आपणास गूढ व आध्यात्मिक बाबीत ज्ञानाची क्षितिजे विस्तारण्याची इच्छा होईल. उत्तरार्ध उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनुकूल आहे. आठवड्याच्या मध्या नंतर आपल्या कुटुंबियांना व प्रियव्यक्तीस आपण अद्भुत प्रकारे प्रभावित करू शकाल. व्यक्तिगत जीवनातील समस्या दूर करण्यासाठी अधिक कार्यरत व्हाल. विवाहितांना दुसरा मधुचंद्र साजरा करण्यास हा आठवडा अनुकूल आहे. आठवड्याच्या सुरवातीस आरोग्य विषयक समस्या उदभवल्या तरी हळू हळू त्यात सुधारणा झाल्याने आठवड्याच्या अखेरीस आपणास स्फूर्ती व उत्साह जाणवेल.