देशात गेल्या २४ तासांमध्ये आढळले ३ लाख ८२ हजार ३१५ नवे कोरोनाबाधित, मृतांच्या संख्येतही वाढ झाल्याने परिस्थिती अधिक गंभीर

गेल्या २४ तासांमध्ये देशात ३ लाख ८२ हजार ३१५ नव्या कोरोनाबाधितांची(Corona Patients In India) नोंद झाली.

    देशात सध्या कोरोनाची दुसरी लाट(Corona Second wave) सुरु आहे. गेल्या काही दिवसांमध्ये नव्याने आढळणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या (Corona Patients in India)तीन लाखांच्या घरातच आहे. आज सकाळी मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांमध्ये देशात ३ लाख ८२ हजार ३१५ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली.

    कालच्या तुलनेत ही संख्या वाढली आहे. त्यामुळे आता बाधितांची एकूण संख्या २ कोटी ६ लाख ६५ हजार १४८ वर पोहोचली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

    नव्या बाधितांसोबतच मृतांच्या संख्येतही वाढ झालेली दिसून येते. गेल्या २४ तासात ३७८० मृतांची नोंद झाली. त्यामुळे आता मृतांचा आकडा २ लाख २६ हजार १८८ वर पोहोचली आहे. तर देशातला मृत्यूदर १.०९ टक्क्यांवर पोहोचला आहे.

    देशात सध्या ३४ लाख ८७ हजार २२९ रुग्ण उपचार घेत आहेत. काल दिवसभरात ३ लाख ३८ हजार ४३९ रुग्ण बरे होऊन घरी परतले. तर आता देशातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८२.०३ टक्क्यांवर पोहोचले आहे.