२००० रूपयांची नोट बंद होणार? आरबीआयने दिली महत्त्वाची माहिती, चर्चेला उधाण

अनुराग ठाकूर म्हणाले की, कोणत्याही मूल्याच्या बँकेच्या नोटांच्या छपाईचा निर्णय जनतेच्या देवाण-घेवाणीची मागणी पूर्ण करण्यासाठी आरबीआयच्या सल्ल्यानुसार घेतला जातो. २०१९-२० आणि २०२०-२१ मध्ये २००० रुपयांच्या नोटांच्या छपाईची ऑर्डर दिलेली नाही.

    नवी दिल्ली : २ हजार रूपयांची नोट छापली नसल्याने त्याचा तुटवडाही जाणवत आहे. अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी सोमवारी संसदेत एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की, ३० मार्च २०१८ मध्ये २००० रुपयांच्या ३६.२ कोटी नोटांचे वितरण झाले होते. तर २६ फेब्रुवारी २०२१ मध्ये ही संख्या घटून२४९.९ कोटी झाली.

    अनुराग ठाकूर म्हणाले की, कोणत्याही मूल्याच्या बँकेच्या नोटांच्या छपाईचा निर्णय जनतेच्या देवाण-घेवाणीची मागणी पूर्ण करण्यासाठी आरबीआयच्या सल्ल्यानुसार घेतला जातो. २०१९-२० आणि २०२०-२१ मध्ये २००० रुपयांच्या नोटांच्या छपाईची ऑर्डर दिलेली नाही.

    आरबीआयने म्हटले की, २०१९ मध्ये सांगण्यात आले होते की, आर्थिक वर्ष २०१६-१७ मध्ये ३५४.२९९१ कोटी नोटांची छपाई केली होती. परंतु, २०१७-१८ मध्ये केवळ ११.१५०७ कोटी नोटांची छपाई करण्यात आली. २०१८-१९ मध्ये ४.६६९ कोटी नोटा छापण्यात आले. एप्रिल २०१९ नंतर एकही नोट छापण्यात आली नाही. काळा पैसा रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जाते.