कंपनी नोंदणीत ३५% वाढ ; कोरोना काळातही व्यवसायाला गती

नोंदणीकृत होणाऱ्या अधिकांश कंपन्यांमध्ये खासगी कंपन्यांचीच भागीदारी सर्वाधिक आहे. या वर्षी फेब्रुवारी महिन्यात नोंदणी करणाऱ्या कंपन्यांमध्ये १३८०९ कंपन्या खासगी आहेत. त्यापैकी ७६५ कंपन्या एकल व्यक्ती असलेल्या आहेत.

    दिल्ली : कोरोनाकाळातही व्यावसायिक हालचालींना वेग आला असून या वर्षी फेब्रुवारी महिन्यात नोंदणीकृत होणाऱ्या कंपन्यांच्या संख्येत गेल्या वर्षीच्या तुलनेत ३५ टक्के वाढ झाली आहे. ही आकडेवारी फेब्रुवारी महिन्यातील आहे. कॉर्पोरेट मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार या वर्षी फेब्रुवारी महिन्यात १४०४९ कंपन्यांनी नोंदणी केली जेव्हाकि गेल्या वर्षी फेब्रुवारीत नोंदणी करणाऱ्या कंपन्यांची संख्या १०४२९ होती. कोरोना साथरोगाचा कहर आणि रोखण्यासाठी करण्यात आलेले लॉकडाऊन व अन्य प्रतिबंध लागू असतानाही आर्थिक व्यवहारांचा वेग मंदावला असतानाही कंपन्यांच्या नोंदणीत मात्र वेग आला आहे.

    १३८०९ खासगी कंपन्यांचा समावेश
    मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी जुलैपासूनच कंपनी नोंदणीकरणात वाढ झाली होती. त्यानंतर यावर्षी जानेवारी वगळता प्रत्येक महिन्यात कंपन्या नोंदणीची संख्या गेल्या वर्षीच्या तुलेनत अधिक असल्याचे दिसून आले. नोंदणीकृत होणाऱ्या अधिकांश कंपन्यांमध्ये खासगी कंपन्यांचीच भागीदारी सर्वाधिक आहे. या वर्षी फेब्रुवारी महिन्यात नोंदणी करणाऱ्या कंपन्यांमध्ये १३८०९ कंपन्या खासगी आहेत. त्यापैकी ७६५ कंपन्या एकल व्यक्ती असलेल्या आहेत.