स्वातंत्र्य दिनानिमित्त टीसीएलची विशेष सवलत, १० सप्टेंबरपर्यंत मिळणार आकर्षक सूट

७५वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्याच्या अभिमानी भावनेला जागृत करत टीसीएल हा जागतिक पहिल्या क्रमांकाचा अँड्रॉईड स्मार्ट टीव्ही ब्रॅण्डने सेलिब्रेट फ्रीडम वुईथ टीसीएल मोहिमेचे अनावरण केले आहे. या मोहिमेअंतर्गत ग्राहक कोणताही टीसीएल ४के टीव्ही खरेदी करू शकतात आणि १,४९,९९० रूपये किंमतीचा ७५-इंच टीसीएल सी६३५ गेमिंग क्यूएलईडी ४के गुगल टीव्ही जिंकण्याची संधी मिळवू शकतात.

    संपूर्ण भारतात ही मोहिम १० ऑगस्ट ते १० सप्टेंबरपर्यंत राबवण्यात येईल, जेथे ग्राहक ऑनलाइन आणि त्यांच्या जवळच्या टीसीएल चॅनेल भागीदारांकडून स्मार्ट ४के टीव्ही खरेदी करू शकतील. टीसीएल ४के टीव्ही खरेदी करा, टीसीएल लॅण्डिंग पेजवर जा, चॅनेल अॅण्ड सिलेक्ट मॉडेलवर क्लिक करा, इन्वॉईस व वॉइला अपलोड करा आणि क्षणात आधुनिक टीव्ही तंत्रज्ञान जिंकण्याची संधी मिळवा. टीसीएल आपल्या सोशल मीडिया माध्यमांच्या माध्यमातून दर आठवड्याला विजेत्यांची घोषणा करेल, याचा अर्थ असा की ग्राहकांना त्यांच्या घरामध्ये दर्जात्मक टीव्ही आणण्यासाठी व्यापक संधी असेल.

    सेलिब्रेट फ्रीडम वुईथ टीसीएल मोहिमेव्यतिरिक्त ग्राहकांना पिन इट टू विन इट मोहिमेअंतर्गत देखील टीसीएल ५० पी६१५ टीव्ही इनोव्हेशन जिंकण्याची संधी आहे. या टीव्ही तंत्रज्ञानासोबत ग्राहकांना मोफत टीसीएल साऊंडबार, मोफत टीसीएल इअरफोन्स, मिनी-एलईडी टीव्हीवर १२ टक्के सूट, क्यूएलईडी टीव्हीवर ८ टक्के सूट, ४के यूएचडी टीव्हीवर ६ टक्के सूट, २के टीव्हीवर ५ टक्के सूट अशा इतर अनेक ऑफर्स मिळण्याची जीवनातील अमूल्य संधी असेल. या स्पर्धेमध्ये सहभाग घेण्यासाठी https://www.tcl.com/in/en/pinittowinit येथे क्लिक करा.

    टीसीएल इंडियाचे विपणन प्रमुख विजय कुमार मिक्किलीनेनी म्हणाले, “सहकारी नागरिकांना ७५व्या स्वातंत्र्य दिनाच्या आनंदमय शुभेच्छा. आपल्या सर्वांसाठी हा अभिमानास्पद क्षण आहे आणि टीसीएलचा या क्षणाला अधिक खास बनवण्याचा मनसुबा आहे. आमच्या दोन सुरू असलेल्या मोहिमा सेलिब्रेट फ्रीडम वुईथ टीसीएल आणि पिन इट टू विन इट काळजीपूर्वक विचार केल्यानंतर लॉन्‍च करण्यात आल्या आहेत.”