महात्मा गांधी आवडते राष्ट्रीय नायक; विद्यार्थ्यांना अधिक जाणून घेण्याची इच्छा

४१ टक्के मतांसह म. गांधी हे सर्वात आवडते आणि प्रेरणादायी नेते ठरले. गांधीजींचे अहिंसेचे तत्वज्ञान आणि कणखर नेतृत्व विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरले. क्रांतिकारक भगतसिंग हे ३२ टक्के मतांसह दुसऱ्या क्रमांकावर, ५९ टक्के विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाला योग्यरित्या योग्य प्रतिसाद दिला.

    मुंबई : १५ ऑगस्ट रोजी भारत स्वतंत्र (Independence Day) झाला. त्याला आता ७५ वर्षे झाली. यानिमित्त भारतातील आघाडीच्या ऑनलाइन अध्ययन मंचच्यावतीने (Online Adhyayan Manch) भारताच्या प्रतिष्ठित इतिहासाबद्दल आणि त्यांच्या राष्ट्रीय नायकांबद्दलच्या जागरूकतेचे मूल्यांकन करण्यात आले. यामध्ये माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांना प्रश्न (Students Question) विचारण्यात आले. त्यात आवडते राष्ट्रीय नायक (National Hero) कोण, या प्रश्नावर ४१ टक्के विद्यार्थ्यांची मते महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांना मिळाली.

    ४१ टक्के मतांसह म. गांधी हे सर्वात आवडते आणि प्रेरणादायी नेते ठरले. गांधीजींचे अहिंसेचे तत्वज्ञान आणि कणखर नेतृत्व विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरले. क्रांतिकारक भगतसिंग हे ३२ टक्के मतांसह दुसऱ्या क्रमांकावर, ५९ टक्के विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाला योग्यरित्या योग्य प्रतिसाद दिला.

    विद्यार्थ्यांना देशाच्या इतिहासाबद्दल अधिक जाणून घेण्यास स्वारस्य आहे. परंतु, माहिती वितरणात काही त्रुटी आहेत, ज्या चांगल्या प्रकारे दूर करून माहिती करून देणे आवश्यक आहे, असे ब्रेनलीचे व्यवस्थापकीय संचालक नरसिंहा जयकुमार यांनी सांगितले.