भोंगळ कारभार आहे हा पक्का, विजेचे इतक्या लाखांचे बिल पाहून शेतकऱ्याला बसला धक्का

वीज विभागाने एका शेतकऱ्याला २६ लाखांचे वीज बिल(26 lakh electricity bill to farmer) पाठवले. हे बिल पाहून शेतकऱ्याला आणि त्याच्या कुटुंबाला धक्काच बसला. त्याचे संपूर्ण कुटुंब चिंतेत पडले. बिल कमी करण्यासाठी या शेतकऱ्याला वीज विभागाच्या अनेक फेऱ्या माराव्या लागल्या.

लखनौ: उत्तर प्रदेशमधील(uttar pradesh) उन्नावमध्ये वीज विभागाचा भोंगळ कारभार समोर आला आहे. वीज विभागाच्या बेजबाबदारपणाचा फटका एका शेतकऱ्याला बसला आहे. वीज विभागाने एका शेतकऱ्याला २६ लाखांचे वीज बिल(26 lakh electricity bill to farmer) पाठवले. हे बिल पाहून शेतकऱ्याला आणि त्याच्या कुटुंबाला धक्काच बसला. त्याचे संपूर्ण कुटुंब चिंतेत पडले. बिल कमी करण्यासाठी या शेतकऱ्याला वीज विभागाच्या अनेक फेऱ्या माराव्या लागल्या. अखेर वीज विभागाच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची दखल घेत, बिलामध्ये बदल करण्याचे आश्वासन दिले आहे.

गंगा घाट पोलीस स्थानकाच्या क्षेत्रात येणाऱ्या बेहटा गावामध्ये राहणाऱ्या रामू राठोर या शेतकऱ्याच्या घरी ४ डिसेंबर रोजी २६ लाख रुपयांचे बिल आले. एवढ्या मोठ्या रकमेचे बिल पाहून रामूच्या घरचे सर्वचजण चक्रावले. त्यानंतर या बिलासंदर्भात विचारपूस करण्यासाठी रामू जवळजवळ रोज वीज विभागाच्या फेऱ्या मारत होता. मात्र कोणाही त्याची तक्रार गांभीर्याने घेत नव्हते. रामू भूमिहीन शेतकरी आहे. त्याला पाच मुली असून सर्वांच्या लग्नाची जबाबदारी त्याच्या एकट्याच्या खांद्यावर आले. एवढे बिल कसे आले, मला ठाऊक नाही, असे रामूने म्हटले आहे. वीज विभागाचे अधिकारी मला केवळ आश्वासन देत असून पुढे काहीच घडत नाही आहे, असेही रामूने म्हटले आहे.

वीज विभागातील अधिकाऱ्याने चूक झाल्याचे मान्य केले आहे. या शेतकऱ्याच्या वीज बिलामध्ये झालेली चूक सुधारली जाईल. तांत्रिक बिघाड झाल्याने या शेतकऱ्याला २६६लाखांचे बिल पाठवण्यात आले. कधी कधी मीटरमध्ये आठ हजारऐवजी ८० हजार युनिट दाखवले जातात, असे अधिकाऱ्याने म्हटले आहे. अशी आणखी काही प्रकरणेही समोर आली असून लवकरच यामध्ये सुधारणा केली जाईल, असेही वीज अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.