देशभरात मागील २४ तासांत १९,९०६ इतक्या कोरोना रूग्णांची नोंद

देशभरात कोरोना विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होत आहे. तसेच मागील देशभरात २४ तासांत १९,९०६ इतक्या कोरोना रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत १९,९०६ इतक्या कोरोना

देशभरात कोरोना विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होत आहे. तसेच मागील देशभरात २४ तासांत १९,९०६ इतक्या कोरोना रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत १९,९०६ इतक्या कोरोना रूग्णांची नोंद झाली असून, ४१० रूग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशभरात कोरोनाबळींची एकूण संख्या १६,०९५ वर गेली आहे. ३ लाख ९ हजार ७१३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, तर दोन लाख ३ हजार ७१३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यामुळे देशभरात कोरोना रूग्णांचा एकूण आकडा पाहता, ५ लाखांवर गेला आहे.

देशभरात महाराष्ट्र, दिल्ली आणि तमिळनाडू या राज्यांमध्ये सर्वाधिक रुग्ण आहेत. या राज्यांमध्ये १ लाख ५२ हजार ७६५, ७७ हजार २४० आणि ७४ हजार ६२२ रुग्णांची नोंद झाली आहे. आत्तापर्यंत भारतात ७९ लाख ९६ हजार ७०७ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. तर गेल्या २४ तासांत २ लाख २० हजार ४७९ नमुना चाचण्या करण्यात आल्याचे शनिवारी आरोग्यमंत्र्यांनी सांगितले आहे. तसेच रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५८ टक्के झाले असून मृत्यूचे प्रमाण ३ टक्क्यांपेक्षाही कमी आहे. असे केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी सांगितले आहे.