राशी भविष्य दि. १४ मार्च २०२१; या राशीच्या लोकांना होणार आर्थिक लाभ; वाचा आजचं राशीभविष्य

  मेष- आज बोलताना काळजी घ्या. व्यवसाय आणि कामाच्या ठिकाणी तसा दिवस बरा असेल मात्र सावधानी बाळगावी लागेल.

  वृषभ- आज आपलं नुकसान होण्याची शक्यता आहे. वडिलांच्या आरोग्याकडे लक्ष द्या. आपलं आरोग्य बिघडणार नाही याची काळजी घ्या.

  मिथुन- आरोग्याकडे लक्ष द्या. लग्न तुटण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी कोणतीही जोखीम उचलू नका.

  कर्क- प्रेमात समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. ओटीपोटाच्या समस्या जाणवतील.

  सिंह-  आज आपल्याला अनेक अडचणी येतील. त्यामुळे हार न मानता आपले प्रयत्न कायम सुरू ठेवा. प्रेम प्रकरणांमध्ये लक्ष घालण्याची गरज आहे.

  कन्या- मुलांच्या आरोग्याची काळजी घ्या. आरोग्य चांगलं राहिल मात्र मनस्थिती द्विधा असल्यानं अस्वस्थ वाटेल.

  तूळ- आरोग्य बिघडण्याची दाट शक्यता आहे. जमिनीशी संबंधित कामात अडथळे येतील.

  वृश्चिक- आज अनेक लोक आपली मदत करतील. व्यवसायात प्रगती होईल.

  धनु- डोळ्यांना त्रास होण्याची शक्यता आहे. प्रेमात आजचा दिवस आपला खूप सुंदर जाईल.

  मकर- बैचेन आणि मन विचलित होणाऱ्या गोष्टी आज घडतील. नकारात्मक गोष्टींपासून दूर राहा.

  कुंभ- आपली वेळ चांगली नाही. त्यामुळे कोणतीही गोष्ट करताना काळजी घ्या. शारीरिक समस्यांचा सामना करावा लागेल.

  मीन- आर्थिक स्थिती बळकट होईल. अचानक धनलाभ होऊ शकतो. वादविवादापासून दूर राहा.