पुलवामातील चकमकीत ३ दहशतवाद्यांचा खात्मा, १ जवान जखमी

पुलवामामध्ये (Pulwama) झादुरा भागात पोलीस आणि सुरक्षा दलांनी (Police & security forces) तीन दहशतवाद्यांचा खात्मा (Three terrorists killed) केल्याची माहिती समोर आली आहे.

 श्रीनगर : पुलवामामध्ये (Pulwama) जदुरा भागात पोलीस आणि सुरक्षा दलांनी (Police & security forces) तीन दहशतवाद्यांचा खात्मा (Three terrorists killed) केल्याची माहिती समोर आली आहे. परंतु या चकमकीत एक जवान जखमी झाला आहे. २४ तासांत जम्मू-काश्मीरमधील ही दुसरी चकमक आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काल दुपारी एक वाजल्यापासून पोलीस आणि सुरक्षा दल दहशतवाद्यांना पकडण्यासाठी मोहीम राबवित आहेत. मात्र, चकमकीदरम्यान एक जवान जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

यापूर्वी शुक्रवारीही काश्मीरमध्ये सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ४ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले होते. आणि एका दहशतवाद्याने आत्मसमर्पण केले होते. अशा प्रकारे सुरक्षा दलांनी २४ तासांत जम्मू-काश्मीरमध्ये ७ दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.