देशात गेल्या २४ तासांत ११ हजार ४५८ इतक्या नव्या रूग्णांची नोंद

संपूर्ण जगभरासह देशात कोरोना विषाणूने थैमान घातला आहे. तसेच कोरोनाचा संसर्ग हा दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे लोकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरलेले पाहायला मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मागील सतत नऊ

संपूर्ण जगभरासह देशात कोरोना विषाणूने थैमान घातला आहे. तसेच कोरोनाचा संसर्ग हा दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे लोकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरलेले पाहायला मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मागील सतत नऊ दिवसांपासून वाढणारी संख्या आता आज शुक्रवारी ११ हजारांच्या जवळ पोहोचली आहे. देशात गेल्या २४ तासांत ११,४५८ इतक्या नव्या कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे कोरोना रूग्णांचा एकूण आकडा ३ लाख ८ हजार ९९३ इतका प्रचंड गतीने वाढला आहे. 

देशात लॉकडाऊनचा पाचवा टप्पा सुरू होऊन अवघे काही दिवस झाले आहेत. मात्र, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देशात समूह संसर्ग झाला नसल्याचा दावा केला असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ४९.४७ टक्के असल्याचेही सांगितले. सध्या  १ लाख ५४ हजार ३३० रुग्ण बरे झाले असून १ लाख ४५ हजार ७७९ रुग्ण उपचार घेत आहेत. आतापर्यंत देशात गेल्या २४ तासांत ३८६ कोरोनाबाधित रुग्णांचा बळी गेला आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्यात कोरोनाचे सर्वाधिक रूग्ण असून गुजरात, मध्यप्रदेश, दिल्ली, आणि  पश्चिम बंगालमध्येही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे.