science and technology in india

आजचे आपले जग तंत्रज्ञानाच्या सहाय्याने व्यापलेले आहे. हातातील मोबाईलपासून ते लॅपटॉप, इंटरनेटपर्यंतच्या अनेक सुविधांमुळे भारतीयांचे जगणे सुकर झाले आहेच, त्याचबरोबर ते जागतिक पातळीवरही स्थिरावले आहेत. स्वातंत्र्योत्तर काळातील तंत्रज्ञानातील काही महत्त्वाच्या पैलूंवर दृष्टीक्षेप.

    अनेक प्रकारच्या वैज्ञानिक(Scientific) आणि तांत्रिक वैज्ञानिक आणि तांत्रिक विकासाने(Technical Development) सामान्य भारतीय माणसाच्या जीवनाला स्पर्श केला आहे. एखाद्या देशाच्या प्रगतीचा (Growth Of India) मानदंड म्हणजे विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रात स्वावलंबीत्व.(Independence Day 2021) म्हणूनच स्वातंत्र्याच्या या अमृत महोत्सवाच्या मिमित्ताने(75th Independence Day) भारताने विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रात(India`s Development In Science And Technology ) साधलेल्या प्रगतीचा आढावा घेणे क्रमप्राप्त ठरते.

    औषध निर्माण

    आज भारत ‘जगाचे औषधालय’ म्हणून ओळखला जातो कारण भारतीय औषध निर्माण कंपन्या परवडतील अशा किमतीत औषधे आणि लसी केवळ विकासशील आणि गरीब देशांनाच नव्हे तर विकसित देशांना देखील पुरवितो आहे.

    आता तो काळ लोटला आहे जेव्हा भारतीय औषध बाजार विदेशी कंपन्यांची मक्तेदारी होती आणि या विदेशी कंपन्या औषधे भारतीय बाजारपेठेत तुलनेने महाग विकत होत्या. या विदेशी महागड्या औषध निर्माण कंपन्यांची मक्तेदारी समाप्त करण्यासाठी केंद्र सरकारने १९५४ साली ‘Hindustan Antibiotics Limited’ ची स्थापना केली. कायदे करून भारतीय कंपन्यांना प्रोत्साहन देऊन या कंपन्या विदेशी कंपन्यांच्या स्पर्धेत टिकाव धरतील हे सुनिश्चित केले गेले. आजच्या या कोरोना महामारीच्या काळात देखील भारतीय बनावटीच्या कोरोनापासून संरक्षण देणाऱ्या लसी भारत मानवीय आधारावर आपल्या मित्र राष्ट्रांना देऊन मदत करीत आहे तर दुसऱ्या बाजूला चीनी कंपन्या अतिशय महागड्या दरात लसी इतर राष्ट्रांना विकत आहेत.

    माहिती तंत्रज्ञान

    माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात स्वातंत्र्योत्तर काळात IBM व ICL या बहुराष्ट्रीय कंपन्यांची मक्तेदारी होती. या बहुराष्ट्रीय कंपन्यांची मदत भारताला सार्वजनिक क्षेत्र, खाजगी क्षेत्र, संरक्षण क्षेत्र अशा विवध ठिकाणी घ्यावी लागे. या बहुराष्ट्रीय कंपन्यांची मुदत संपलेली, जुनी उत्पादने भारताला अत्याधिक किमतीने भाडेतत्वावर घ्यावी लागत. या बहुराष्ट्रीय कंपन्यांची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी भारताने Electronic Development Corporation in India या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीची सुरुवात केली. संगणक वापरता यावेत यासाठी महाविद्यालयांमध्ये त्यासंबंधी अभ्यासक्रम सुरु करण्यात आले, प्रशिक्षणावर भर देण्यात आला. आज भारतातील सर्वाधिक लोकप्रिय रोजगार क्षेत्र म्हणून माहिती तंत्रज्ञान क्षेत्र ओळखले जाते. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात झालेला विकास व त्याच्या समस्त भारतीयांना मिळाणारा लाभ असामान्य आहे. बहुतांश सरकारी व खाजगी सेवा विविध एप्लीकेश्न्सच्या माध्यमातून ऑनलाईन मिळू लागल्याने पैसा व इंधन व वेळ याची बचत होते आहे व प्रशासन गतिमान व पारदर्शी बनविण्याकामी त्याचा उपयोग होतो आहे.

    मागील ७५ वर्षात भारताने अणुभट्ट्यांची भारतात स्थापना केली, अण्वस्त्रे आणि मिसाईल कार्यक्रम राबवून देशाचे संरक्षण क्षेत्रातील परकीय अवलंबित्व कमी केले. भारतीय शास्त्रज्ञांचे हे यश निश्चितच वाखाणण्याजोगे आहे.

    शस्त्रास्त्रनिर्मिती

    १९४७ साली इंग्रज भारत सोडून गेले परंतु ब्रिटीश कालीन शस्त्र भारतीय सेनेतून हद्दपार व्हायला बराच वेळ लागला. संरक्षण साहित्याच्या निर्मितीसाठी आयुध निर्माण कारखान्यांची भारतात स्थापना तर झाली परंतु सरकारी कार्यपद्धती आणि बाबूशाही इथेही आड आली. बदलत्या काळानुसार आधुनिक शास्त्रांची निर्मिती करण्यात भारताची पीछेहाट झाली. तेजस लढावू विमान तयार करण्यास तीन दशकांचा कालखंड जावा लागला. परंतु आता भारताने संरक्षण क्षेत्रात देखील कात टाकायला सुरुवात केली आहे. केवळ शस्त्र आयातीवर भर देणारा भारत आता शस्त्र निर्यात देखील करू लागला आहे.

    संरक्षण मंत्रालयाच्या २०२० मधील आकडेवारीनुसार भारताने मागील सात वर्षात ३५,७७७ कोटी रुपयांचे संरक्षण साहित्य निर्यात केले आहे. भारताच्या संरक्षण उत्पादनाचा दर्जा आणि मागणी वाढत असल्याचे हे द्योतक आहे. बदलत्या तंत्रज्ञानाची मागणी पूर्ण करण्यासाठी संरक्षण साहित्य निर्मिती क्षेत्र भारताने ४९% वरून ७४% पर्यंत परकीय प्रत्यक्ष गुंतवणुकीसाठी खुले केले आहे तसेच संरक्षण साहित्य निर्मिती क्षेत्रात खाजगी उद्योगांना सामावून घेतले गेले आहे. संरक्षण साहित्याच्या बाबतीत इतर देशांवर अवलंबून राहण्या ऐवजी भारतात संरक्षण साहित्याची निर्मिती व्हावी यावर भर दिला जात आहे. नुकतेच चाचण्या सुरु असलेले विमानवाहू लढाऊ जहाज आय.एन.एस. विक्रांत भारतात तयार केले गेले आहे. नजीकच्या भविष्यात भारत संरक्षण साहित्य निर्मितीच्या व निर्यातीच्या बाबतीत विकसित देशांशी स्पर्धा करेल अशी आशा वाटते.

    – शरद पाटील