corona patients

शुक्रवारी दिवसभरात देशात(corona patients in India) तब्बल २३ हजार २८५ इतके कोरोनाचे नवे रुग्ण सापडले आहेत. वर्षभरातली ही एका दिवसातली सर्वात मोठी रुग्णवाढ(highest corona patients found in a single day) असल्याचे सांगितले जात आहे. आता देशभरातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा १ कोटी १३ लाख ८ हजार ८४६ इतका झाला आहे.

    देशात अनलॉक झाल्यानंतर कोरोना रुग्णांच्या संख्येतही वाढ(increase in corona patients) झाल्याचं दिसून आलं. शुक्रवारी दिवसभरात देशात(corona patients in India) तब्बल २३ हजार २८५ इतके कोरोनाचे नवे रुग्ण सापडले आहेत. वर्षभरातली ही एका दिवसातली सर्वात मोठी रुग्णवाढ असल्याचे सांगितले जात आहे. आता देशभरातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा १ कोटी १३ लाख ८ हजार ८४६ इतका झाला आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर रुग्णसंख्या वाढल्याने आरोग्य यंत्रणा आणि प्रशासकीय यंत्रणांनी सगळ्या राज्यांना काळजी घेेण्याचे आदेश दिले आहेत.

    जानेवारी २०२१ मध्ये कोरोनाबाधितांचा आकडा कमी झाला होता. तसेच कोरोनाची लल आल्याने लोकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. मात्र लस आली म्हटल्यावर लोकांचा निष्काळजीपणा वाढला. याच कारणामुळे देशात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले. रुग्णसंख्या झपाट्याने वाढत गेली.

    मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांमध्ये देशात ११७ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे शुक्रवारपर्यंत मृतांचा आकडा १ लाख ५८ हजार ३०६ वर पोहोचला आहे. भारताचा रिकव्हरी रेट ९६.८६ टक्के आहे. देशात सध्या १ लाख ९७ हजार २३७ ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत.