मंगळवारपासून दिल्लीतून रोज धावणार १५ पॅसेंजर ट्रेन, आयआरसीटीसी वेबसाईटवर उद्या संध्याकाळनंतर बुकिंग होईल सुुरु

दिल्ली: लॉकडाऊनच्या काळात मोठ्या प्रमाणात मजूर स्थलांतर करीत असताना मद्य रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. दिल्लीहून मंगळवारपासून दररोज १५ पॅसेंजर ट्रेन धावणार आहेत. यामुळे गेल्या अनेक

 दिल्ली: लॉकडाऊनच्या काळात मोठ्या प्रमाणात मजूर स्थलांतर करीत असताना मद्य रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. दिल्लीहून मंगळवारपासून दररोज १५ पॅसेंजर ट्रेन धावणार आहेत. यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून विविध राज्यांमध्ये अडकलेल्यांना मोठी मदत मिळू शकते. एएनआय या वृत्तसंस्थेने केलेल्या ट्विटनुसार भारतीय रेल्वे १२ मे पासून पॅसेंजर ट्रेन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार टप्प्याटप्प्याने रेल्वे सुरू करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्राथमिक पातळीवर ३० रिटर्न ट्रेन सेवा सुरू होतील. या विशेष ट्रेन म्हणून चालविल्या जातील. नवी दिल्ली, दिलबर्गा, आगरताळा, हावडा, पटना, बिलासपूर, रांची, भुवनेश्वर, सिकंदराबाद, बंगळुरू, चेन्नई, तिरुअनंतपुरम, मडगाव, मुंबई सेंट्रल, अहमदाबाद, जम्मू या प्रमुख स्थानकांपर्यंत रेल्वे जाणार आहेत. यासाठी ११ मेपासून सायंकाळी ४ वाजल्यापासून ऑनलाईन बुकिंग सुरू होणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र हे बुकिंग आयआरसीटीसीच्या वेबसाईटवर ऑनलाईन करण्यात येईल. तिकीट खिडकी सुरू नसणार असेही सांगितले जात आहे. याशिवाय प्रोटोकॉल नियमाचे पालन करणे अनिवार्य आहे. दुसरीकडे मजुरांना त्यांच्या राज्यात पोहचविण्यासाठी ३०० ट्रेन्स सुरु करण्याची तयारी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी दर्शवली आहे. राज्यांनी परवानगी दिल्यास या रेल्वे सोडण्यात येतील, अशी माहितीही त्यांनी दिली आहे.