राशी भविष्य दि. १७ डिसेंबर २०२०; या राशीच्या लोकांना प्रपोज करण्यासाठी चांगला दिवस, वाचा राशिभविष्य

मेष – नोकरदारवर्गाची बढती होऊ शकते. अधिकाऱ्यांची मदत मिळेल. सोबत असणाऱ्या लोकांची मदत होईल. नवीन काम करु शकतात. नवीन लोकांशी ओळखी होतील. प्रेमसंबंधांसाठी दिवस चांगला आहे.

वृषभ – व्यवसायात निर्णय सावधतेने घ्या. नुकसान होऊ शकते. एखाद्या कामामुळे गोंधळून जाल. एखाद्या कामाबाबत मनात भीती राहील. तुम्ही केलेल्या योजना असफल होण्याची शक्यता आहे. मुलांसंबंधी टेन्शन वाढू शकते.

मिथुन – बेरोजगार लोकांना रोजगार मिळू शकतो. व्यावसायात लाभ मिळेल. महत्त्वाची कामं पूर्ण होतील. तुमच्यावर टीका करणाऱ्यांना कामातून चोख उत्तर द्याल. ऑफिसमध्ये अधिकारी खुश होतील. पती-पत्नीतील संबंध मजबूत होतील.

कर्क – व्यावसायिकांसाठी दिवस चांगला आहे. प्रेमसंबंधांसाठी दिवस चांगला आहे. जोडीदारासोबत वेळ घालवाल. कुटुंबातील वातावरण चांगले राहील. नोकरी, व्यवसायातील कामं पूर्ण होऊ शकतात. कोणताही महत्त्वाचा निर्णय विचार करुन घ्या. कामाची प्रशंसा होऊ शकते.

सिंह – कामात यश मिळेल. फायद्याचे सौदे होऊ शकतात. नोकरदारवर्गाला धनलाभाची शक्यता आहे. कामात मेहनत अधिक घ्यावी लागेल. तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टी मिळू शकतात. उत्साही राहाल. वैवाहिक जीवन सुखी राहील. चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. तब्येत ठिक राहील.

कन्या – मेहनत अधिक घ्यावी लागेल. फायदा होईल. नोकरदारवर्गासाठी दिवस चांगला आहे. जुन्या समस्या संपतील. जुनी कामं पूर्ण होतील. जोडीदारासोबत फिरायला जाऊ शकता.

तुळ – विचार करुन गुंतवणूक करा. ऑफिसमध्ये काम टाळू नका. सोबत असलेल्या लोकांची मदत होईल. कुटुंबाच्या मदतीने मन प्रसन्न राहील. करियरमध्ये प्रगतीसाठी संपूर्ण प्रयत्न करा. मेहनतीने इतरांवर तुमचा प्रभाव पाडाल. जोडीदाराच्या भावनांचा आदर करा. तब्येत ठिक राहील.

वृश्चिक – नोकरीत बढतीची शक्यता आहे. प्रपोज करण्यासाठी दिवस चांगला आहे, परंतु विचार करुन निर्णय घ्या. जुनी दुखणी वर येऊ शकतात. ऑफिसमध्ये काही लोक एखादी माहिती तुमच्यापासून लपवण्याचा प्रयत्न करतील. गुंतवणूक किंवा बचतीची योजना आखू शकता. विचार केलेली कामं पूर्ण करण्यासाठी अधिक मेहनत करावी लागू शकते.

धनु – विचार केलेली कामं पूर्ण न झाल्याने दुखी होऊ सकता. धनहानी होण्याची शक्यता आहे. तणावपूर्ण दिवस राहील. काम अधिक कराल, परंतु फायदा मिळणार नाही. धावपळ होईल. कुटुंबातील सदस्यांची काळजी घ्या.

मकर – ऑफिसमध्ये अधिक मेहनत करावी लागू शकते. महत्त्वपूर्ण यश मिळण्याची शक्यता नाही. जुने आजार त्रास देतील. खाताना सावध राहा. दररोजच्या कामात कोणाचीही मदत मिळणार नाही. घाई-घाईत घेतलेल्या निर्णयांमुळे समस्या होऊ शकते. नुकसान होण्याची शक्यता आहे. ऑफिसमधील समस्या वाढू शकतात.

कुंभ – कोणतीही गुंतवणूक विचार करुन करा. सावध राहा. कामात मन लागणार नाही. वायफळ खर्च होऊ शकतो. एखादी अशी गोष्ट बोलू नका ज्याने तुमची कामं बिघडण्याची शक्यता आहे. जखमी होऊ शकता. वाहन चालवताना सावधतेने चालवा.

मीन – व्यवसायात टेन्शन वाढेल. सावध राहावे लागेल. तब्येतीच्या बाबतीत कोणताही हलगर्जीपणा करु नका. अंगदुखी होऊ शकते. नुकसान होऊ शकते. कोणत्याही गोष्टीला विरोध कराल तर समस्या वाढू शकतात. कोणत्याही नवीन कामाची सुरुवात करु नका.