Weekly Horoscope December 27 to January 2, 2021 nrng
साप्ताहिक राशी भविष्य दि. २७ डिसेंबर ते २ जानेवारी २०२१; जाणून घ्या अशी आहे या आठवड्यात ग्रहांची चाल

  मेष- या आठवड्याची सुरवात आपल्यासाठी चांगलीच होईल. आपल्या प्राप्तीत वाढ झाल्यामुळे आपण आनंदित व्हाल. आपले प्रणयी जीवन सुखावह असेल. एकमेकातील समन्वय वाढेल. आपण आपल्या काही मित्रांची ओळख आपल्या प्रियव्यक्तीशी करून देऊ शकाल. विवाहितांच्या जीवनात काही तणावाचे वातावरण राहील, तेव्हा त्यांनी काळजी घ्यावी. नोकरी करणाऱ्यांना आपल्या कष्टाचे यथोचित फळ मिळू शकेल. आपली पदोन्नती संभवत असल्याने हातून कोणतीही चूक होऊ देऊ नका. व्यापाऱ्यांना परगावी जाऊन आपला व्यापार वाढविण्याचा प्रयत्न केल्यास त्यात यश प्राप्त होईल. आपल्या प्रकृतीत सुधारणा होईल व पूर्वीपेक्षा आता आपणास अधिक तजेला जाणवेल.

  वृषभ- हा आठवडा आपल्यासाठी खूपच चांगला आहे. असे असले तरी खर्चात मोठी वाढ सुद्धा होणार आहे.  एखाद्या तिसऱ्या व्यक्तीमुळे आपणास त्रास होण्याची शक्यता असल्याने काळजी घ्यावी. नोकरीत वरिष्ठांकडून प्रशंसित व्हाल व त्यामुळे आपला उत्साह द्विगुणित होईल. व्यापारातील आपले प्रतिस्पर्धी चांगली कामगिरी करत असल्याने आपणास काळजी घ्यावी लागेल. हा आठवडा विद्यार्थ्यांसाठी चांगला आहे. अध्ययनात आपले लक्ष लागेल. एखाद्या विद्वान व्यक्तीची भेट घेण्याची संधी मिळेल. आपली अभ्यासातील कामगिरी उत्तम होईल. ह्या आठवड्यात काही मानसिक तणावामुळे आपली प्रकृती बिघडण्याची शक्यता असल्याने काळजी घ्यावी.

  मिथुन- हा आठवडा आपणास यश मिळवून देणारा आहे. आपण आपल्या कामावर पूर्ण लक्ष देऊन सर्व सामर्थ्याने आपली कामे कराल व त्यामुळे आव्हानांचा सामना करून आपणास चांगले परिणाम मिळू शकतील. असे असले तरी वरिष्ठ ह्या ना त्या कारणाने आपल्यावर नाराज होतील. तसे ते आपणास सांगतील सुद्धा. आपणास आपल्या कामावर लक्ष देऊन मनातून अनामिक भीती काढावी लागेल. वैवाहिक जीवन सामान्यच राहील. प्रेमीजनांसाठी मात्र हा आठवडा चांगला असून आपल्या प्रियव्यक्तीस मनातील भावना मोकळेपणाने व्यक्त करता येतील. व्यापारीवर्गासाठी हा आठवडा विशेष असा चांगला नाही. अशा परिस्थितीत कोणतेही धाडस करू नये. शेअर्स बाजारात गुंतवणूक करण्यास हा आठवडा अनुकूल नसल्याने थोडी वाट पाहणे हितावह होईल.

  कर्क- आठवड्याच्या सुरवातीसच आपण आपल्या व्यावसायिक जीवनावर अधिक लक्ष केंद्रित कराल. आपल्या सहकाऱ्यांशी संवाद साधून आपली कामे नियोजित वेळेत पूर्ण करण्यास मदत होईल. एखाद्या नवीन कार्यातील यश आपले व्यावसायिक जीवन उंचावू शकेल. ह्या दरम्यान घेतलेले अपार कष्ट आपणास आपली आर्थिक स्थिती मजबूत करण्यास मदतरूप होईल. ह्या आठवड्याची ग्रहस्थिती नाते संबंधांसाठी अनुकूल नसल्याने संबंधांप्रती जागरूक राहण्याचा सल्ला आपणास देण्यात येत आहे. पैतृक संपत्तीशी संबंधित वादांच्या बाबतीत समाधान होण्यास विलंब होईल. ह्या दरम्यान एखाद्या बौद्धिक चर्चेत आपण सहभागी होऊ शकता. आपलेच म्हणणे खरे करण्याचा प्रयत्न करू नये. ह्या आठवड्यात आपल्या प्रेमाप्रतीच्या आकर्षणात वाढ होईल. परंतु, प्रेम हे विश्वास व वचनबद्धतेवर अवलंबून असते ह्याची जाणीव आपणास ठेवावी लागेल.

