पद्मश्री आणि अर्जुन पुरस्कारप्राप्त ३० खेळाडूंचा शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठींबा, पदक वापसीचा इशारा

मोदी सरकारने अमंलात आणलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात आता खेळाडूंनी उडी घेतली आहे.पंजाबमधील सुमारे ३० पद्मश्री तसेच अर्जुन पुरस्कार प्राप्त राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी पाठिंबा व्यक्त करून पदके परत करण्याची तयारी दाखविली आहे. शेतकऱ्यांविरोधात बळाचा वापर करणे कोणत्याही अर्थाने योग्य नसून आम्ही या गोष्टीचा विरोध करत आहोत, असे या खेळाडूंनी म्हटलं आहे.

मोदी सरकार शेतकरी आंदोलकांवर अमानुष अत्याचार करत आहेत. कडाक्याच्या थंडीत पाण्याचे फवारे, अश्रुधूर आणि लाठी हल्ला करत बळाचा वापर करत शेतकऱ्यांचे हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला, हे निषेधार्ह आहे. या पद्धतीने आमच्या बांधवांना वागणूक मिळणार असेल तर, अशा पुरस्काराचे आम्ही काय करायचे? असा सवाल खेळाडूंनी उपस्थित केला. आम्ही शेतकऱ्यांचीच मुलं आहोत. आम्ही शेतकऱ्यांसोबत त्यांच्या विरोधाचं समर्थन करणार आहोत त्यामुळे आम्ही हा पुरस्कार परत करत आहोत, असे बास्केटबॉलपटू सज्जन सिंग चिमा यांनी म्हटले आहे. पुरस्कार वापसीचा इशारा अर्जुन पुरस्कारानं सन्मानित आणि पद्मश्री पुरस्कार कुस्तीपटू करतार सिंग, अर्जुन पुरस्कार प्राप्त बास्केटबॉलपटू सज्जन सिंग चिमा, अर्जुन पुरस्कारानं सन्मानित हॉकीपटू राजबीर सिंग यांसह ३० खेळाडूंनी दिला आहे तसेच सरकारचा निषेध म्हणून ५ डिसेंबरला राष्ट्रपती भवनाबाहेर पुरस्कार ठेऊन येणार आहेत, असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.