bird flu

बर्ड फ्लूमुळे एका ११ वर्षांच्या मुलाचा(11 Year Old Boy died Due to Bird Flu) मृत्यू झाला आहे. बर्ड फ्लूमुळे माणसाचा मृत्यू होण्याची ही देशातील पहिलीच घटना आहे.

    देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा(Corona Third Wave) इशारा देण्यात आलेला आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. यातच आता चिंता वाढणारी आणखी एक घटना समोर आली आहे. बर्ड फ्लूमुळे एका ११ वर्षांच्या मुलाचा(11 Year Old Boy died Due to Bird Flu) मृत्यू झाला आहे. बर्ड फ्लूमुळे माणसाचा मृत्यू होण्याची ही देशातील पहिलीच घटना आहे. या ११ वर्षीय मुलावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू होते.

    हरयाणातील एका ११ वर्षांच्या मुलाला दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. २ जुलै रोजी या मुलाला रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं. मुलाला ताप आणि खोकला अशी लक्षणं होती. ही लक्षणं कोविडशी मिळती जुळती असल्यानं त्याला कोविडचा संसर्ग झाला असावा, असं डॉक्टरांना वाटलं. मात्र चाचणीच कोरोना नसल्याचं समोर आलं. त्याला एविएन इन्फ्लुएन्जा (H5N1) म्हणजेच, बर्ड फ्लूचा संसर्ग झाला असल्याचं निदान झालं. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्याचा काल मृत्यू झाला. मुलाच्या मृत्यूनंतर त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना आणि नर्सेना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं आहे. त्याचबरोबर त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचाही शोध सुरु आहे.

    एम्समध्ये झालेल्या या मृत्यूमुळे नवे संकट सगळ्यांसमोर उभे राहिले आहे.