  सिंह- हा आठवडा आपल्यासाठी सामान्य फलदायी आहे. आठवड्याची सुरवात काहीशी कमकुवत होऊन आपण काही मानसिक चिंतेने ग्रस्त व्हाल. आपणास एखादी अनामिक चिंता सतावत राहील. आपली ढासळत चाललेली प्रकृती सुद्धा आपल्या काळजीस कारणीभूत होऊ शकेल. अशा परिस्थितीत स्वतःची काळजी घ्यावी, तसेच खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करावा. नशिबाची साथ अवश्य मिळू शकेल व त्यामुळे आपण घरी बसून सुद्धा अनेक कामे पूर्ण करू शकाल. नोकरीत चांगली कामगिरी होईल. आपले प्रयत्न सार्थकी लागतील. व्यापाऱ्यांना एखाद्या मोठ्या संस्थेशी सहयोग करण्याची संधी मिळेल. वैवाहिक जीवनात तणाव वाढतील. प्रेमीजनांसाठी मात्र हा आठवडा चांगला आहे.

  कन्या- हा आठवडा आपल्यासाठी आव्हानात्मक असून सुद्धा काही प्रमाणात फायदेशीर ठरणारा आहे. आठवड्याच्या सुरवातीस आपण कुटुंबियांना आवश्यक तितका वेळ देऊ शकाल. आपल्या वैवाहिक जोडीदाराच्या गरजा समजून घेऊन त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. आपण अति भावनाशील झाल्यामुळे आपले जोडीदाराशी संबंध दृढ होतील. आठवड्याच्या मध्यास काही चिंता विनाकारण आपणास त्रस्त करण्याची शक्यता आहे. ह्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर सुद्धा होऊ शकतो. आठवड्याच्या अखेरीस आपण एखाद्या प्रवासास जाऊ शकाल. ह्या दरम्यान प्रवासाचा आनंद आपण लुटू शकाल. ह्यात आपण नौकानयन किंवा बंगी जंपिंगचा आनंद सुद्धा घेऊ शकाल. नोकरी करणाऱ्यांच्या स्थितीत सुधारणा झाली तरी अजून आपल्या कामावर लक्ष देण्याची गरज आहे. आता आपल्या कष्टाचे फळ मिळण्यास सुरवात होईल. काही लोकांना शासनाकडून फायदा होऊ शकतो. व्यापारी वर्गास आपला व्यापार वाढविण्यासाठी प्रयत्नशील राहावे लागेल.

  तूळ- हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. सर्वात आधी आपणास आपल्या प्रणयी जीवनावर लक्ष केंद्रित करावे लागेल. शक्यता आहे की आपली प्रियव्यक्ती नुसता दिखाऊपणा करेल जो आपणास अजिबात पसंत नसेल. त्यामुळे आपल्यात मतभेद होऊ शकतात. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात आनंद पसरेल. जोडीदार मनापासून संबंध टिकविण्याचा प्रयत्न करेल व आपलाही तोच प्रयत्न असेल. नोकरीत प्रगती होईल. आपणास एखाद्या दुसऱ्या नोकरीची ऑफर येण्याची शक्यता सुद्धा आहे. व्यापारी वर्गासाठी हा आठवडा चांगला असून कामात यश प्राप्त होईल. आपली प्रकृती चांगली राहील. ह्या आठवड्यात कुटुंबियांसह एखाद्या सहलीस आपण जाऊ शकाल. प्राप्ती चांगली होईल. विद्यार्थी एकाग्रतेने अध्ययन करू शकतील.

  वृश्चिक- हा आठवडा आपल्यासाठी खूपच चांगला आहे. आपण वैवाहिक व प्रणयी जीवनाचा आनंद उपभोगू शकाल. प्रणयी जीवनासाठी हा आठवडा अत्यंत चांगला आहे.  प्रेमालाप करण्याची संधी मिळेल. विवाहितांना सुद्धा आपल्या जोडीदारास खुश ठेवण्याची संधी मिळेल. आपला जोडीदार खुश झाल्याने आपले नाते संबंध अधिक दृढ होईल. नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा चांगला आहे. कामे चांगली होऊन आपली प्रशंसा केली जाईल. व्यापाऱ्यांना भागीदारामुळे खूप मोठा फायदा होईल. भागीदार आपल्यापेक्षा अधिक कष्ट करेल व त्याचा आपणास सुद्धा फायदा होईल. आपली प्रकृती सामान्य राहील. आठवड्याचे मधले दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत. प्रवासामुळे आपल्या प्राप्तीत वाढ होईल.

