राष्ट्रभक्तीसाठी मालकाने नाकारले ५ लाखांचे भाडे; ध्वजस्तंभासाठी अवाढव्य क्रेन

रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने चौकशी करता, अशी क्रेन मुंबई-गोवा महामार्गावरून जाणार असल्याचे कळले. या क्रेन मालकाशी संपर्क साधला असता त्याने रत्नागिरीत येण्याची तयारी दाखवली. सुनील स्टील कॅरिअर इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. च्या मालकाने हे भाडे ८ तासांचे ५ लाख रुपये भाडे नाकारले, असे जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी सांगितले.

    रत्नागिरी : रत्नागिरी (Ratnagiri) जिल्हाधिकारी कार्यालयाच्या (Collector Office) आवारात उभारण्यात आलेल्या १०० फुटी ध्वजस्तंभाची दुरुस्ती (Flagpole Maintenance) महाकाय क्रेनच्या (Giant Craine) साहाय्याने करण्यात आली. यावेळी क्रेन मालकाने यासाठी कोणताही मोबदला (Compensation) न घेता, आपली राष्ट्रभक्ती (Patriotism) दाखवून दिली. या स्तंभाच्या दुरुस्तीसाठी क्रेन आणण्याला सुमारे ५ लाख भाडे लागणार होते, ते नाकारल्याने या क्रेन मालकाचे कौतुक होत आहे.

    आम्ही त्यांना आग्रह केला होता, पण आजादी का अमृत महोत्सवाच्या निमित्ताने आमचेही योगदान देण्याची संधी आम्हाला या निमित्ताने मिळाली. त्यामुळे राष्ट्रभावनेने आम्ही हे काम केले असून आम्हाला कोणताही मोबदला नको, असे क्रेन मालक म्हणाल्याचे जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी सांगितले.

    तत्कालीन पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या काळात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात १०० फूट उंचीचा ध्वजस्तंभ उभारण्यात आला होता. हा ध्वज स्तंभ म्हणजे रत्नागिरीकरांसाठी गौरव होता. मात्र, मागील सुमारे २ वर्षापासून या ध्वज स्तंभावर ध्वज फडकवला न गेल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. या कामासाठी अवाढव्य क्रेनची आवश्यकता होती. जिल्हा प्रशासनाने चौकशी करता, अशी क्रेन मुंबई-गोवा महामार्गावरून जाणार असल्याचे कळले. या क्रेन मालकाशी संपर्क साधला असता त्याने रत्नागिरीत येण्याची तयारी दाखवली. सुनील स्टील कॅरिअर इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. च्या मालकाने हे भाडे ८ तासांचे ५ लाख रुपये भाडे नाकारले, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.