हर घर तिरंगा अभियानाचा दादासाहेब फाळके चित्रनगरीत उत्साहात शुभारंभ

महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 'हर घर तिरंगा' उपक्रमातर्गत आयोजित करण्यात आलेल्या 'तिरंगा बाईक रॅली'ला महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक श्री.विवेक भीमनवार यांनी झेंडा दाखवून शुभारंभ केला. अतिशय उत्साही वातावरणात चित्रनगरी परिसरात ही तिरंगा बाईक रॅली संपन्न झाली.

    मुंबई: दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या मुख्य प्रवेशद्वारापासून रॅलीचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी प्रत्येक सेटवर तिरंगा ध्वज फडकविण्यासाठी प्रत्येक सेटला भेट देऊन निर्मितीसंस्थांच्या प्रतिनिधीकडे देशाचा तिरंगी ध्वज सन्मानाने सुपूर्द करण्यात आला. संस्थेच्या प्रतिनिधीनी सन्मानाने तिरंगी ध्वजाचा स्वीकार केला.

    या रॅलीत महामंडळाचे अधिकारी-कर्मचारी, सुरक्षा जवान, बॉलीवूडपार्कचे कर्मचारी उस्फुर्तपणे सहभागी झाली होते. यावेळी व्यवस्थापक (कलागारे) तथा मुख्य प्रशासकीय अधिकारी विजय भालेराव, वित्तीय सल्लागार आणि मुख्य लेखाधिकारी सई दळवी, जनसंपर्क अधिकारी मंगेश राऊळ, सहाय्यक व्यवस्थापक (कलागारे) मोहन शर्मा, उप व्यवस्थापक (नियोजन व विकास) मुकेश भारद्वाज, उप अभियंता (स्थापत्य) संतोष कुमार मुरुडकर अंतर्गत लेखा परीक्षक राजू राठोड, कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य) प्रमोद लोखंडे, मुख्य सुरक्षा अधिकारी सुनील पोखरकर, सहाय्यक सुरक्षा अधिकारी प्रसाद नाटकर तसेच विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.