  धनु- हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. आपण आव्हानांना सामोरे जाण्यास सज्ज असल्याने त्यांच्यावर मात करू शकाल. आपला आत्मविश्वासच आपले शस्त्र ठरेल व त्यामुळे आपल्या समस्यांचे निराकरण आपण सहजपणे करू शकाल. नोकरीच्या ठिकाणी सहकाऱ्यांचे अपेक्षित सहकार्य मिळाल्याने आपली स्थिती मजबूत होईल. व्यापारी वर्गासाठी हा आठवडा सामान्यच आहे. कोठे कोठे नवीन सुधारणा करण्याची गरज आहे ह्याचा आपणास अभ्यास करावा लागेल. विवाहितांचे वैवाहिक जीवन सामान्यच राहील. प्रेमीजनांनी मात्र, आपल्या मनातील भावना मोकळेपणाने प्रियव्यक्ती समोर व्यक्त केल्यास समोरची व्यक्ती त्यास समजून घेऊ शकेल. आठवड्याचे सुरवातीचे दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत. ह्या आठवड्यात आपणास प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल.

  मकर- हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. आठवड्याच्या सुरवातीसच आपणास आर्थिक बाबीं संबंधी एखादी चांगली बातमी मिळू शकेल. आर्थिक प्राप्ती चांगली होईल. कुटुंबात आनंद पसरेल. लोकांच्या भेटीगाठी घेण्याची संधी मिळेल. आपल्या प्रकृतीत सुधारणा होईल. असे असले तरी आरोग्याप्रती बेफिकीर राहू नये. जमीन व घराची प्राप्ती संभवते. प्राप्ती सामान्यच होईल. खर्च नियंत्रणात राहतील. नोकरीत कामाचा आनंद घेऊ शकाल. व्यापारांच्या व्यापारात मोठी प्रगती होऊ शकेल. हा आठवडा प्रेमीजनांसाठी चांगला आहे. आपण मनापासून आपल्या प्रियव्यक्तीस खुश ठेवण्याचा प्रयत्न कराल व त्यामुळे नाते संबंध दृढ होईल. विवाहितांचे वैवाहिक जीवन त्यांच्या समजूतदारपणावर आधारित असेल. आठवड्याचे मधले दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत.

  कुंभ- आपल्या प्रकृतीत सुधारणा होईल. आपले व्यक्तिमत्व खुलून उठेल. लोक आपल्याकडे आकर्षित झाल्याने आपले प्रणयी जीवन सुद्धा खुलून उठेल. आपल्या प्रियव्यक्तीस आपण एखादी मोठी भेटवस्तू देऊन अनेक लोकां समक्ष तिला मागणी घालू शकाल. विवाहितांचे वैवाहिक जीवन सामान्यच राहील. आपला जोडीदार आपणास खुश करण्याचा प्रयत्न करेल. आपण सुद्धा समजूतदारपणाने वैवाहिक जीवनाचा आनंद उपभोगाल. नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा उन्नतीदायक आहे. त्यांना त्यांच्या कष्टाचे यथोचित फळ मिळेल. धाडसी प्रवृत्तीमुळे व्यापारात आपण प्रगती साधू शकाल. खर्चात वाढ संभवते. प्राप्ती सामान्यच राहील. आठवड्याचे अखेरचे दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत.

  मीन- हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. या आठवड्यात आपण आजारी पडण्याची शक्यता असल्याने प्रकृतीची काळजी घ्यावी. ऋतुगत आजारां व्यतिरिक्त ताप, सर्दी, खोकला होण्याची शक्यता आहे. प्राप्तीत वाढ झाली तरी खर्चात सुद्धा वाढ होणार आहे. तेव्हा त्याची काळजी घ्यावी. नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा आनंददायी आहे. वरिष्ठांना आपले म्हणणे पटवून देण्यात यशस्वी झाल्याने आपण सहजपणे आपली कामे करू शकाल. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी सुद्धा चांगला आहे. कामात प्रगती होईल. एखाद्या नवीन क्षेत्रातून नवीन प्रकल्प मिळण्याची शक्यता आहे. काही नवीन कामे झाल्याने नवीन सौदे प्राप्त होतील. विवाहितांचे वैवाहिक जीवन आनंदाने परिपूर्ण असेल. प्रेमीजनांसाठी हा आठवडा आनंददायी आहे. आठवड्याचे अखेरचे दिवस प्रवासासाठी अनुकूल आहेत. विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगले परिणाम मिळण्यास सुरवात होईल.